Monday, May 17, 2010

मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई


छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली. पेशव्यांच्या उदय अस्तावर अनेक पुस्तके आहेत त्यामुळे या लेखात मी वंशावळीवर वा ईतर गोष्टींवर जाता मुख्य पेशव्याच्या उदय कसा झाला हे मांडनार आहे. प्रस्तुत लेखात विस्तारभयामुळे अनेक घटना येनार नाहीत पण पेशवे कोण होते, त्यांचाकडे गादी का आली ह्याच गोष्टींवर विचार करत आहे.

महाराजांनी छत्र चामरे धरायच्या आधीच पेशवे पद निर्मान केले होते. स्वराज्याचे पहिले पेशवे हे सोनोपंत डबिर होते. त्यांचा नंतर निळोपंताना (मुलगा) पेशवाई जाता राझेंकर कुळकर्णी पेशवे झाले त्यापुढे मोरोपंत पिंगळे हे पेशवे झाले. महाराज जर स्वराज्याची उजवी बाजु होते तर मोरोपंत हे डावी ईतके मोठे काम पंतानीं करुन ठेवले आहे. स्वराज्य जिंकने हे काम सेनापतीचे पण त्यावर अंमल चढविने हे पेशव्यांचे. असे हे पेशव्यांचे महत्व.

नंतर पेशवाईच्या काळातील पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट कसा झाला ते पाहु.
बाळाजी विश्वनाथ भट हा मुळचा कोकणातील श्रीवर्धनचा होता. त्याचा घरान्याकडे दंडाराजपुरी श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० पासुन होती. रिसायसकार ( गो सरदेसाई, यांनी फार मोठी कामगीरी मराठी ईतिहासासाठी केली आहे) लिहीतात की भट घरान्यतील लोक कदाचित थोरल्या महाराजांकडे नोकरीला होते. दंडाराजपुरी म्हणल्यावर जंजीरा बाजुला आलाच. तिथे सिध्दी होता त्याचा उपद्रव वाढल्यामुळे मुळ पेशवा देशावर आला. राजाराम महाराजांच्या काळात बाळाजी पुणे प्रांताचा सरसुभेदार होता तर १९०४ ते १७०७ मध्ये तो दोलताबादेचा सरसुभेदार होता. याच काळात कदाचित तो धनाजी जाधवाबरोबर मोहीमेस गेला असावा असा निष्कर्ष ईतिहास्कार काढतात. घाटावर येतानाचे त्याचे वय कदाचित २० एक असेल.
दोलताबादचा सुभेदार असताना त्याची स्वतःची राजमुद्रा होती.
"
श्री उमाकान्तपदांभोजभजनाप्रसमुन्नते: |
बाळाजी विश्वनाथास्य मुद्रा विजयहेतराम ||"

धामधुमीच्या काळात जरी तो महाराणी ताराबाई सोबत काम करत असला तरी शाहु सुटुन आल्यावर त्याला शाहुचा पक्ष महत्वाचा वाटला म्हणुन तो तिकडे गेला. शाहु - ताराराणि युध्दात धनाजी जाधव ताराराणि कडुन होता. युध्द करायला तो निघाला पण युध्द झालेच नाही. बाळाजी विश्वनाथाने मोलाची कामगिरी करुन धनाजी जाधवास शाहुच्या पक्षात ओढले. कमजोर असलेला शाहु पक्ष धनाजी जाधव मुळे बळजोर झाला. ह्या घटनेला फार महत्व आहे. यामुळे बाळाजी विश्वनाथ शाहुचा मुख्य सहकारी झाला त्यामुळे शाहुने खुश होऊन बाळाजीस "सेनाकर्ते" ही पदवी बहाल केली.
पुढे जेव्हा तेव्हाचा पेशवा बहिरोपंत पिंगळे याला आग्र्यांनी अटक केली तेव्हा स्वराज्या समोर मोठा कठीन प्रश्न निर्मान झाला. एक सरदार दुसर्याला अटक करतो. तो सोडविन्यासाठी प्रतिनिधीशी सल्ला मसलत करुन शाहुने बाळाजी विश्वनाथला पेशवा केला. तेव्हा प्रथम भट घराने पेशवे झाले. पेशव्याने मोठ्या हिकमती आंग्र्याशी युध्द करता सलोखा केला त्यामुळे त्याचे वजन आणखीन वाढले.

शाहुने मांडलिकी स्वरुप राज्य स्विकारल्यामुळे जेव्हा दिल्लीत गडबड झाले तेव्हा शाहुने हुसेन अलीला मदत करन्यासाठी बाळाजी विश्वनाथला पाठवले. ही मराठ्यांची पहिली मोहीम. (स्वतंत्र न्हवती पण त्यामुळे उत्तरेतल्या वाटा समजल्या, राजकारण समजले). जाताना बाळाजीने आपल्या कोवळ्या पोराला ( पहिला बाजीराव उर्फ विश्वास राव) सोबत घेतले. सन १७१८. ) या मोहीमेत सामील होताना एक तह झाला त्यात पण पेशव्याने मोलाची कामगिरी बजावली. हाच तो करार ज्यात पहिलेंदा चओथाई चा मुद्दा आला पुढे निझामासोबत बाजीरावाने युध्द केले.

राजारामाने सनदादेऊन राज्य वाढीस लावायचा प्रयत्न केला होता. बाळाजी ने तो पुढे नेऊन त्याला मराठा मडंळाचे मोठे स्वरुप आणले.
बाळाजीच्या पश्चात त्याचा मुलगा बाजीराव पेशवा झाला. त्याला विरोध झाला नाही कारण तो वयाचा ११ व्या वर्षापासुन राजकारणात स्वार्यात समाविष्ट होता. (पहीली स्वारी शाहु विरुध्द चंद्रसेन जाधव (धनाजी चे सुपुत्र).) पण तो वारल्यावर त्याचा मुलाला म्हणजे बाळाजी बाजीराव ( नानासाहेब पेशवे) लगेच पेशवाई मिळाली नाही. बाजीरावाचे जामात बाबूजी नाईक बारामतीकर (जोशी) हा महीने पेशवा होता. तो प्रंचड श्रिमंत होता. शाहुवर त्याचे प्रंचड कर्ज होत त्यामुळे त्याने पेशवाई विकत घेतली असे म्हणता येईल. पण नंतर शाहुने परत नानासाहेबांना पेशवाई सन्मानाने परत केली. पण यापुढे मात्र नानासाहेबाने पेशवाई वंशपरंपरेने मागीतली ती त्याला देऊ केली. पूढे १७४९ च्या आसपास शाहु महाराज निवर्तले त्यामुळे सर्व अधिकार पेशव्यांकडे आले.

पेशव्यांना बर्याच लोकांचा विरोध होता. जसे सेनापती दाभाडे, रघुजी भोसले, पंत प्रतिनिधी वैगरे. बाजीरावाने आणखी एक मोठे युध्द दाभाडेशी गुजरात / माळव्यासाठी केले त्यात तो विजयी झाला.

पेशव्यांचा कारभार (पेशवे म्हणुन)

बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
बाजीराव - १७२० ते १७४० ( बंघु चिमाजी आपा)
मधिल दोन तिन महीने बाबुजी नाईक.
बाळाजी बाजीराव -( नानासाहेब) १७४० ते १७६१ ( बंधु रघुनाथ, चुलत बंधु सदाशिव, अपत्य विश्वासराव, माधवराव)
माधवराव - १७६१ ते ७२
नारायनराव - १७७२-७३
रघुनाथराव १७७३-७४
सवाई माधवराव - ते बाजीराव दुसरा १७७४ ते १८१८. पेशवाई समाप्त.
पुढे अमृतराव नंतर नानासाहेब दुसरे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमर मध्ये भाग घेतला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive