Wednesday, February 2, 2011

'मराठी'साठी मनसे आता ऑनलाइन

नोक-यांमध्ये मराठी टक्का वाढावा यासाठी फक्त राड्याची भाषा न वापरता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्या जगाचा ऑनलाइन फॉर्म्युला स्वीकारला आहे. यात मनसे मराठी युवक आणि रोजगार यांच्यात दुवा साधणार असून त्यासाठी http://www.mimarathinokri.com/home.html ही साइट वेबसाइट लाँच करण्यात आली आहे.

' जॉब प्लेसमेंट ' ची सेवा पुरवणा-या अनेक वेबसाइट इंटरनेटवर लोकप्रिय आहेत. त्याच साइटप्रमाणे फक्त मराठी युवकांसाठी सेवा पुरवणारी ही साइट आहे. ६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या साइटवर आतापर्यंत राज्यभरातल्या १२०० तरुण-तरुणींनी नोंदणी केली आहे, अशी माहिती मनसेच्या रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे उपाध्यक्ष अनिल फोंडेकर यांनी दिली.

आज जागतिकीकरणाच्या युगात विविध ठिकाणी नोक-या उपलब्ध असतात. पण माहितीच नसल्यामुळे, तिथपर्यंत पोहोचण्यात मराठी माणूस अपयशी ठरतो. ही अडचण दूर व्हावी, यासाठी मनसेने हे पाऊल उचलले आहे. युवकांकडून आलेली ही माहिती संकलित करून विविध कंपन्यांना पुरवली जात आहे.

या कंपन्यांकडे हव्या असणा-या प्रथम श्रेणी अधिका-यांपासून चतुर्थ श्रेणी शिपायांपर्यंतच्या विविध पदांसाठी त्यांना ही माहिती उपयोगी पडेल. त्यानुसार या कंपन्यांशी मनसेतर्फे सतत संपर्क ठेवण्यात येणार असून, त्यांचा अहवालही तयार करण्यात येणार आहे.

आतापर्यंत रिलायन्स, टाटा , नोकिया, व्होडाफोन, स्पँको, विडिओकोन, गोदरेज, बँक ऑफ अमेरिका, एसआर ग्रूप, अंबुजा, मॅक्सवेल, लार्सन अँड टुब्रो आदी कंपन्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले असून ही यादी दररोज वाढतच असल्याचे फोंडेकर यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क - ०२२- २२६३४३०३, २२६३४३०४


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive