Friday, April 2, 2010

मॅक्रो म्हणजे काय आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो का वापरावा?


 


मॅक्रो म्हणजे काय ?

मॅक्रो म्हणजे कॉम्प्युटरमध्ये बनविला जाणारा असा छोटासा प्रोग्राम ज्यामुळे आपल्याला सतत करावे लागणारे एखादे मोठे काम क्षणार्धात व्यवस्थित करता येते.

तुम्हाला वर्डमध्ये नेहमी करावी लागणारी काही कामे खाली दिली आहेत.

१) वर्डमध्ये काम करताना एखादे वाक्य अथवा परिच्छेद तुम्हाला सतत विशिष्ट प्रकारे 'फॉरमॅटींग' करावा लागत असेल. जसे एखादे वाक्य टाईप केल्यानंतर त्याला विशिष्ट साईझ, फॉन्ट, ठळक करणे, तिरके करणे इ.

२) एखादे वाक्य, एखाद्या व्यक्तिचे नाव अथवा एखादा परिच्छेद तुम्हाला दररोज जशाच्या तसा टाईप करावा लागत असेल.

३) वर्डमधिल फाईलमध्ये तुम्हाला वेळोवेळी रोजची तारीख द्यावी लागत असेल.

या व्यतिरिक्त अशी अनेक कामे अथवा गोष्टी दररोज वर्डमध्ये काम करताना तुम्हाला कराव्या लागत असतील तर त्यासाठी जर आपण एकदाच थोडा वेळ काढून त्यासाठी एखादा "मॅक्रो" बनविला तर त्यानंतर दरवेळेस त्या मॅक्रोच्या (छोट्याश्या प्रोग्रामच्या) मदतीने ते सतत करावे लागणारे काम चुटकी सरशी करता येईल.

मॅक्रोद्वारे आपण आपल्याला करावे लागणारे काम कि-बोर्डवरील एखाद्या बटणामध्ये साठवू शकता म्हणजेच समजा एखाद्या सतत टाईप कराव्या लागण्याऱ्या वाक्यासाठी जर तुम्ही मॅक्रो बनवून ते वाक्य कि-बोर्ड मधिल एखाद्या बटणामध्ये साठविल्यास पुढच्यावेळी तेच वाक्य टाईप न करता कि-बोर्डवरील फक्त तेच बटण दाबल्यास कॉम्प्युटर आपोआप ते वाक्य टाईप करुन देतो.


मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो कसा बनवायचा?


समजा तुम्हाला तुमचे नाव वर्डमध्ये काम करताना सतत द्यावे लागत असेल तर त्यासाठी आपण मॅक्रो बनवुया.

खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार एक-एक करत मॅक्रो बनवुया.

१. वर्ड प्रोग्राम चालू करा.

२. बटणांच्या वरील मेनूबारमधिल 'Tools' ह्या विभागातील 'Macro' ह्या उपविभागावर कर्सर न्या.

३. आता बाजूला येणाऱ्या इतर बटणांमधिल 'Record New Macro' वर क्लिक करा.

४. आता समोर येणाऱ्या चौकोनातील

ह्या बटणावर क्लिक करा.

५. आता इथे कॉम्प्युटर आपणस एखादे शॉर्टकट बटण विचारेल.

६. इथे एका छोट्या चौकोनामध्ये 'Press new shortcut key' खाली कर्सर असेल.

७. शॉर्टकट बटणासाठी आपण कि-बोर्डवरील 'Alt' (अल्टर) हे बटण दाबुन 's' हे बटण दाबा.

८. आता वरील त्या चौकोनात 'Alt + S' असे दिसेल.

९. आता त्याच चौकोनातील 'Assign' ह्या बटणावर क्लिक करा.

१०. मग त्याच चौकोनातील 'Close' ह्या बटणावर क्लिक करा.

११. आता आपल्याला वर्ड चे तेच रिकामे पान समोर दिसेल त्याच सोबत एक छोटे चौकोन दिसेल व आपल्या कर्सर खाली ऑडिऒ कॅसेटचे चित्र दिसेल.

१२. कुठेही क्लिक न करता सरळ आपण आपले नाव टाईप करा.

१३. आता त्याच छोट्या चौकोनातील 'Stop' च्या बटणावर क्लिक करा.

१४. बस्स. इतकेच केल्याने आपला मॅक्रो तयार होईल.

१५. आता आपण जेव्हा जेव्हा वर्ड प्रोग्राम चालू करुन 'Alt + s' बटण दाबाल म्हणजेच कि-बोर्ड 'अल्टर' चे बटण दाबून 's' हे बटण दाबाल तेव्हा कॉम्प्युटर आपोआप त्या पानावर आपले नाव टाईप करेल.

(* वर १२ व्या क्रमांकावर जिथे आपले नाव टाईप करायला सांगितले आहे, तिथे दुसरे काही टाईप केल्यास ते त्या मॅक्रोमध्ये साठविले जाईल.)

अशाप्रकारे आपण आपणास सतत टाईप कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी मॅक्रोद्वारे निरनिराळ्या बटणांमधे साठवू शकता.

टिप : कि-बोर्डवरील प्रत्येक बटणामध्ये एखादी सुचना दिलेली असल्याने मॅक्रो तयार करताना शक्यतो 'Alt' ह्या बटणाचा अक्षरांबरोबर वापर करावा.

* एखादा मॅक्रो जर तयार केल्यानंतर आपणास तो डिलीट करायचा असल्यास पुन्हा बटणांच्या वरील मेनूबार मधिल 'Tools' ह्या विभागातील 'Macro' बटणाच्या पुढिल पून्हा 'Macros' ह्याच बटणावर क्लिक करा. आता समोर येणाऱ्या मॅक्रोच्या यादीमधील शेवटच्या क्रमांकाच्या मॅक्रोवर क्लिक करुन त्याच चौकोनातील 'Delete' ह्या बटणावर क्लिक करा व 'Yes' वर क्लिक करुन आपण बनविलेला शेवटचा मॅक्रो नष्ट करा.




No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive