Friday, May 14, 2010

Marathi Novel Ch-6: ब्लैंक मेल ... (शून्य- कादंबरी )

Marathi Novel Ch-6: ब्लैंक मेल ... (शून्य- कादंबरी )


मंद चंद्राच्या प्रकाशात टेरेसवर कमांड1 आणि कमांड2 बसले होते. त्यांच्या समोर लॅपटॉप ठेवलेला होता. मधून मधून मजेत ते व्हिस्कीचे घोट घेत होते. कमांड1 कॉम्प्यूटरला भराभर कमांड देत होता. एका क्षणात तो की बोर्डवर कितीतरी बटनं दाबत होता.

"
हे तू काय करीत आहेस?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.

"
अरे हा पोलीस ऑफीसर जॉन आपल्या केसवर काम करीत आहे" कमांड1 ने की बोर्डवरची बटनं भराभर दाबता दाबता म्हटले.

"
मग?" कमांड2 ने विचारले.

"
त्याच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला कळायला नको का?" कमांड1 म्हणाला.

"
त्याच्या मनात काय चालले हे आपल्याला कसे कळणार?" कमांड2ने अविश्वासाने म्हटले.

"
हे बघ आता तो ऑनलाईनच आहे... आणि ही मेल मी त्याला पाठवितो आहे .... ही मेल त्याचा पासवर्ड ब्रेक करेल" कमांड1 आत्मविश्वासाने सांगत होता." पण... कसा काय ब्रेक करणार?" कमांड2 आश्चर्याने म्हणाला.

"
सांगतो सांगतो " कमांड1 ने मेलचे 'सेंड' बटण दाबले आणि पुढे म्हणाला,

"
हे बघ, ही मेल जेव्हा तो उघडेल तेव्हा त्याच्या कॉम्प्यूटरवर 'सेशन एक्सपायर्ड' असा मेसेज येईल. मग तो पुन्हा जेव्हा त्याचा पासवर्ड टाकायला जाईल तेव्हा तो आपल्या प्रोग्रॅम मध्ये टाकलेला असेल. मग तो आपला प्रोग्रॅम तो पासवर्ड आपल्यापर्यंत सुखरुप पोहोचता करेल."

कमांड1च्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य तरळले.

कमांड2ने कॉम्प्यूटरकडे पाहात अंतर्मुख झाल्यागत आपला व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवला.

"
काय दिमाख आहे !" कमांड2 त्याला प्रशंसेने म्हणाला.

"
हळू हळू तू पण शिकशील हे सगळं" कमांड1 त्याला आश्वासन देत म्हणाला.

"
तुझ्यासारखा गुरू मिळाल्यावर मला काळजी करण्याचं काय कारण?" कमांड1कडे उत्साहाने आणि अभिमानाने बघत कमांड2 म्हणाला.

कमांड1ची जास्तीत जास्त प्रशंसा करण्याच्या नादात कमांड2चा धक्का त्याने बाजूला ठेवलेल्या व्हिस्कीच्या ग्लासला लागला आणि तो ग्लास खाली फरशीवर पडून फुटला. त्याचे 4-5 तुकडे झाले. कमांड2 ते ग्लासचे तुकडे उचलू लागला.

कमांड1ने कॉम्प्यूटरवर काम करता करता एक धावता नेत्रकटाक्ष काच उचलणाऱ्या कमांड2कडे टाकला आणि पुन्हा तो आपल्या कामात गुंतून गेला.

"
इऽऽ" कमांड2 ओरडला.

"
काय झालं?" कमांड1ने विचारले.

"
अरे या काचेने बोट कापलं" कमांड2ने आपल्या वेदना लपविण्याचा प्रयत्न करीत कापलेल्या बोटाकडे निरखून बघत म्हटले.

"
बी ब्रेव्ह ... डोन्ट अॅक्ट लाइक किड " कमांड1 म्हणाला आणि मॉनिटरकडे बघत पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.

कमांड2ने तशाच रक्ताळलेल्या हाताने बाकीचे ग्लासचे तुकडे उचलले. तिथे एक पॉलीथीन बॅग पडलेली होती त्यात टाकले आणि त्या पॉलीथीनच्या बॅगला गाठ मारून ती बॅग घराच्या मागच्या बाजूला झाडीत टाकून दिली.

तेवढ्यात त्यांना एक मेल आलेली दिसली.

"
उघडली वाटतं त्यानं आपली मेल.... याला तर भलती घाई दिसते आपला पासवर्ड ब्रेक करुन घेण्याची" म्हणत कमांड1ने ती मेल उघडली. मेल ब्लँक होती. मेलमध्ये पासवर्ड आला नव्हता. अचानक कमांड1ने विद्युत गतीने कॉम्प्यूटर बंद केला.

"
काय झालं?" कमांड2 ने विचारले.

"
साला आपण विचार केला तेवढा हा येडा नाही.... त्याला शंका आलेली दिसते" कमांड1 म्हणाला.

"
मेल ब्लँक होती... म्हणजे असं असू शकते की त्याचा पासवर्डसुध्दा ब्लँक असावा" कमाड2ने आपला अंदाज सांगितला.

"
मि. कमांड2 ... इमेल पासवर्ड हा कधीही ब्लँक नसतो" कमांड1 आपल्या विशिष्ट शैलीत म्हणाला. "पण ...तू मग एवढ्या तडकाफडकी कॉम्प्यूटर का बंद केलास?" कमांड2 ने उत्सुकतेने विचारले.

"
अरे, जर त्याला शंका आली असेल तर तो आपल्याला ट्रेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार" कमांड2 म्हणाला.

"
अच्छा अच्छा" कमांड2 समजल्याचा आव आणीत म्हणाला.

कमांड1 व्हिस्कीचा ग्लास घेऊन त्याच्या जागेवरून उठला.

"
आपण इथे असं उघड्यावर बसायला नको" कमांड2 काळजी व्यक्त करीत म्हणाला.

"
का बरं?" कमांड1 ने ग्लास घेऊन एकीकडे जात म्हटलं.

"
नाही,... मी असं ऐकलं आहे की अमेरिकन सॅटेलाईटचे कॅमेरे जमिनीवरचं 10 बाय 10 इंच पर्यंत स्पष्ट बघू शकतात. त्यात आपण पण दिसू शकतो." कमांड2 काळजी दाखवित म्हणाला.

कमांड1 ग्लास घेऊन जाता जाता थांबला आणि मग हसायला लागला.

"
काय झालं?" कमांड2 ने आश्चर्याने विचारले.

"
अरे, हे अमेरिकन लोक की नाही प्रोपॅगँन्डा मध्ये फार एक्सपर्ट आहेत ...अरे, ते जर 10 बाय 10 इंच पर्यंत स्पष्ट बघू शकतात तर मग तो ओसामा बीन लादेन किती दिवसापासनं त्यांच्या नाकी नऊ आणतो आहे त्याला का ते पकडू शकत नाहीत?... हं हे खरं आहे की काही बाबतीत अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीला तोड नाही... पण एका खऱ्या गोष्टी बरोबर 10 खोट्या गोष्टीसुध्दा ठोकून द्यायच्या ही अमेरिकेची स्टाईलच आहे... एका खऱ्या गोष्टी बरोबर 10 खोट्या गोष्टी ठोकण्याला काय म्हणतात माहित आहे ?"

"
काय?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.

"
शुगरकोटींग ... तुला माहित आहे? ... र्वल्ड वार 2 मध्ये हिटलरची फौज शेवटच्या क्षणापर्यंत का लढली?" कमांड1 म्हणाला.

कमांड2 कमांड1 कडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागला.

"
हिटलरने प्रोपॅगॅन्डा केला होता की त्यांच्या सैन्यात लवकरच व्ही2 मिसाईल दाखल होणार आहे ... आणि जर ते मिसाईल त्यांच्या सैन्यात दाखल झाले तर ते जगावरसुध्दा राज्य करू शकणार होते" कमांड1 म्हणाला.

"
मग झालं होतं का दाखल ते मिसाईल?" कमांड2 ने विचारले.

"
कशाचं डोंबलाचं होते? ... असेल तर होईल ना" कमांड1 म्हणाला.

आता कमांड1 कॉम्प्यूटर पुन्हा सुरू करायला लागला होता.

"
आता कशाला सुरू करतोस? ... तो पुन्हा ट्रेस करेल ना" कमांड2 ने आपली चिंता व्यक्त करीत म्हटले.

"
नाही ... आता सुरू केल्यावर आपल्याला वेगळा आय. पी. अॅड्रेस मिळेल ... त्यामुळे तो आपल्याला ट्रेस नाही करू शकणार" कमांड1 कॉम्प्यूटर सुरू होण्याची वाट पाहत म्हणाला.

एव्हाना कॉम्प्यूटर सुरू झाला होता आणि मॉनिटरच्या उजव्या कॉर्नरला मेल आल्याचा मेसेजसुध्दा आला होता.

"
बॉसची मेल आहे" मेल उघडत कमांड1 म्हणाला.

त्याने मेल उघडली आणि मेल वाचायला लागला.

"
कमांड2..." कमांड1 ने आवाज दिला.

"
काय?" कमांड2 ने त्याला प्रतिसाद देत म्हटले.

"
आपल्याला पुढच्या कारवाईचे आदेश मिळाले आहेत" कमांड1 मेल वाचत म्हणाला.

कमांड2 कमांड1 च्या खांद्यावरून मेलमध्ये काय लिहिले आहे ते वाचायचा प्रयत्न करू लागला.

(
क्रमशः ...)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive