Monday, June 14, 2010

आयफोन-४ आणि सायकल चार्जर iPhone-4 and Nokia Cycle Charger

आयफोन-४ आणि सायकल चार्जर

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोबाइलच्या जगात दोन महत्त्वाच्या बातम्या आल्या. एक ही की, अॅपलने व्हिडिओ चॅट, -बुक रिडरसारख्या हायटेक सुविधा असलेल्या आयफोन- चे लॉंचिंग केले. हा आयफोन किती भारतीयांना परवडेल माहीत नाही, पण दुसरी बातमी ग्रामीण भारतासाठी महत्त्वाची. ती म्हणजे नोकियाने लाँच केलेल्या सायकलवर चालणाऱ्या मोबाइल चार्जरची.

 

एकाच जगातल्या पण दोन टोकावरच्या या बातम्या. एक भविष्याचा वेध घेणारी तर दुसरी हे भविष्य जर आपल्याला गाठायचे असेल तर पायाभूत सुविधांचा आधी विचार करायला हवा हे सांगणारी. भारतासारख्या देशाला आज जरी आयफोनचे स्वप्न पडत असले तरी तो चार्ज करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी वीज नाही हे वास्तव कसे नाकारता येणार?

 

अॅपलचा आयफोन हे क्रांतीच्या दिशेने टाकेलेले पुढले पाऊल आहे. नुसताच संवाद नाही तर तो साधणाऱ्यांना एकमेकांचे चेहरेही यात दिसू शकतील. या व्हिडिओ चॅटसाठी त्याच्या दोन्ही बाजूला कॅमेरा आहे. तसेच पुस्तके कागदाची असतात हे विसरायला लावणारा -बुक रिडरही त्यात असेल. त्याशिवाय इंटरनेट, नेटवकिर्ंग वगैरे सारे काही असेलच.

 

एवढ्या साऱ्या गोष्टी नेहमी कुठे लागतात, असे कदाचित आपल्याला आज वाटेलही, पण हेच स्मार्टफोन वेगाने देशातील बेसिक फोनची जागा घेतील. नाही तरी पंधरा वर्षापूवीर् जेव्हा लँडलाइनही महाग वाटत होता, तेव्हा आपण मोबाइल वापरू असे स्वप्नात तरी वाटले होते का?

 

मार्च २०१० च्या आकड्यानुसार भारतातील मोबाइल असणाऱ्यांची सख्या ५८ कोटींच्यावर आहे. दर महिन्याला त्यात दोन कोटी नव्या मोबाइलवाल्यांची भर पडतेय. ही सारी क्रांंती आहे आणि आपण ती स्वीकारलीय, हे वास्तव आहे. तरी प्रश्न फक्त हाच उरतो, की या क्रांतीची नक्की दिशा काय?

 

आपल्याकडे मोबाइलची संख्या नुसती वाढतेय असे नाही त्याचा वापरही बदलतोय. एकाकडे दोन मोबाइल असणे, डबल सिम कार्डचा मोबाइल वापरणे हे आता सर्रास होताना दिसतेय. ब्लुटूथ, इंटरनेट वगैरे तर आहेच. एवढंच नाही तर काही मोबाइलवर आता टीव्ही वगैरेही दिसतो.

 

बरं आतापर्यंत नोकिया, सोनी अशा काही मोजक्या कंपन्याच बाजारात होत्या. आता तर मॅक्स, मायक्रोमॅक्स, फ्लाय, कार्बन अशा कंपन्याही जोमाने उतरल्यात. त्यामुळे अॅडव्हान्स मोबाइलच्या किमतीही अगदी दीड-दोन हजाराच्या टप्प्यात आल्यात.

 

मोबाइलसोबत त्यांच्या अॅक्सेसरीजची मागणी वाढलीय. म्हणूनच तर नोकियाने अवघ्या ८५० रुपयात सायकल चार्जर आणालाय. तो वापरून तुम्ही सायकल चालवता चालवता वीज वापरताही मोबाइल चार्ज करू शकाल.

 

पण एकीकडे ही संपर्कक्रांती घडत असताना युनिसेफचा अहवाल सांगतोय, की आपल्याकडे स्वच्छतागृहांची संख्या मोबाइलपेक्षा कमी आहे. मानसशास्त्रज्ञ समजावताहेत, की परस्परांमधील संवाद कमी होतोय. त्यामुळे घटस्फोट वाढताहेत, तणाव वाढतोय. मग आपल्याला आधी मोबाइल हवाय की या मुलभूत गोष्टी, याचा विचार आधी करणे गरजेचे आहे?

 

या प्रश्नाचे उत्तर कोणालाच देता येणार नाही. कारण आपल्याला मोबाइलही हवाय आणि वीज, पाणी, स्वच्छता या मुलभूत समस्यांवर उपायही. खरं तर आपला दृष्टिकोन आपणच ठरवायला हवाय. तुमच्याकडे वीज नसेल तर तो सायकलवर चार्ज करा, हा समस्यांवरचा उपाय म्हणायचा की मोबाइल कंपन्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी?


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive