Monday, June 14, 2010

डाळी, फळे, दूध आणखी महागले

डाळी, फळे, दूध आणखी महागले

सलग दुस-या आठवड्यात, गेल्या २९ मे रोजी संपलेल्या आठवड्याअखेर अन्नधान्यांच्या घाऊक भावांवर आधारित निर्देशांक ('फूड इन्फ्लेशन') वाढून १६.७४ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे महागाईला आळा घालण्यासाठी भारतीय रिर्झव्ह बँक पुढील महिन्यात चलनपुरवठा कपातीचे उपाय पुन्हा अवलंबील, असा अंदाज आथिर्क विश्लेषकांकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे.

आधीच्या, २२ मे २०१० रोजी संपलेल्या आठवड्यात 'होलसेल फूड प्राइस इंडेक्स' १६.५५ टक्क्यांवर होता. फळे, डाळी आणि दुधाच्या भावांत झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. डाळींचे भाव ३१ टक्क्यांनी, दुधाचे २१. टक्क्यांनी, तर फळांचे भाव १८. टक्क्यांनी वाढले आहेत. तांदूळ आणि गहू ही कडधान्ये अनुक्रमे टक्क्यांनी महागली आहेत. मात्र बटाटा कांदा अनुक्रमे ३०.८७ १२.२७ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत.

रिर्झव्ह बँक येत्या २७ जुलै रोजी चालू २०१०-११ आथिर्क वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा आढावा जाहीर करणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी रिर्झव्ह बँक चलनपुरवठा कपातीचे उपाय पुन्हा योजण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

'
क्रिसिल' या पतनिर्धारण संस्थेचे चीफ इकॉनॉमिस्ट डी. के. जोशी यांच्या अंदाजानुसार शेतीच्या पुढील हंगामापर्यंत 'फूड इन्फ्लेशन' ठराविक मर्यादेत खालीवर ('रेंज बाउंड') राहील, कारण अन्नधान्यांच्या भावांत सतत घट झालेली नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर कडधान्यांच्या भावांत घट अपेक्षित आहे. म्हणून चालू आथिर्क वर्षाच्या उत्तरार्धात 'फूड इन्फ्लेशन' कमी होईल, असा श्री. जोशी यांचा अंदाज आहे.

आठवडा ते आठवडा तुलनेत 'बीफ'चा भाव टक्क्यांनी, सागरी मासे टक्क्यांनी, तूर डाळ (अरहार), मूग प्रत्येकी टक्क्याने वाढला आहे. मात्र बाजरीच्या भावात एक टक्क्याने घट झाली आहे.

याच आठवड्याच्या प्रारंभी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉण्टेक सिंग अहलुवालिया यांनी सांगितले होते की, 'इन्फ्लेशन' (सर्व वस्तूंच्या घाऊक भावांवर आधारित निदेर्शांक) वर्षअखेरीस घटून ते टक्क्यांवर येईल. गेल्या एप्रिलमध्ये घाऊक किंमत निदेर्शांक ('होलसेल प्राइस बेस्ड इन्फ्लेशन') मार्चपेक्षा किंचित कमी, म्हणजे .५९ टक्क्यांवर होता. रिर्झव्ह बँकेने चालू आथिर्क वर्षात 'होलसेल प्राइस बेस्ड इन्फ्लेशन' . टक्क्यांवर राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive