Saturday, August 21, 2010

पशुपक्ष्यांना 'शरण्या'

पशुपक्ष्यांना 'शरण्या'


आधुनिकता आणि गतिमानता या समीकरणात अडकलेल्यांकडे आपल्याच जगात डोकावायला वेळ नाही. तर, पशूपक्ष्यांकडे कसं बघणार. यामुळेच मुक्या प्राण्यांसाठी 'शरण' संस्थेने चालवलेले कार्य कौतुकास्पद म्हणावे लागेल. 
................ 

पशूपक्ष्यांवर दया करा, भूतदया बाळगा अशी कितीही शिकवण दिली जात असली तरी, प्रत्यक्षात आपण फारच कमीजण याचं पालन करतो. स्थानिक स्वराज्य संस्था असोत अथवा खुद्द पशुपालक. अशा अनेकांच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे अलिकडे पशूपक्ष्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. वाढता उष्मा, वृक्षतोड, पाण्याचं दुभिर्क्ष्य अशा अनेकविध कारणांमुळे पशुपक्ष्यांच्या मृत्यूदरातही सातत्याने वाढ होत आहे. 

शहरातील मोकाट गुरं आणि कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न अनुत्तरित असताना, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना मात्र अत्यंत तोकड्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बालपणापासूनच भूतदया असलेल्या शरण्या शेट्टी आणि विनता अय्यर या दोघा मैत्रिणींनी गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक स्तरावर मोकाट प्राण्यांना अभय देतानाच, जखमी पशुपक्ष्यांना वैद्यकीय उपचार मिळवून दिलेत. वर्षभरापूवीर् त्यांनी 'शरण एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट'ची स्थापना केली आणि तेव्हापासून त्यांच्या कार्याने गती घेतली. 

संस्था स्थापण्यामागील हेतू स्पष्ट करताना विनता अय्यर म्हणाल्या की, 'जिल्ह्यात केवळ पशुपक्ष्यांसाठी सर्वकाही असणारी अशी एकही संस्था नव्हती, हे जाणून शरण्याच्या मनात संस्थेचा विचार आला. संस्थेच्या माध्यमातून प्राणीप्रेमींनी एका छत्राखाली एकत्र यावे, आमच्या कार्याला गती मिळावी आणि त्याची व्याप्ती वाढावी, हाच आमचा उद्देश आहे.' 

वर्षभरापूवीर् स्थापन झालेल्या या संस्थेने निवाऱ्यासाठी दोन जागा तयार केल्या आहेत. मोठी जनावरे, तसेच कुत्र्याची पिल्लं व पक्ष्यांसाठी स्वतंत्र नियोजन त्यात आहे. जखमी पशुपक्ष्यांच्या मदत व उपचारांसाठी स्वतंत्र टीम उभी केलीय. विशेष म्हणजे या संस्थेने कुत्र्यांच्या निबिर्जीकरणाचं स्वतंत्र सेवाही सुरू केलीय. त्यासाठी महापालिकेकडून एकही पैशाची मदत घेतली गेलेली नाही. रस्त्यावर पडलेले अपघातग्रस्त जनावरे, उष्म्यामुळे पडलेले जखमी पक्ष्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देतानाच, त्यांच्या खाण्याचीही चांगली व्यवस्था संस्थेतफेर् केली जाते. संरक्षित म्हणून घोषित असलेल्या पशुपक्ष्यांची सुटका करणे, भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक घेणे, तसेच लसीकरणासारखी कामेही संस्थेमार्फत केली जातात. 

लहान पक्षी आले तर संस्थेच्याच स्वयंसेवकांपैकी कुणाच्याही घरी त्याची व्यवस्था केली जाते. हे करताना प्राधान्य ठरवून वनविभागाला त्याची माहिती दिली जाते. संस्थेचा विस्तार व क्षमता वाढविण्याची मोठी अपेक्षा आहे. तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी अॅम्ब्युलन्स, अत्याधुनिक सोयींनीयुक्त हॉस्पिटल उभारण्याचा मानस शरण्या यांनी व्यक्त केला. या संकल्पपूतीर्साठी समाजातील प्राणीप्रेमींनी त्यांचा वेळ, पशुखाद्य, औषधे अशा स्वरुपात मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 'भटक्या कुत्र्यांची पिलं व परदेशी कुत्र्यांच्या पिलांमध्ये फरक करू नका. ते सारखीच माया देतात, इमान राखतात. त्यामुळे त्यांना अभय देण्याचं आवाहन विनता यांनी केलं आहे. 

संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांना लोकसहभागाची आवश्यकता आहे. केवळ जखमी पशुपक्षी दिसला की फोन करणयापुरता भूतदया नको, तर त्यात मनापासून सहभागाची अपेक्षा संस्थेकडून करण्यात आलीय. जगभरात केवळ २ हजारांच्या संख्येने असलेल्या अत्यंत दुमिर्ळ अशा 'ग्रेट हॉर्न्ड' प्रकारातील घुबडालाही या संस्थेनं ऋषिकेष नाझरे यांसारख्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने सुटका केलीय. साडेतीन फूट उंची असलेल्या या घुबडाच्या मुक्ततेचा अनुभव अविस्मरणीय असल्याचं विनता व शरण्या सांगतात. त्यांच्या कार्यात शशिकांत शेट्टी आणि सोनाली थिराणी यांचाही मोठा हातभार लागतो. कुटुंबाच्या खंबीर पाठबळाच्या बळावर 'शरण'ची अल्पावधीतील ही झेप निश्चितच प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. सहभागासाठी संपर्क : शरण्या - ९४२२२९२४३६ अथवा ९३७३७५७२३१. 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive