Tuesday, June 8, 2010

कसाबसाठी दोन वकिलांची नेमणूक

कसाबसाठी दोन वकिलांची नेमणूक

 

मुंबईवरील २६ / ११ हल्ल्याप्रकरणी विशेष कोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारा क्रूरकर्मा अतिरेकी अजमल आमीर कसाब याची केस हायकोर्टात चालवण्यासाठी दोघा ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. अमीन सोलकर फरहाना शहा हे हायकोर्टात आता कसाबची केस लढणार आहेत.

२६ / ११ च्या काळरात्री १६६ निरपराध लोकांचे निर्घृण बळी घेणारा क्रूरकर्मा कसाब याला विशेष कोर्टाचे न्या. एम. एल. टाहलियानी यांनी मरेपर्यंत फासावर लटकवण्याची शिक्षा गेल्या मे रोजी दिली होती. विशेष कोर्टाच्या या निर्णयाला कसाबने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. हायकोर्टात खटला चालवण्यासाठी आपणाला वकिल द्यावा, अशी विनंती कसाबने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे केली होती. त्यानुसार आता अमीन सोलकर फरहाना शहा यांना कसाबचे वकिलपत्र देण्यात आले आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख मुख्य न्यायमूर्ती जे . एन . पटेल यांनी या नेमणुका केल्या आहेत.

२६ / ११ खटल्याच्या वेळी कसाबला न्याययंत्रणेच्या वतीने वकिल उपलब्ध करून देण्यात आला होता . आधी अॅड . अब्बास काझमी आणि नंतर अॅड . के . पी . पवार यांनी कसाबचे वकिल म्हणून काम केले .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive