Monday, April 12, 2010

निपुत्रिका पुत्रवती कशी होईल? Being Mother

निपुत्रिका पुत्रवती कशी होईल?

Being Mother


हल्लीच्या मुलामुलींच्या खेळण्यात कितीतरी नवीन नवीन खेळण्यांची भर पडत असते. लाकडी खेळण्यांची जागा प्लॅस्टिकच्या खेळण्यांनी घेतली. दोरी बांधून ओढायचा हत्ती, घोडे याची जागा रिमोट कंट्रोलच्या मोटारी, आगगाड्या रणगाड्यांनी घेतली. पण प्रत्येक मुलाच्या खेळण्यात एकतरी बाहुली असतेच असते. पूर्वी ठकी होती, आता प्लॅस्टिकची, डोळ्याची उघडझाप करणारी एवढाच फरक. पण खेळण्यात बाहुली असतेच असते. मुली तिला मांडीवर घेतात. झोपवतात, गाण म्हणतात. खाऊ घालतात, वेळप्रसंगी चापटपोळीही देतात!

खेळण्यातली बाहुली ही स्त्रीच्या उत्कट इच्छेचं असतं. मुलीच्या खेळण्यातली भातुकली हा तिच्या भविष्यातल्या स्वप्नांचा लुटुपुटीचा संसार असतो.


मुलगी मोठी होते. शिकते, संस्कारित होते आणि मग एक दिवस लग्न होऊन संसार करू लागते. भातुकलीच्या खेळामधला राजा-राणींचा संसार खऱ्या अर्थानं सुरू होतो. आता दुसरं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ केव्हा येते याची वाट ती पाहते-मनातली बाहुली खेळातली ठकी वास्तवात केव्हा येईल? बाळाला कुशीत घेऊन थोपटू, त्याला पाजू, खेळवू, मोठं करू.....

एकदोन, अडीच तीन. वर्षांमागून वर्षे जातात. पण कूस उजवतच नाही. मग राजाराणीच्या संसारात धुसफूस, चिडाचीड सुरू होते. सासू-नणंदाची कुजबूज. आईचा दुःखीकष्टी चेहरा, मैत्रिणी नातेवाईकाची दृष्टी सगळे तिच्या अंगावर येऊ लागत. कोणी सुचवतं तपासून ये. माहेरचे म्हणतात तपासायला दोघंही जा. कोणात दोष आहे?... घरात सुरू होते. पती तयार होत नाही. 'तुझ्यातच दोष आहे. वंशाचा दिवा लागणार नाही ' अशी विषारी वाक्य झेलत तिला दिवस काढावे लागतात. जिणं नको वाटू लागते.

पण अशावेळी तिने निराश व्हायचं अजिबात कारण नाही. मूल होत नाही म्हणून नशिबाला बोल लावायचे नाहीत. अंगरिधुपारे करायचे नाहीत. मन शांत ठेवायचं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.

हल्ली विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की, निपुत्रिका पुत्रवती होऊ शकते. त्यासाठी कितीतरी वर्ष शास्त्रज्ञ झटत होते. अजूनी झटत आहेत. तेव्हा निराश का व्हायचं?

हे नवेनवे शोध आणि उपचारपद्धती विविध तऱ्हेच्या असतात. त्यांची माहिती असणं केव्हाही चांगलेच ठरतं. मूल होणे हे काही त्या स्त्रीच्या चुकीमुळे झालेले नसतं. तेव्हा अशा स्त्रीला दोष देणं सर्वस्वी अयोग्यच उलट तिला बाकीच्यांनी, विशेषतः तिच्या पतीनं धीर द्यायला हवा दोघांनीही डॉक्टरांकडे जायला हवं आणि या उपचाराची माहिती करून घ्यायला हवी.

सर्वसाधारणपणे १० ते १५ टक्के स्त्रिया तीन वर्षांनंतरच्या वैवाहिक सुखानंतरही मातॄत्वाचं सुख अनुभवू शकत नाहीत. लग्नानंतर तीन वर्षांत जर दिवस गेले नाहीत तर त्याला सामान्यपणे वंध्यत्व म्हणतात.

तपासणी केव्हा करावी?

तीन वर्षांच्या वैवाहिक सुखानंतर, दिवस जाण्याची इच्छा असूनही कोणतंही नियोजनाचं साधन वापरताही दिवस गेले नाहीत तर, तपासणी करून दिवस जाण्याचं, मूल होण्याचं कारण शोधायला हवं. अर्थात तीन वर्षाची ही मर्यादा ही लक्ष्मणरेषा नाही. कितीतरी जोडप्यांच्या बाबतीत ही कालमर्यादा बदलते. तसंच लग्नाच्यावेळी पतिपत्नींची वयं जास्त असतील तर, मात्र तीन वर्षांपर्यंतही थांबता लगेचच तपासण्या करून घ्यायला हव्यात त्याच प्रमाणं वैवाहिक सुख, पुरुष किंवा स्त्रीमधील दोषांमुळं अनुभवाला येण कठीण जात असेल तर लगेचच तपासण्या करून घेणं चांगलं कारण यामुळे मूल होण्याचा प्रश्न पुढं उद्भवणारच असतो.

गर्भधारणा कशी होते !

स्त्रीबीज पुरुषबीज यांच्या संयोगातून गर्भधारणा होत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्त्री पुरुषबीजाचा संयोग गर्भनलिकेमध्ये ( फॅलोपियन ट्यूब ) होतो आणि नंतर हा गर्भ गर्भाशयामध्ये येऊन वाढीला लागतो. पाळी जर नियमित असेल, तर सामान्यता पाळीच्या चौदाव्या दिवशी किंवा चौदाव्या दिवसांच्या आसपास स्त्रीबीज निर्माण होत असतं. म्हणून पतिपत्नी संबंध या सुमाराला आला तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच असते.

विवाहापूर्वी तपासणी

पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा अभाव असल्यामुळे लग्नानंतर येणारं वैफल्य टाळण्यासाठी, आपल्याला लक्षात येण्यासारखी विकृती आढळली तर, लग्नाआधी लगेच तपासणी करून घेतली तर त्यावर उपाययोजना करायला सुरुवात करता येते. पाळी येतच नसेल, अगदीच अनियमित असेल, स्तनांची वाढ योग्य तऱ्हेनं झालेली नसेल किंवा पुरुषांप्रमाणं स्त्रीच्या शरीरावर केसांची वाढ झालेली असेल तर याची कारण शोधून काढणं केव्हाही चांगलंच. तसंच पुरुषामध्ये दोन्ही अंडबीज अंडकोषात नसतील, स्तनांची वाढ होत असेल, दाढी मिशा योग्य प्रमाणात येत नसतील तरीही तपासणी आवश्यक ठरते. तसंच लैंगिक शिक्षण आधीपासून माहिती करून घेतले की, नंतर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

कोणकोणत्या तपासण्या आवश्यक ?

वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी स्त्रीबीज निर्माण होणाऱ्या काळात पतिपत्नीसंबंध येऊ द्यावा. या गोष्टी कटाक्षान पाळूनही दिवस राह्यले नाहीत, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्याव्यात. डॉक्टर प्रथम दोघांचीही संपूर्ण शारीरिक रक्त, लघवीची म्हणजेच गुप्तरोगासाठी मधुमेहासाठीच्या तपासणी करतात, नंतर होते ती पती आणि मग पत्नीची विशेष तपासणी.

पुरुष तपासणी

() पत्नीच्या कोणत्याही विशेष तपासण्यापूर्वी पतीची वीर्य तपासणी ही सोपी, विशेष त्रास घेता कोणत्याही धोक्याची शक्यता नसल्यामुळे जास्त सोयिस्कर असते.

वीर्यामध्ये जर दोष आढळलाच तर, निष्कारण पत्नीच्या शस्त्रक्रिया करून तपासण्या करण्यात काहीच फायदा नसतो. म्हणून तपासणी सुरुवातीलाच करतात.

() वीर्यात दोष आढळला तर अंडबीजाच्या तुकड्याची तपासणी ( टेस्टीक्यूलर बायास्पी ) केली जाते.

() त्यावेळी अंडचीजाकडून इंद्रियाकडे जाणाऱ्या नलिकांचीही तपासणी ( व्हासोग्रफी ) सुलभत्तेनं करता येते.

वीर्य तपासणीत जर काहीही दोष आढळला नाही तर मग पत्नीच्या तपासण्यास सुरुवात केली जाते.

स्त्री-तपासणी

() लॅप्रोस्कोप

ही तपासणी लॅप्रोस्कोप नावाच्या दुर्बिणीसारख्या यंत्राच्या सहाय्याने जाते. बेंबीपाशी सूक्ष्म क्षीद्र पाडून लॅप्रोस्कोपमधून पोटात बघता येतं. यामुळं गर्भाशयाची पिशवी, तिचा आकार, स्थिती ( पालथी सरळ ) तसंच फायब्राईडसारखे ट्यूमर असल्यास तीही वैगुण्य कळू शकतात. याचबरोबर गर्भनलिका, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या ग्रंथीही ( ओव्हरीज ) बघता येतात. यामुळं स्त्रीबीज वेळच्यावेळी निर्माण होतं का ? हेही कळतं. त्याचवेळी गर्भाशयाच्या तोंडातून रंगीत औषध घालून गर्भनळ्या उघड्या आहेत का ? तेही पाहाता येतं. बंद असतील तर त्या नेमक्या कुठं बंद झाल्या आहेत ? कशामुळे बंद झाल्या आहेत ? या गोष्टीही समजू शकतात. या तपासणीमुळे पोटातील टी. बी. ट्यूमर यासारखे रोग आहेत का ? हेही समजून घेता येते.

या नंतर गर्भाशयाचं तोंड मोठं करून ( डायलेशन) क्युरेटिंग करतात. गर्भाशयाच्या आतलं आवरण काढून ते पॅथॉलाजीकल तपासणीसाठी पाठवलं जातं. या तपासणीमुळं वेळच्यावेळी स्त्रीबीज निर्मिती होते की नाही-गर्भाशयाच्या पिशवीला टी. बी. सारखा जीवघेणा विकार आहे की नाही याचा शोध घेता येतो.

लॅप्रोस्कोपी केली तरी पेशंटला त्याच दिवशी घरी जाता येतं.

लॅप्रोस्कोपीचे फायदे

() एकाच ऑपरशेनमध्ये एकाच वेळी गर्भाशयाची संपूर्ण माहिती मिळू शकते.

() त्याचवेळी क्युरेटिंगचही ऑपरेशन होऊन जातं.

() गर्भनलिकांची तोंडं उघडी आहेत की नाही हे कळू शकतं.

() वेळच्या वेळी स्त्रीबीज निर्माण होतं की नाही हे कळतं .

() गर्भनलिका लाळेसारख्या प्रवाहामुळं ( म्यूकस ) बंद असेल, तर गर्भाशयाच्या तोंडातून भरलेल्या ओषधामुळं गर्भनलिका पुन्हा मोकळी होऊ शकते.

() इंडोस्कोपिक फोटोग्रॉफी

लॅप्रोस्कोपी करताना जे प्रत्यक्षात दिसतं ते या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कायमचं टिपून ठेवता येत आणि एखाद्या एक्सरेप्रमाणं त्यात बघून असलेला दोष सांगता येतो.

क्युरेटिंगचे फायदे

() गर्भाशयाच्या पिशवीचं सर्वसामान्य ज्ञान होतं.

() आतील आवरणाच्या पॅथॉलॉजीकल तपासणीनंतर स्त्रीबीज तयार होतं किंवा नाही हे कळतं.

() गर्भाशयाच्या पिशवीला टी. बी. सारखा विकार असेल तर त्याचे निदान होतं.

() पिशवीचं लहान असलेलं तोंड मोठं होतं.

() फायब्राईड, पॉलिपसारख्या ट्यूमरचं निदान होतं.

एक लक्षात ठेवलं पाहिजे की, क्युर्टिंग केल्यावर दिवस जातातच असं नाही. तसंच पुनः पुन्हा क्युरेटिंग करून घेतल्याने दिवस जातात असंही नाही. उलट या वारंवार होणाऱ्या क्युरेटिंगमुळेच गर्भाशयाच्या नळ्या बंद होण्याची शक्यता असते त्यामुळे कायमचे वंध्यत्व येऊ शकतं.

() हवा भरणे :

पाळी संपल्यावार गर्भाशयामुखातून गर्भाशयात हवा भरली जाते. त्यामुळे गर्भनलिकांचा मार्ग उघडा आहे की नाही याचे ज्ञान होतं. त्याचबरोबर लाळेसारख्या घट्ट द्रवानं ( म्यूकस ) गर्भनलिका बंद झाल्या असतील तर त्या पुन्हा मोकळ्या करायला मदत होते.

() गर्भाशयाच्या फोटो

या फोटोमुळे गर्भाशयाची पिशवी, गर्भनलिका यासंबंधी माहिती मिळते. त्याचबरोबर फायब्राईड पॉलीपसारख्या ट्यूमर्सची माहिती मिळते.

() संभोगानंतरची तपासणी :

संभोगानंतर काही तासांनी पत्नीच्या योनीमार्गातील गर्भाशय मुखातील द्रवांची तपासणी करतात त्या द्रवांमध्ये असलेल्या शुक्रजंतूचे प्रमाण यामुळे कळतं.

() आणखी काही तपासण्या

यामध्ये आंतस्त्राव ( हार्मोन्स ), इस्ट्रोजीन, प्रोजेस्ट्रॉन, एफ्‌. एस्‌. एच्‌. एल्‌. एच‌. यांच्या तपासण्यांचा अभ्यास समावेश होतो.

यामध्ये स्त्रियांमध्ये निर्माण होणारे आंतस्त्राव त्यांचं कमीजास्त होणारं प्रमाण याचं अचूक निदान करता येतं. त्याचबरोबर स्त्रीत्त्व स्त्रीबीज निर्मिती याविषयी ज्ञान मिळू शकतं. परंतु ही तपासणी खूपच खर्चाची असते आणि ती करण्याची सोयही पुण्या मुंबई सारख्या मोट्या शहरातच आहे.

पती-पत्नीच्या तपासणीनंतर......

पती-पत्नीच्या तपासणीनंतर दोष कोणात आणि किती प्रमाणात आहे, याचा एकत्रपणे आणि साकल्यानं विचार करून त्यावर करावयाची उपाययोजना आखली जाते. दोष नेमका कुठं आहे तो नीट होईल का मूल होण्याची शक्यता किती असेल, हे डॉक्टरांकडून पती पत्नीनं समजावून घेतलं की मग पुढच्या उपाययोजना करणं सोयीचं जातं.

पुरुष-दोषावर उपाययोजना

() दोष निर्माण होऊ नयेत म्हणून उपाय : हार्निया, हायड्रोसिल, अंडगोळी अंडकोषात नसणं अशा विकारांवर वेळीच उपाय करण्यात आले म्हणजे पुढं येणारं वध्यंत्व टाळता येतं. अंडगोळी अंडकोषात नसणं यावर उपाय लहानपणीच मुलाला शाळेत घालण्यापूर्वीच करून घ्यावा. म्हणजे पुढं होणारे दुष्परिणाम टाळता येतातं. लहानपणी खेळताना, सायकलवर बसताना, कुस्ती खेळताना अंडबीजाला मार लागला असेल तर डॉक्टरांकडून उपचार करून घेणं आवश्यक असतं तसंच करकचून लंगोट बांधणं ही सवय वीर्यनिर्मितीला हानिकारक असल्यामुळे ती सवय बदलायला लावावी. वीर्य निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर लंगोट ना बांधता सकाळ संध्याकाळ दहा मिनिटं थंड पाण्यात बसावं. त्याचप्रमाणं लहानपणी होणाऱ्या गालफुगीम टॉफाईड, कावीळ यासारख्या रोगांमध्ये मुलाची नीट काळजी घ्यावी. मुलांवर योग्य संस्कार केले सर्व गोष्टींची आरोग्य विषयक माहिती करून दिली तर अजाणतेपणी होणारे गुप्तरोग टाळता येतील.

() वीर्यनलिका बंद असल्यास उपाय : वीर्यनलिका कुठे, किती ठिकाणी कशामुळे बंद झाली आहे याचा शोध घेऊन त्यावर उपचार करता येतात. बंद असलेला भाग काढून टाकून वीर्यनलिका परत जोडता येते. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक विशेष यंत्र तंत्राच्या सहायाने ( मायकोसर्जरी ) केली गेली तर यशाचं प्रमाण खूपच वाढतं.

स्त्रीदोष उपाययोजना :

() दोष निर्माण होऊ नयेत म्हणून काळजी

लहानपणी मुलींच्यावर चांगले संस्कार केले तर सर्व गोष्टींची आरोग्यविषयक माहिती करून दिली तर अजाणतेपणी भीतीपोटी होणारे गुप्तरोग टाळता येतील. आईनं मुलींना स्वच्छतेची आरोग्याची आवड निर्माण करावी.

ऍबॉर्शन घडवून आणण्याची शस्त्रक्रिया शक्यतो टाळावी. तशीच वेळ आल्यास गर्भपात तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच चांगल्या हॉस्पिटलमध्येच करवून घ्यावा.

() निश्चित उपाययोजना

() हार्मोन्स : स्त्रीबीज जर वेळेवर निर्माण होत नसेल पाळीही नियमित येत नसेल तर हार्मोन्सच्या गोळ्या देऊन हे घडवून आणता येतं. नवीन शोधामुळं स्त्रीबीज निर्माण होण्यासाठी हार्मोन्सची इंजेक्शन निघाली आहेत. सध्या त्याची किंमत जरी खूप असली तरी त्यांचा बऱ्याच अंशी फायदा होऊ शकतो.

() पालथ्या पिशवीवर उपाय : केवळ पालथ्या पिशवीमुळे मूल होण हे फारच थोड्या वेळा घडतं. बऱ्याच वेळा मूल होण्यासाठी पूर्णपणे तपासण्या करता घाईघाईनं पालथी पिशवी सरळ करण्याचं ऑपरेशन केलं जातं आणि तेच बऱ्याच वेळा बंधत्वास कारण ठरतं.

() गर्भनलिका बंद असल्यास जोड ऑपरेशन : गर्भनलिका कुठे, किती ठिकाणी कशामुळं बंद आहेत यावर उपाययोजना करणं जास्त श्रेयस्कर ठरतं. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक विशेष यंत्र तंत्राच्या सहाय्यानं ( मायक्रोसर्जरी ) केली तर यशाच प्रमाण खूपच वाढतं.

() वारंवार गर्भपात होऊ नये म्हणून : याचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी बऱ्याच तपासण्या कराव्या लागतात. गर्भनलिका याच तोंड बंद असेल तर टाके घालून वारंवार होणारा गर्भपात टाळता येतो.

() मानसिक उपाय योजना : वरील सर्व उपायांबरोबर स्त्रीला धीर देणं हे तितकंच महत्त्वाचे ठरतं. काही वेळेला नुसत्या डॉक्टरीच्या व्यक्तिमत्त्वामुळेच समजावून देण्याच्या पद्धतीनंच तसंच उत्साहाच्या दोन शब्दानीच निम्म्याहून अधिक काम झालेलं असतं.

() कृत्रीम गर्भधारणा : पुरुषाच्या वीर्यात जर दोष असेल तो बरा होण्यासारखा असेल तर दुसऱ्या अनाहूत डोनरचं वीर्य घेऊन कृत्रिम गर्भधारणा करता येते. अर्थात कृत्रीम गर्भधारणेच्या आधी पती पत्नी दोघानीही संमती द्यावी लागते. कृत्रीम गर्भधारणा ही पूर्णपणे गुप्तच ठेवली जात असल्यामुळं समाजाच्या दृष्टीनं पतीपत्नीचं जीवन कुठंही विस्कळीत होत नाही. पण यासाठी दोघांच्या मनाचा घट्टपणा दोघंही समविचारी असायला हवेत

टेस्ट ट्यूब बेबी

गर्भनलिका पूर्णपणे खराब झाल्या असतील तर अशा वेळी गर्भनलिकेत गर्भधारणा करता कृत्रीम तऱ्हेने शरीराच्या गर्भधारणा करून तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीत वाढवता येतो ही पद्धती अगदी नवीनच उपलब्ध झाली आहे जगातील फारच थोड्या हॉस्पिटलमध्ये याची सोय आहे.

काय गोष्टी करू नयेत ?

मूल होण्यासाठी साधू, बैरागी यांच्याकडून अघोरी उपचार करून घेऊ नयेत तसंच होणारं मूल हा मुलगा असावा म्हणून पुसंवेदन विधी काही ठिकाणी केला जातो. ही पूर्णपणे भोंदू समजूत आहे. पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरत असतं आणि आत्ताच्या शास्त्राप्रमाणं हे लिंग कोणीही आणि कोणत्याही उपायानं बदलू शकत नाही. गंडेदोरे, मंत्रताईत, साधू, संन्याशी यांच्या तथाकथित मंत्रसामर्थ्यामुळं मूल होत, ही समजूत अत्यंत चुकीची आहे. असल्या गोष्टींना कोणीही फसता कामा नये. निपुत्रिकेला पुत्रवती होण्यासाथी वर सांगितलेले वैद्यकीय उपचारच उपयोगी पडतील.

आणि एवढंही करून मूल होऊ शकलं नाही तर काय करायचं ? मुख्य म्हणजे निराश व्हायचं नाही. आजारी माणसावर आपण उपचार करता असतो. खूप काळजी घेतो. पण दुर्दैवानं त्यातूनही तो दगावला तर आपण काय करू शकणार ? दुःख मिळायलाच हवीत आणि पुढे जायला हवं. आपल्याला मूल होणार नाही अस जरी पक्क कळालं तरी निराश होता, एका मुलाची आई होता येत नाही, तर आपल्या समाजातल्या अनेक अनाथ मुलांची आई तुम्ही होऊ शकालच की नाही ? स्त्री ही मातृहृदयी असते. प्रेम माया तिनं लावली तर अनाथांची आई होणं अवघड नाही.

देवकी होता आला नाही, तरी यशोदा होता येतंच ना ?

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive