Sunday, July 18, 2010

व्यायामाने आजार पळवा - आत्मघात कशासाठी?...

व्यायामाने आजार पळवा

 

'प्रीव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर' असं म्हटलं जातं, ते अगदी खरं आहे. औषधं घेऊन आजार पळवण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. यासाठी 'अॅन

 

ॅपल डे...'प्रमाणे रोज केलेल्या व्यायामामुळे डॉक्टरांपासून लांब राहणं शक्य आहे.
.................

दररोज नेमाने व्यायाम करणाऱ्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण २० ते ५० टक्क्यांनी कमी होतं. म्हणूनच आपलं आरोग्य नीट राखण्यासाठी, आपल्या शरीराचं कार्य नीट सुरू राहण्यासाठी रोज व्यायाम करायलाच हवा.

रोज व्यायाम करायचा म्हटलं, तर आता प्रश्न पडतो की नक्की किती व्यायाम करायचा? याचं नेमकं उत्तर म्हणजे आठवड्याला कमीतकमी पाच दिवस ३० मिनिटं व्यायाम करायला हवा. या नियमित व्यायामामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येतील.

ओबेसिटी : लठ्ठपणामुळे डायबेटीस, हृदरोग, हायपर टेन्शन, ऑस्टिओआर्थ्रायटिस तसंच श्वसनविषयक आजार बळावण्याची शक्यता वाढते. योग्य आहारा आणि व्यायाम यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

डायबीटीस : व्यायाम शरीरारसाठी आवश्यक आहे. कारण, यामुळे हृदरोगाची शक्यता कमी होते, वजन, शरीरातील साखरेचं प्रमाण आणि कोलेस्टोरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

हायपर टेन्शन : नियमित अॅरोबिक पद्धतीचे व्यायाम केल्याने आकुंचन आणि प्रसरण पावणाऱ्या हृदयाच्या स्नायूंमधील रक्ताचा दाब नियंत्रणात ठेवतो. याचा परिणाम म्हणजे टेन्शनमुळे बिघडणारं मानसिक संतुलन नियंत्रणात राखणं शक्य होतं. चालणं, सायकलिंग, पोहणं यासारखे व्यायाम यासाठी करणं योग्य!

आर्थ्रायटिस : व्यायाम करण्याचा दूरगामी दुष्परिणाम म्हणजे या आजाराला सामोरं जाणं. व्यायाम केल्यामुळे शरीर लवचिक बनतं. पण, व्यायामाच्या अभावी शरीर कडक बनतं आणि परिणामी सांधेदुखीसारख्या आजार मागे लागतो. स्ट्रेचिंगसारखा व्यायाम हा आजार टाळण्यासाठी करता येईल.

ऑस्टिओपोरोसिस : आपल्या शरीराचा सांगाडा २०६ हाडांनी बनलेला असतो. सापळ्यांच्या या रचनेनेच शरीराला आकार मिळत असतो. हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअमची गरज असते. रोज व्यायाम केल्याने हाडांमध्ये कॅल्शिअम पोहोचवण्याचं काम योग्य पद्धतीने होतं.

हृदरोग : नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात. तसंच हृदयाचं आणि रक्तवाहिन्यांचं कार्य सुरळीत चालतं. सुस्थित असणारं हृदय ताणतणाव, हार्ट अॅटॅक आणि इतर हृदरोगांचा योग्य पद्धतीने सामना करू शकतं.

 

 

आत्मघात कशासाठी?

 

विद्यार्थी आणि कर्जबाजारीच नव्हे तर मुलेबाळे असणारे आईबापही अलीकडे आत्महत्या करत आहेत. अमेरिकेसारख्या समृद्ध संपन्न देशांनाही वाढत्या आत्मघातांची काळजी वाटते आहे. मात्र, शास्त्रज्ञ आता आत्मघाताला कारण ठरणा-या मेंदूतील रसायनांपर्यंत पोहोचत आहेत. यातूनच उद्या उपचारांची दिशाही स्पष्ट होईल. मग परीक्षांचे निकाल लागले की, आत्महत्यांची लाट येणार नाही..उमलत्या तरुणांचे अमूल्य प्राण वाचतील...

......

आता आत्महत्येच्या बातम्या रोजच्याच झालेल्या आहेत. कर्जबाजारी शेतकरी आणि निराश, भयग्रस्त विद्यार्थ्यांपाठोपाठ हे लोण आता विवाहितांमध्येही पसरत आहे. आता एकेका परीक्षेचा निकाल लागू लागेल तसतशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येऊ लागतील. एखादा जवळचा मित्र, नातेवाईक किंवा जीवलग आत्महत्येचा बळी ठरतो. तेव्हा आपण कळवळून स्वत:ला विचारत राहतो, 'त्याने/तिने असं का केलं असावं? त्यांना काही मदत मिळाली नसेल का?' या त्रयस्थ विचारांपेक्षाही अधिक वेदना देणारा विचार म्हणजे, 'ही आत्महत्या टाळण्यासाठी मी काही करू शकलो असतो का?'

आत्महत्येस प्रवृत्त होणारे किंवा आत्महत्येच्या विचारांशी खेळणारे सारेच मनातून खूप एकाकी बनलेले असतात. तरीही ते आपल्या विचारांचा थांगपत्ता आसपासच्या कुणालाही लागू देत नाहीत. त्यामुळे या विषयाचा गहन अभ्यास करणारेही बुचकळ्यात पडलेले दिसतात. अनेक ख्यातनाम अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, ही मंडळी इतकी वैफल्यग्रस्त एकाकी बनतात की आपलं कुणीच नाही ही भावना त्यांच्या मनात प्रबळ होते. इतकंच काय, परमेश्वरावरील त्यांची श्रद्धादेखील डळमळीत झालेली असते.

मानवी मनातील आत्महत्येच्या विचारांचा थांग घेण्यासाठी हॉर्वर्ड युनिव्हसिर्टी आणि मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी एकत्रित काम करून 'इप्लिसिट असोसिएशन टेस्ट' नाकाची मानसिक विश्ोषण पद्धत शोधून काढली. या पद्धतीद्वारे मानवी जीवन, मृत्यू आत्महत्या यांची सांगड घालता येते मानवी मनात खोल दडलेल्या भावनांचा जोडशब्दांच्या आधारे उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. अनवधनाने 'मृत्यू मी' अशा प्रकारे शब्दांची जोडी तयार करणारे रूग्ण आत्महत्त्येस प्रवृत्त झाल्याचे आढळून आले. याउलट 'जीवन मी' अशी शब्दांची जोडी नकळत निवडणारे जीवनाविषयी आशावादी असल्याचे आढळून आले. मृत्यू तसेच आत्महत्या या विषयीच्या भावभावना जाणून घेणे हा या विश्लेषणाचा गाभा असून, इतर चाचण्यांपेक्षा आयएटी विश्लेषण पद्धत वरचढ असल्याचे आढळून आले आहे. हे मूलभूत संशोधन रुग्णांची मानसिकता हुडकून काढण्यासाठी करण्यात आले होते. पण त्यातून सर्व थरांच्या समाजाला भेडसावणाऱ्या एका समस्येवर उपाय करण्याची एक चावी संशोधकांना गवसली आहे.

* * *

अमेरिकेसारख्या विकसित देशात दरवषीर् १५ ते २४ वयोगटातील चार ते आठ लाख तरूणआत्महत्येस प्रवृत झालेले आढळतात. एवढे वैफल्य आणि एकाकीपण तिथल्या गतिशील जीवनात भिनलं आहे. अमेरिकेतील हाफकिन्स चिल्ड्रन्स सेंटरमधील मानसशास्त्रज्ञांनी या गोष्टीचा शास्त्रोक्त छडा घेतला. तेव्हा त्यांना आढळले की मानसिक आघातानंतरची भयग्रस्त स्थिती तरुणांना आत्महत्येला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, मुलांचे लैंगिक शोषण झाले तर त्याचा फार मोठा आघात मनाशी बाळगत मुले वाढतात आणि त्या धक्क्यामुळे आत्महत्येच्या विचारांकडे ढकलले जात राहतात. शेवटी आत्मघात करण्यास तयार होतात.

स्वीडनच्या गटेनबर्ग युनिव्हसिर्टीतील शास्त्रज्ञांनी अलीकडेच १८ ते ६९ वषेर् वयाच्या १६५ मानसिक रुग्णांची पाहणी केली. त्यांनी निदानाशाची विविध कारणे आणि आत्महत्येची प्रवृत्ती यांचा संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, त्यांना आढळले की झोप उडवणाऱ्या अन्य कुठल्याही बाबीपेक्षा, ज्यांना दु:स्वप्ने पडतात अशी मंडळी आत्मघाताचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात. अवाजवी अपेक्षा, समजूतदारपणाचा अभाव, खालावलेला आत्मविश्वास, नैराश्यवृत्ती, उदासीन दृष्टिकोन, इतरांशी सतत तुलना, यासारखी दोषवैशिष्ट्ये माणसाला दु:स्वप्नांच्या खाईत लोटतात. मग ते दु:स्वप्नांचे शिकारच बनतात. त्याचा शेवट अखेरचे आततायी पाऊल उचलण्यात होतो...

या संदर्भात, स्वीडिश संशोधकांना एक वेगळी पण विचित्र बाब आढळून आली. १९७३ ते ८० या काळात जन्मलेल्या तीन लाख वीस हजार पुरूषांच्या जीवनशैलीची पाहणी केली आणि त्यांच्या जन्मापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या जीवनाचा शोध घेतला. तेव्हा, त्यांना समजले की जी मुले जन्मत: ४७ सेंटीमीटरपेक्षा कमी उंचीची होती, त्यांच्यात प्रौढपणी आत्महत्येची प्रवृती वाढीस लागली होती. विशेषत:, तरूण वयात या मुलांनी चांगली बऱ्यापैकी उंची, आरोग्यदायी शरीर कमवूनही त्यांची आत्मघातकी प्रवृती कमी झाली नव्हती. गळफास, स्फोटक पदार्थांचा वापर, सुरीने भोसकणे, धावत्या गाडीखाली उडी मारणे किंवा बुडून मरण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार त्यांच्याबाबत घडले होते. त्याचप्रमाणे तरूणपणी कमी उंची लाभणारे पुरूषदेखील, उंच तरूणांच्या तुलनेत जास्त प्रमाणात स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न करतात, हेदेखील या पाहणीत आढळले. जी गत उंचीची, तीच वजनाची! जन्मत: कमी वजन असलेली मुले प्रौढवयात आत्मघाताच्या विकृतीचे बळी ठरतात. मग, 'प्री-मॅच्युअर' जन्म घेणाऱ्या मुलांचे तर विचारायलाच नको. या सगळ्याला मेंदूतले सेरोटोनिन नावाचे रसायन कारणीभूत असावे, असा संशोधकांचा कयास आाहे. त्याची पातळी कमी असली की मानवी स्वभावात आक्रस्ताळेपण येतो त्याची आत्मघातकी प्रवृत्ती बळावते. पूर्ण वाढ होणाऱ्या अर्भकात तसेच शारीरिक त्रुटी घेऊन जन्मणाऱ्या मुलांच्या मेंदूत मोठेपणी हे रसाायन हव्या तितक्या प्रमाणात निर्माण होऊ शकत नाही. मग ही कमतरता त्यांना आत्महत्येच्या दिशेने ढकलत राहते.

अशा रीतीने मन आणि भावनांची उलथापालथ करणाऱ्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या रसायनांपर्यंत हळुहळू शास्त्रज्ञ पोहोचत आहेत. त्यातूनच उपचारांचीही दिशा उद्या सापडेल. मग परीक्षांचे निकाल लागले तरी आत्महत्यांची लाट उसळणार नाही.

 

 

ब्रेकफास्ट करा

 

वजनियंत्रणात ठेवण्यासाठी तर काही जण ऑफिसला निघण्याच्या घाईमुळे सकाळच्या नाश्त्याला सुट्टी देतात. पण, नाश्ता घेता दिवसाची सुरुवात करणं योग्य नाही.

 

आरोग्य खरंच जपायचं तर रोज ब्रेकफास्ट घ्यायला हवा. ताजी फळं, टोस्ट, मोड आलेली कडधान्य, ओट यांचा समावेश असणारा हेल्दी ब्रेकफास्ट आरोग्याबरोबरच तुमचा दिवसही फ्रेश बनवेल.

.....

रोज नियमितपणे संतुलित आहार घ्यावा, असं आपण शाळेच्या दिवसांपासून शिकत असतो. काही जण त्याचं काटेकोरपणे पालन करतात तर काही जणांना याचं फारसं महत्त्व वाटत नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी चौरस आणि संतुलित आहार जेवढा महत्त्वाचा तेवढंच रोजच्या रोज सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट घेणंही आवश्यक असतं.

टोस्ट, ताजी फळं, ओट्स, कोंडा/भुसा असा फायबरयुक्त नाश्ता सकाळी घ्यायला हवा.

फायबर फॅक्ट : धान्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या दरम्यान त्यातील शरीरासाठी आवश्यक फायबर (तंतूमय पदार्थ) निघून जातं. म्हणूनच नेहमी अख्ख्या ग्रेन प्रोडक्ट्सचा आहारात समावेश व्हावा, असं सांगितलं जातं. यासाठी ब्राऊन राइस, होल ग्रेन ब्रेड यामधून अधिकाधिक प्रमाणात फायबर मिळवता येईल.

फायबरची आवश्यकता :

*
तंतूमय पदार्थांमुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं.

*
कोलेस्टोरॉल लेव्हल कमी होते.

*
वजन नियंत्रणात राहतं.

फायबर फूड्स :

*
ज्यूसऐवजी ताजी फळं खा. फळांच्या सालीत, बियांमध्ये आणि गरात फायबर अधिक प्रमाणात असतं.

*
मोड आलेली कडधान्यं अधिक प्रमाणात खावीत.

*
नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स, रागी, ज्वारी, बालीर्, ब्राऊन राइस, ओटमील या पदार्थांचा समावेश करा.

*
पोहे, उपमा यासारख्या पदार्थांमध्येही फरस बी, गाजर, बीट यासारख्या भाज्या टाकता येतील.

*
नाश्त्यासाठी चपाती-भाजी हाही चांगला पर्याय आहे.

*
पदार्थ खूप शिजवू नका. खूप शिजवल्याने त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं. चावता येतील आणि पचायला जड जाणार नाहीत इतपतच शिजवा किंवा वाफवा.

*
नट्स, सीड्स, मोड आलेली कडधान्य अधिक प्रमाणात खावीत.

हे लक्षात ठेवा :

*
भरपूर पाणी प्या : दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवं. कमीतकमी ते १० ग्लास पाणी प्या. फायबरयुक्त पदार्थांचं योग्य पचन होऊन त्यांचं कार्य नीट व्हावं, यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं.

*
फळांची साल काढायची की नाही असा प्रश्नही बऱ्याचदा आपल्याला सतावत असतो. खरं तर फळांच्या आणि काही भाज्यांच्या सालीतून अधिक प्रमाणात फायबर मिळतं. फळापेक्षा ७५ टक्के अधिक फायबर सफरचंदाच्या सालीतून मिळतं. पण, सालासकट फळं किंवा भाज्या खाताना त्या स्वच्छ धुवून घ्यायला विसरू नका.

*
टोमॅटोसारखी फळं बियांसकट खायला हवीत. कारण या फळांमधील बिया काढून टाकल्याने त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं.

 

 

 

कशासाठी? पोटासाठी...

 

साधारणपणे मध्यमवयीन आणि तरुणांना भेडसावणारी समस्या म्हणजे सुटलेलं पोट. घरच्यांचे, मित्रमैत्रिणींचे टोमणे ऐकून ऐकून हे लोक जिम जॉइन करतात. पण, पोटा

 

चा आकार कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच इतरही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. सांगताहेत, जिम ट्रेनर रोहन कदम

.......

व्यायाम सुरू करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. माणसाच्या शरीराचे तीन प्रकार पडतात :

*
एण्डोमॉर्फिक : हे लोक जन्मजात जाडे असतात. त्यांना वजन कमी करण्यासाठी - महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या लोकांनी वेट ट्रेनिंगपेक्षा काडिर्यो एक्झरसाइझेसवर भर द्यायला हवा.

*
अॅक्टोमॉफिर्क : अशा लोकांची अंगकाठी सडपातळ असते. त्यांनी चांगल्या आहारासोबत वेट ट्रेनिंगवर भर द्यावा.

*
मेसोमॉर्फिक : साधारणपणे या वर्गात बहुतांश लोक मोडतात. या गटातील व्यक्ती आपलं वजन सहजपणे वाढवू किंवा कमी करू शकतात.

सुरुवातीला कोणता व्यायाम?

*
सुरुवातीला महिनाभर आठवड्यातून तीन दिवस ट्रेनरच्या सल्ल्याने वेट ट्रेनिंग करा. उरलेले तीन दिवस योगा, स्ट्रेचिंग तसंच स्विमिंगसारखे काडिर्यो एक्झरसाइझेस करावेत. यामुळे शरीरात स्टिफनेस येत नाही.

*
दर - आठवड्यानंतर आपलं व्यायामाचं शेड्यूल बदलून घ्या. शरीराची वाढ होत नसल्यास ओव्हरट्रेनिंग करता आहारही तपासून पहा.

*
शक्य असल्यास मसाज आणि स्पा थेरपी घ्यावी.

*
तीन महिने व्यायाम केल्यावर याची सवय होते. ही सवय झाल्यानंतर आठवड्यातून दोन दिवस ४०-५० मिनिटं योगा, स्विमिंग किंवा कुठलाही मार्शल आर्ट प्रकार करा. यामुळे आपल्या स्टॅमिनात झालेली वाढ आणि ताकद यांचा अंदाज येऊ शकतो.

सप्लीमेण्ट :

*
सुरुवातीपासून सप्लीमेण्ट वापरू शकता. मात्र, त्यासाठी ट्रेनरचा सल्ला घ्या.

*
अॅमिनो अॅसिड, व्हे प्रोटिन, क्रिएटीन आणि ग्लूक्टॅमिन ही सप्लीमेण्ट ट्रेनरच्या सल्ल्याने १२ महिने घेऊ शकता.

*
१२ महिने एकसारखेच सप्लीमेण्ट नको.

*
वजन कमी करण्यासाठी सप्लीमेण्टचा वापर टाळा. त्यामुळे थायरॉइड ग्लँड्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पोट कमी करण्यासाठी :

*
कोणताही सेलिब्रिटी सांगतो म्हणून दर दिवशी अॅब्ज मारण्याची चूक करू नका. अॅब्जचे मसल्स पचनसंस्थेशी निगडीत असतात. ते दुखावल्यास पचनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. तसंच मसल्स विकसित होण्यास त्रास होतो.

*
तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आठवड्यातील दोन दिवसच पोटाचे व्यायाम करावेत.

*
पोटावरची चरबी आपण खातो त्या फॅट्समुळे वाढते. त्यामुळे ती कमी होण्यास - महिन्यांचा कालावधी लागतो.

*
त्यासाठी नियमित काडिर्यो एक्झरसाइझेस करणे गरजेचे आहे. यात धावणे, ट्रेडमिल वॉकिंग, सायकलिंग, क्रॉस ट्रेनरवर चालणं या गोष्टींचा समावेश असतो.

*
आहारावर नियंत्रण आवश्यक.

*
व्यायाम आणि आहार यांच्या संतुलनाने वजन कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*
पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.

 

 

बाह्योपचार

 

विविध तापमानातल्या पाण्याचा रोगनिवारण आणि आरोग्य रोपणासाठी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. त्यासाठी वैकल्पिक चिकित्सा पद्धती वापरण्यात ये

 

ते. जलचिकित्सा पद्धतीत विविध तापमानातल्या पाण्याचा वापर केला जातो. तापमानानुसार थंड (५५ ते ६५ अंश), साधारण (६५ ते ७५ अंश से.), तटस्थ (८० ते ९० अंश से.), कोमट (९० ते १०० अंश से.) आणि गरम (१०० ते ११० अंश से.) अशा प्रकारात पाण्याचे प्रकार पडतात. जलचिकित्सेचे बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार आहेत.

.........................

बाह्य जलचिकित्सा

) जलपट्टी: भारतात घरोघरी 'जलपट्टी' या पारंपरिक पद्धतीचा वापर होतो. तिला आधुनिक वैकल्पिक चिकित्सा पद्धतीत मान्यता मिळाली आहे. या पद्धतीत कापडी पट्टी किंवा पट्ट्या ठराविक भागावर वापरून चिकित्सा केली जाते. या पट्ट्या पाण्यात भिजवून डोकं, कपाळ, गळा, छाती, पोट आणि पाठीवर वापरण्यात येतात. हल्ली पट्ट्यांऐवजी रबरी पिशव्याही मिळतात. परंतु अडचण आणि जरूरीच्या वेळी कापड किंवा रूमालाचाही वापर सुलभ ठरतो. थंड पाण्याच्या पट्ट्याही उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी वापरल्या जातात. थंड पाण्यात रूमाल भिजवून प्रवासात तो तोंड वा डोक्यावर ठेवल्यास थंडावा जाणवतो. अशा जलपट्ट्या उष्णता, सूज (यकृत, पोट, जिव्हा, मूत्रपिंड, फुफ्फुस, छाती, डोकं, कंबरेची सूज) या समस्यांवर उपयोगी आहे. शिवाय ती ताप आणि हृदयरोगावरही फायदेशीर ठरते. डोक्याच्या लालीवरही गुणकारी आहे. गरम पाण्याच्या पट्ट्याही पाठ, पोट, डोकं, घसा, सांध्यावर वापरण्यात येतात. त्या घसा बसण्यासह घशाचे इतर विकार, सांधेदुखी, आवाज बसणं, गॅस, वायूविकार, अॅसिडिटी, अपचन, कावीळ, मलावरोध, आमवात, हगवण आदींवर उपयुक्त आहे.

) कंबर जलचिकित्सा : हा जलचिकित्सेचा सर्वात उपयुक्त प्रकार आहे. त्यात एका तांब्याच्या किंवा प्लास्टिकच्या टबात किंवा घंगाळात पेशण्टच्या कंबरेपर्यंत पाणी (गरम किंवा थंड) भरलं जातं. त्यासाठी साधारणत: चार ते सहा गॅलन पाणी वापरण्यात येते. त्या भांड्यात पेशण्टला बसवून थंड किंवा गरम पाण्याचा शेक दिला जातो. थंड पाण्याचा शेक (कोल्ड हिप बाथ) बद्धकोष्ठता, अपचन, लठ्ठपणा, गर्भाशय, कंबरदुखी, जळजळ, वीर्य कमतरता, नपुंसकता, हगवण, आमांश यावर उपयुक्त आहे. अशाच प्रकारचा गरम पाण्याचा शेक (हॉट हिप बाथ) लघवीचे विकार, स्त्रियांचे त्रासदायक ऋतुविकार, कंबरदुखी, सायटिका या विकारांवर गुणकारी ठरतो. साधारणत: हॉट हिप बाथनंतर कोल्ड हिप बाथ घ्यावा. समशीतोष्ण पाण्याचा (९० ते ९८ अंश से.) शेक कमरेला दिला जातो. त्यामुळे गर्भाशय, गर्भनलिका आदींची सूज उतरण्यास मदत होते

) पायांवर जलचिकित्सा/पायांचं स्थान : पायांवरची जलचिकित्साही लाभदायक आहे. थंड किंवा गरम पाण्याने भरलेल्या बादलीत पाय शेकले जातात. गरम पाण्याचा (११५ ते १२० अंश से.) पाच ते दहा मिनिटं शेक घेतला तर गर्भाशय, आतडं, कंबर, पोट आदींच्या नसा मोकळ्या होतात. संधीवात, सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. थंड पाण्याचा (४५ ते ५५ अंश से.) उपयोग स्प्रेनवर होतो. गुप्तरोगांवरच्या सूजेसाठी मात्र याचा उपयोग करू नये.

) पूर्णांग स्नान: नदी, समुद, तलावात अथवा नळाखाली पूर्णांग स्थान घेता येतं. बादलीत पाणी घेऊन तांब्याच्या लोट्यानेही आपण पूर्णांग स्थान घेतो. त्याला आपण 'आंघोळ' म्हणतो. नदीच्या स्थानात पूर्णांग, अर्धांग, पाय, हिप अशा सर्व प्रकारच्या स्नानांचा लाभ होता. थंड पाण्याने पूर्णांग स्नान करण्यापूवीर् डोकं, गळा, छातीवर पाण्याचे थोडे शिंतोडे टाकावेत. त्यामुळे पूर्णांग स्नानाची तयारी होते. हे स्नान साधारणत: वीस मिनिटं तरी घेतलं पाहिजे. परंतु लहान मुलं आणि वयस्कर लोकांनी हे स्नान टाळावं. पूर्णांग स्नान केल्याने ताप उतरतो, अवयवांची अंतर्गत सूज(गर्भाशय आदी) उतरण्यासही मदत होते. गरम पाण्यानेसुद्धा हे उपचार करता येतात. त्याचा उपयोग घशाचे विकार, फुफ्फुसाचे रोग, अवघडलेल्या नसा, सांधेदुखी(जुनी), स्थूलता, मूत्राशय आणि पित्ताशयाचे खडे आदींवर होतो.

) वाफेचं स्नान : यासाठी विशिष्ट खोली तयार करण्यात येते. थंड पाणी पिऊन त्यात जावं लागतं. त्यानंतर दहा ते वीस मिनिटं वाफ घ्यायची असते. ही पद्धती गर्भवती स्त्रिया, हृदयरोग, रक्तदाब, स्थूलता, मायग्रेन आदींवर गुणकारी ठरते. या स्नानातल्या वाफेमुळे अस्वस्थ वाटल्यास त्याचा वापर टाळावा. गुदमरल्यासारखं झालं तरी ते टाळावं.

अशा पद्धतीने बाह्य जलचिकित्सेचा वापर करण्यात येतो. अंतर्गत जलचिकित्सा कशी वापरायची ते आपण पुढच्या भागात पाहू.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive