Tuesday, March 23, 2010

वाचाल तर कमवाल!

वाचाल तर कमवाल!


कंपन्यांचा नफा त्यांच्या शेअरच्या किमतीवर परिणाम करणाऱ्या काही घटकांची माहिती यापूवीर्च या लेखमालेत देण्यात आलेली आहे. प्रत्येक कंपनीच्या बाबतीत हे घटक कसे कार्य करतात, याची माहिती कुठे मिळेल, अशी विचारणा करणारी अनेक पत्रे आली. ही माहिती मिळण्याचा विश्वासार्ह प्रमाणित स्त्रोत म्हणजे कंपनीचा वाषिर्क अहवाल.

समभाग खरेदी करण्यापूवीर् कंपनीचा किमान एक वाषिर्क अहवाल वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही खुल्या शेअरविक्रीमध्ये पैसे गुंतविणार असाल तर अशा कंपन्यांच्या बाबतीत वाषिर्क अहवाल मिळणे कठीण असते. अशावेळी 'रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स' (जरी ते ५०० पानांचे असले तरी) जरुर वाचावे.

अलिकडच्या काळात कंपन्यांच्या वाषिर्क अहवालांची गुणवत्ता बरीच सुधारली आहे. विशेषत: इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी वाषिर्क अहवालांचे मापदंड बरेच उंचावले आहेत. वाषिर्क अहवालात काय वाचायचे ते पाहू या :

डायरेक्टरांचा अहवाल: या अहवालात कंपन्यांच्या गेल्या एका वर्षातील कामगिरीचा उहापोह केला जातो.

मॅनेजमेन्ट डिस्कशन अँड अॅनलिसिस: या विभागात कंपनी आपल्या व्यवसायाबद्दल, एकूणच उद्योगातील संधीबद्दल उद्योगात असलेल्या स्पधेर्बद्दल भाष्य करते.

ऑडिटर्स रिपोर्ट: येथे कंपन्यांचे बॅलन्स शीट तपासणारे लेखा परीक्षक (ऑडिटर) स्वत:ची निरीक्षणे नोंदवतात.

ताळेबंद (बॅलन्स शीट) इतर आथिर्क माहिती: येथे कंपन्यांच्या नफ्यातोट्याविषयी वाषिर्क बॅलन्स शीटविषयी संपूर्ण माहिती दिली जाते.

गुंतवणूकदारांना उपरोक्त माहितीचा कसा फायदा होतो ते पाहू : तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल अथवा तुम्हाला एखाद्या उद्योगधंद्याची फारशी माहिती नसेल तर सर्वप्रथम 'मॅनेजमेन्ट डिस्कशन अँड अॅनलिसिस' जरुर वाचा. येथे तुम्हाला त्या उद्योगात काय चालू आहे, याची पुरेशी कल्पना येऊ शकते. चांगल्या कंपन्या जागतिक राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी देऊन गुंतवणूकदारांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. याच विभागात बदलती सरकारी धोरणे, ग्राहकांच्या आवडीनिवडींतील बदल, करधोरणांतील कररचनेतील बदल इत्यादी विषयांवर कंपन्या भाष्य करतात. नवीन गुंतवणूकदारांना 'मॅनेजमेन्ट डिस्कशन'बरोबरच 'डायरेक्टर रिपोर्ट' वाचल्यास कंपन्यांच्या कारभाराबद्दल बरीचशी माहिती मिळते. तुम्ही एखाद्या कंपनीचे तीन ते पाच वाषिर्क अहवाल वाचलेत तर त्या कंपनीच्या क्षमता मर्यादा यांची तुम्हाला पुरेपूर कल्पना येईल. एखादे धोरण किंवा एखादा व्यवस्थापकीय निर्णय राबविण्याची कंपनीची कुवत या माहितीच्या आधारे समजून घेणे शक्य आहे.

एकदा तुम्हाला कंपनीचा कारभार इतिहास यांची कल्पना आली की तुम्ही तुमचा मोर्चा 'ऑडिटर्स रिपोर्ट' बॅलन्स शीटकडे वळवू शकता. काही वेळा ऑडिटर स्वत:ची निरीक्षणे नोंदवताना कंपनीतील काही गैरप्रकारांकडे तुमचे लक्ष वेधतात. त्यांनी जी गृहितके वापरून बॅलन्स शीट बनवलेले असतात, त्यावरही या रिपोर्टमध्ये भाष्य केलेले असते. सूज्ञ गुंतवणूकदार या माहितीच्या आधारे निकृष्ट दर्जाच्या गुंतवणुकीपासून दूर राहू शकतात.

बॅलन्स शीट त्या अनुषंगाने येणाऱ्या टीपा (नोट्स) यांच्या आधारे तुम्ही कंपनीच्या आथिर्क कारभाराची संपूर्ण माहिती मिळवू शकता. वाषिर्क अहवालात कंपनीने वापरलेल्या 'अकाउंटिंग पॉलिसीज'बाबतीतही पुरेपूर माहिती दिलेली असते. 'अकाउंटिंग पॉलिसीज'मधील बदलांमुळे कंपनीच्या नफ्यात बराच फरक पडू शकतो. या ठिकाणी सदर विषयावर उहापोह करण्यावर जागेची मर्यादा आहेच. हा विषय समजून घेण्याकरिता तुम्हाला स्वत: पाण्यात उतरावे लागेल. जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही वाषिर्क अहवाल वाचाल तेवढे तुमचे ज्ञान कंपन्यांच्या बाबतीत आडाखे बांधायचे कसब सुधारेल.

या विषयावरील अधिक माहितीसाठी 'हाऊ टू रीड अॅन्युएल रिपोर्ट्स अँड बॅलन्स शीट्स' हे रघु पलट यांचे छोटेखानी पुस्तक साह्यभूत ठरेल. investopedia.com या वेबसाइटवर सर्व संज्ञांची माहिती मिळेल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive