Friday, September 24, 2010

सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स!

सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स!

beauty


चेहर्यावर चमक आणण्यासाठी कोमट दुधात एक चमचा मध घालून त्यात लिंबाचा रस अंदाजे टाकून चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे आणि नंतर तो लेप चेहर्यावर लावावा.

प्रवास किंवा प्रदूषणामुळे त्वचार जर डगावली असेल तर एक टोमॅटो घेऊन त्याचे काप चेहर्यावर दहा मिनिटे व्यवस्थित घासा. आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने धुऊन टाका. हा प्रयोग केल्याने त्वचाचा काळेपणा दूर होतो.

पपईचा गर चेहर्यावर चोळावा सुकेपर्यंत तसेच राहू द्या नंतर धुऊन टाका. याने त्वचेला तजेला येईल.

मानेवरचा काळपटा दूर करण्यासाठी एक चमचा मैदा, एक चमचा मिल्क पावडर, एक चमचा काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस, चिमूटभर हळद एकत्र करून मानेला लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. मानेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

चाळीशीनंतर तुमची त्वचा सैल पडत जाते ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी हिरव्या द्राक्षांची पेस्ट चेहर्यावर लावावी. हे केल्याने त्वचेत कसाव येतो आणि त्वचा घट्ट होण्यास मदत मिळते.

जर उष्णतेमुळे सनबर्नचा त्रास झाला असेल तर तेथे दिवसातून दोन वेळा नारळाचं पाणी लावावे.

डोळ्याखाली डार्क सर्कल आले असल्यात बटाटा लॅव्हेंडर तेल पाण्यात शिजवून त्याचे काप डोळ्यांवर ठेवा. 10 मिनिटे राहू द्या. हा प्रयोक किमान महिनाभर तरी करावा त्याने नक्कीच फरक पडेल.



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive