Saturday, January 15, 2011

आयटीचं ज्ञान; मात्र हातात चहाची केटली!


 



विदर्भ आणी मराठवाडा भागातील तुमचे कोणी नातेवाईक किवा मित्र-मैत्रीण  पदवीधर असेल तर त्यांना मुंबई,पुणे , नासिक ला यायला सांगा .बाहेरच्या राज्यातून येवून लोक मुंबई,पुणे , नासिक मध्ये जॉब्स बळकावतात .विदर्भ आणी मराठवाडा भागातील लोक तर आमचे मराठी लोक आहेत 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागपूर - डोक्‍यात इन्फॉर्मेशन टेक्‍नालॉजीचं ज्ञान... संगणकाच्या की-बोर्डवर बोटांना थुईथुई नाचवण्याची क्षमता... वाणिज्य विभागाचा तो पदवीधर... परंतु नोकरी नसल्याने पोट भरण्यासाठी तिशीतल्या या युवकाने फुटपाथचा आधार घेतला. हाती केटली घेऊन तो चहा विकतो. नाव त्याचं कृष्णा पारिसे. त्याच्या या कष्टात अन्‌ संघर्षात त्याची सहचारिणी "अर्चना' मोलाची साथ देत पत्नीधर्म निभवते. दोघेही एकमेकांच्या साथीने माता कचेरीच्या रस्त्यावर चहाटपरीतून जगण्याची लढाई लढत आहेत. 

दोन वर्ग शिकले की, कष्टाचं काम करण्यास लाज वाटू लागते. शिक्षित अनेक मुलं शेतकरी कुटुंबातली असताना शेतीची कामं नाकारतात; परंतु कृष्णा आणि अर्चना हे दाम्पत्य ग्रॅज्युएट आहे. गरिबीशी झुंज देताना मात्र अथक परिश्रम करण्याची ते तयारी ठेवतात. काम त्यांच्यासाठी लहान-मोठं नाही. चहाच्या टपरीवर दिवसभर हातात केटली घेऊन ग्राहकांना चहा देण्यात कोणताही कमीपणा या दाम्पत्याला वाटत नाही; उलट पोट भरण्यासाठी त्यांनी स्वीकारलेलं स्वाभिमानी जिणं इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या जीवनसंघर्षातून स्वावलंबनाचा धडा मिळतो. 

कृष्णा हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्‍यातील "वासनी' गावचा. बारावीपर्यंत त्याचं शिक्षण अमरावती शहरात झालं. त्यानंतर तो नागपुरात आला. श्रीमंत मुलं शिकतात अशा बड्या "हिस्लॉप कॉलेज'मध्ये त्याने प्रवेश घेतला. "कॉमर्स'ची पदवी त्याने संपादन केली. पदवीसोबतच इन्फॉर्मेशन टेक्‍नालॉजीत (आयटी) त्यानं संगणकाचं उत्तम ज्ञान आत्मसात केलं. सी, सी- प्लस, सी-प्लस-प्लस, "जावा' असे अनेक संगणकशास्त्रातील प्रोग्राम कृष्णा शिकला; नव्हे, तो पारंगत झाला. दोन वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यतील "सावळापूर' येथील "अर्चना'शी त्याचं लग्न झालं आणि "ऍपटेक' संस्थेत काम मिळालं; परंतु ही संस्था बंद पडली आणि दोघांचंही जगणं रस्त्यावर आलं, असं कृष्णा म्हणाला. हे सांगताना त्याच्या आवाजात कणव होती. पत्नीला चहाटपरीवर आणावं लागतं याची त्याला स्वतःबद्दल चीड होती; पण पर्याय नव्हता. आयुष्यात केव्हातरी गरिबीचं ग्रहण सुटेल, या आशेवर त्याचा कठीण परिस्थितही जगण्याचा मार्ग सोडणार नसल्याचा निर्धार. तर एक दिवस कष्ट करून "जग जिंकेन' हा आत्मविश्‍वास कृष्णाने शांतपणे बोलून दाखवला. गरीब व्यक्ती आनंदी राहू शकते; परंतु आनंदी गरीब असू शकत नाही. जगताना मनाची श्रीमंती असली की, आलेल्या संकटावर सहज मात करता येते, हे कृष्णाचं जगण्याचं तत्त्वज्ञान. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात संगणकशिक्षितांना लई संधी आहेत, असं सांगण्यापुरतं सोपं आहे; परंतु गरिबांच्या घरापर्यंत उदारीकरणाचा, जागतिकीकरणाचा लाभ पोचतंच नाही. दरवाजात येऊन ते थांबतं. नोकरीसाठी बरेच प्रयत्न केलेत;

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive