Sunday, July 18, 2010

जगा पॉझिटिव्हली!

जगा पॉझिटिव्हली!

 

बाम लावून थांबेल, इतपत दुखण्याचा आवाका वाटत असलेल्या सुनीला बजाज यांना कॅन्सरचं निदान झाल्याने त्यांच्यासह कुटुंबाचं अवसानच गळालं. ब्रेस्ट कॅन्सरची ती तिसरी स्टेज होती. त्यांच्यासह सगळ्यांचं आयुष्य कॅन्सरग्रस्त झालं. पण, या धक्क्यातून तातडीने सावरत त्यांच्या कुटुंबियांनी मनाने उभारी घेतली आणि आयुष्याचा नूरच पालटला.

....

सरळ साधं आयुष्य... अगदी छोटी, आवाक्यात वाटणारी स्वप्नं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची अविश्रांत धडपड... आयुष्याकडून फार अपेक्षाही नाहीत... हवं फक्त सुखी, समाधानी जीवन... इतक्या छानशा चौकटीत बांधलेल्या आयुष्याची कड निसटली, ती साध्याशा वाटणाऱ्या छातीच्या दुखण्याने.

पेन किलर बाम लावून थांबेल, इतपत दुखण्याचा आवाका वाटत असलेल्या सुनीला बजाज यांना कॅन्सर असल्याचं निदान झाल्याने त्यांच्यासह कुटुंबाचं अवसानच गळालं. ब्रेस्ट कॅन्सरची ती तिसरी स्टेज होती. त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्यच जणू कॅन्सरग्रस्त झालं होतं. पण, आजाराचं दु: करत बसण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबियांनी उपचाराला प्राधान्य दिलं. या धक्क्यातून तातडीने सावरत त्यांच्या कुटुंंबियांनी मनाने उभारी घेतली आणि आयुष्याचा नूरच पालटला. त्यांच्या आयुष्याला एक नवसंजीवनी मिळाली. कॅन्सर झाला आहे म्हटल्यावर हातपाय गाळून बसण्यात अर्थच नव्हता. त्यातून मार्ग काढणं आम्हाला क्रमप्राप्त होतंच. त्यामुळेच हा प्रवास आईसाठी आणि आमच्यासाठी अधिक सुकर आणि चांगला असावा, असं आम्ही ठरवल्याचं त्यांची मुलगी मेघा बजाज सांगते.

'
आमची जॉइण्ट फॅमिली. आई, बाबा, आजी, आजोबा आणि आम्ही दोघी बहिणी. सगळ्या कुटुंबियांनी या कठीण प्रसंगात एकत्र येत आईला धीर देण्याचं ठरवलं आणि कॅन्सरशी उपचारांच्या माध्यमातून लढा सुरू झाला,' इति मेघा.

केमो थेरपी सुरू झाली. त्यामुळे त्याचे साइड इफेक्टही आलेच. आईचे केस गळायला लागले. त्या परिस्थितीत तिला पाहणं मुलगी म्हणून मेघाला अवघडच गेलं. पण, कॅन्सरचं वास्तव स्वीकारल्यामुळे त्यांनी या टप्प्यालाही पार करण्याचा धीर धरला. औषधोपचार सुरूच होते, ते पुढेही सुरू राहणार होते. पण, त्यावेळी सुनीला यांना खरी आवश्यकता होती, ती मानसिक उभारीची आणि तिच त्यांना कुटुंबियांकडून मिळाली. प्रामुख्याने मेघाच्या वडिलांनी प्रचंड धीराने सारे संकट पार केले. वागण्याबोलण्यात त्यांनी कधीही नकारात्मक सूर येऊ दिला नाही आणि हीच सुनीला यांच्या आयुष्यासाठी संजीवनी ठरल्याचं, मेघा नमूद करतात.

सुनीला यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही आनंदी राहण्याचे प्रेमळ आदेेश घरच्यांकडून गेले होते. त्यामुळेच भेटायला येणाऱ्यांकडूनही रडण्याचे हेल किंवा अवसान गळलेला आविर्भाव सुनीलांना पहावा लागला नाही. सतत मिळणारी ही पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्यासाठी जीवनदायी ठरली. साध्या रोगांवरही औषधोपचार झाले, की ते बरे होतात. अशाच पद्धतीने कॅन्सरकडे का पाहिले जात नाही, असा सवालही मेघा करतात. 'कॅन्सर म्हणजे मृत्यू' हे आयुष्याचं समीकरण आपणच बदलायला हवं, असं त्या आवर्जून सांगतात.

कॅन्सर पेशण्ट आणि त्यांच्या कुटुंबियांना पॅझिटिव्ह राहण्याची शक्ती मिळू शकते, ती ध्यानधारणेतून. याचा अर्थ तासन्तास देवाची करुणा भाकायची हा नाही, तर मन एकाग्र आणि प्रसन्न राहील, अशा गोष्टी सतत घरात असणं आवश्यक असतं. सतत नॉर्मल आयुष्य जगण्याची उमीर् बाळगायला हवी. बाजारहाट, खरेदी, पिक्चर, सेलिब्रेशन, पाटीर् सारं काही पूवीर्सारखं राहिलं तर होणारी वातावरणनिमिर्ती उपयुक्त ठरत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. स्वत: असं जगत असल्याने प्रत्येकाला अंतमुर्ुख करणारा जीवनाचा मार्गही त्यांनी सहजी सांगितला, तो म्हणजे पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह असणं!

आवडतं संगीत ऐकणं, बागेत फिरणं, गप्पाटप्पा, विनोद इतक्या साध्या गोष्टीही बदल घडवणाऱ्या असतात. रोज घरात दिवे लावून घर प्रकाशमान करणं, घरात छोटे कार्यक्रम, सणसमारंभ असणं यातून सुनीला यांना आनंदी राहण्यास मदतच झाल्याचं मेघा सांगतात. त्यामुळे आता त्या पूवीर्पेक्षाही अधिक चांगलं आयुष्य जगत आहेत. उपचारपद्धती अनेक आहेत. त्या कोणत्या स्वीकारायच्या, हा निर्णय प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. मात्र, मानसिक स्वास्थ्याला कोणत्याच उपचारपद्धतीत पर्याय नसल्याचं त्या आवर्जून स्पष्ट करतात.

जगायला शिकवणाऱ्या, आयुष्याकडे बघण्याची दृष्टी देणाऱ्या या अनुभवाला मेघा यांनी शब्दबद्ध केलंय ते 'थँक्यू कॅन्सर' या पुस्तकरुपाने. या पुस्तकात त्यांनी देशातील कॅन्सर होऊन तो बरा झालेल्या महिलांचे अनुभव दिले आहेत. हे अनुभव कॅन्सर पेशण्ट आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मेघा यांना वाटतो. तसंच कॅन्सरच्या उपचारपद्धती, योगा, रेकी मेडिटेशन, आहार याबाबतही पुस्तकात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कॅन्सर झाल्यावर हातपाय गाळणाऱ्या पेशण्ट आणि कुटुंबियांना उभारी मिळावी, यासाठीच हा पुस्तकप्रपंच केल्याचे त्या आवर्जून सांगतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive