Monday, January 17, 2011

रायगडावर असे जाऊ शकतो.


खूप धन्यवाद,

   पुण्याहून किती किलो मीटर असावा रायगड, आणि अंधारात गड चढताना वाटेत विजेचे दिवे आहेत का ?



१६ जानेवारी २०११ ३-४६ pm रोजी Dr. Anand Kulkarni ने लिहिलेः
रायगडावर जाणार असाल तर पुणे महाड गाडीने जा. सायंकाळ झाली तर महाडला मुक्काम करा. महाडहून दर अर्ध्या तासाला रायगडवाडी गाडी आहे. त्याने रायगडाच्या पायथ्याला खुबलढा बुरुजाजवळ उतरा. तेथून पायी चालत रायगडावर जा. रोप वे आहे, पण सह्याद्रीचे इतके डोंगरकडे असताना महाराजांनी राजधानीसाठी हाच डोंगर का निवडला याचा अनुभव घ्यायचा असेल तर रायगड पायी चढा आणि उतरा. सरळ पायवाट आणि मध्येच पाय-या आहेत. वरती गेल्यावर गंगा टाकं लागते. तिथून पुढे गेलात की रायगड जिल्हा परिषदेचे रेस्ट हाऊस आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूस जिथे रोप वे चा पाळणा येतो तिथे एम.टी. डी.सी. ची निवासस्थाने आहेत. त्याचे बुकिंग पुण्याच्या कार्यालयातून करुन घ्या.
खासगी गाडीने जाणार असाल तर पुण्याहून भोरला या. तेथून पुढे वरंध घाटातून महाडला या. मुंबई हायवेने मुंबईकडे जाऊ लागा. महाड शहर पास झाल्यावर लगेच एक चौक आहे. डाव्याबाजूचा रस्ता महाडमध्ये चवदार तळ्याकडे जातो. उजवीकडे वळा. हा रस्ता रायगडवाडीला जातो. रायगडाच्या पायथ्याला पाचाड नावाचे गाव आहे. तेथे राष्ट्रमाता जिजाऊंचा वाडा आणि समाधी आहे. त्याचे दर्शन घेऊन परत पाचाडला उलट या. रायगडवाडी, छत्रीनिजामपूर रस्त्याने थोडे चढून वर आलात की खुबलढा बुरुजाजवळ पोहोचता. तिथे गाडी पार्क करा. रायगडावर जा.
आनंद कुलकर्णी

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive