Wednesday, September 21, 2011

धिरुभाई अंबानी कथा - Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi

सुरस कथा मार्केटिंगच्या

Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi
कथा

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLDRBEDtdjQC3oQga6xRtT-KK-auIhYxphVLN9u7W1CD9qbgrouoTU4Q2RPdBRYtDKvIAY8BMa34DLZSstsllI0cMdCDjnWFBV8dB49eJyqBgML2O18FhLxZHKbEYZipEliyYwnggTHkcR/s1600/dhirubhai-ambani.jpg
धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक्षक होते. त्यांचे मॅट्रीक पर्यंतचे शीक्षण गुजरातमधे, ते सुध्धा गुजराती माध्यमातुन झाले. मग त्यांना एडनला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर दहा वर्षे सेल्समनची नोकरी केली व ते भारतात परत आले. प्राथमीक शीक्षकाचा मुलगा, फक्त मॅट्रीकपर्यंतचे शीक्षण, कुटुंबाला कोणत्याही प्रकारची उद्योग व्यवसायाची पार्श्वभुमी नाही, एडनमधील पेट्रोल पंपावरचा अनुभव ही क्वालिफिकेशन्स घेऊन धिरुभाई मुंबईला परतले. हा त्यांच्यावर ‘फॉरीन रीटर्न’ चा शिक्का मात्र जरुर बसला. या शिक्यावर त्यांना चांगल्या नोकर्याय जरुर मीळत गेल्या असत्या. पण ते भारतात परतले ते नोकरी करायची नाही असे ठरवुनच!
जगामधे कापडाला, म्हणजेच टेक्सटाईलला मोठी मागणी असते हे त्यांनी ओळखले. भारत त्या वेळी कापड उद्योगात एक आघाडिचा देश होता. त्यामुळे त्यांनी कापड निर्यातिच्या ( Textile Export ) व्यवसायात उतरायचे ठरवले. यात अनंत अडचणी होत्या. मुंबईसारख्या ठिकाणी धंद्यासाठी जागा मीळणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी चाळिच्या एका खोलितुन व्यवसायाला सुरवात केली. कंपनिचे नांव रिलायन्स ठेवले व कापड निर्यातिच्या व्यवसायाला 1966 साली सुरवात केली. पण थोड्याच काळात धिरुभाईंच्या लक्षात आले की परदेशामधे ज्या उच्च दर्जाच्या कापडाची मागणी असते त्या उच्च दर्जाचे कापड भारतात तयार होत नाही. मग त्यांनी स्वतःच अशा प्राकारच्या उच्च दर्जाच्या कापडाच्या निर्मितिला हात घालण्याचे ठरवले. त्यासाठी अहमदाबादला स्वत:ची टेक्सटाईल मील सुरु केली. उच्च दर्जाचे तंत्रद्यान व मशीनरी वापरुन उच्च दर्जाच्या कापडाच्या उत्पादनाला सुरवात केली. आधी हे कापड फक्त एक्सपोर्ट साठी बनवले जायचे. पण हेच कापड भारतातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा व यासाठी देशभर 1500 शोरुम्स काढण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी धेतला. पण त्यांचा हा प्रयोग कमालिचा यशस्वी झाला. त्यांचा ‘ओन्ली वीमल’ हा ब्रॅन्ड लोकप्रीय झाला. त्यांचे कापड सर्वात महाग असुनही त्याने विक्रिचे नवीन विक्राम करायला सुरवात केली. साड्यांमधे अनेक आधुनीक डिझाइन्स आणुन त्यात अमुलाग्र बदल घडवुन आणले.
नायलॉन, रेयॉन, पॉलिएस्टर या कृत्रीम धाग्यांचे महत्व त्यांनी ओळखले होते. भविष्यकाळात या धाग्यांना प्रचंड महत्व येणार आहे याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे या धाग्यांसाठी लागणारे रॉ मटेरीयल बनविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी अमेरिकेतील एका नावाजलेल्या कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करण्याचे ठरले. पण या प्रकल्पाला 400 कोटी रुपये एव्हड्या मोठ्या भांडवलाची गरज होती. हे भांडवल फक्त बँका, वित्त पुरवठा करणार्याब संस्था किंवा बडे भांडवलदारच पुरवु शकत होते. पण त्यांच्याकडे न जाता शेअरच्या रुपाने सर्वसामान्य माणासाकडुन हे भांडवल उभारण्याचा धाडसी निर्णय घेऊन धिरुभाईंनी खर्याा अर्थाने शेअर बाजाराचे दरवाजे सर्वसामान्य माणसाला खुले करुन दिले. कारण तोपर्यंत काही मुठभर मंडळीच शेअर मार्केटमधे गुंतवणुक करीत असत. सर्वसामान्य जनता यापासुन दुरच असे. धिरुभाईंचा हा प्रायोग कमालिचा यशस्वी ठरला. रिलायन्स ही खर्याी अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या भांडवलावरी उभी राहिलेली कंपनी ठरली. भारतात पुर्वी असे कधी घडले नव्हते. यापुढील काळात रिलायन्सने हेच धोरण कायम ठेवले. पेट्रोकेमिकल्सचे महत्व धिरुभाईंनी ओळखले व त्यात पण प्रवेश करुन यश मीळविले. भांडवल उभारणिचे अनेक नवीन मार्ग त्यांनी शोधुन काढले व लोकप्रीय केले. डीबेंचर्स किंवा कर्ज रोखे हा प्राकार त्यांनीच प्रथम भारतात आणला. त्याचा परीणाम असा झाला की त्यांच्या भागधारकांची ( शेशरहोल्डर्सची) संख्या वाढतच गेली. मुंबईच्या कुपरेज या फुटबॉलच्या ग्राऊंडमधे शेअरहोल्डर्सची मिटींग घेऊन भारताच्या कार्पोरेट क्षेत्रामधे एक आगळा वेगळा विक्राम प्रस्थापीत केला. कारण तोपर्यंत शेअरहोल्डर्सच्या मिटीग्ज एखाद्या हॉटेलच्या हॉलमधे होत असत व त्याला मुठभर शेअर होल्डर्स उपस्थीत रहात असत. ज्या सामान्य लोकांनी रिलायन्समधे पैसे गुंतवले आहेत त्यांना उत्तम परतावा हा मिळालाच पाहिजे यावर धिरुभाईंचे बारीक लक्ष असे. आज रिलायन्स ही भारतातील सर्वात जास्त शेअर होल्डर्स असलेली कंपनी असुन आज त्यांची संख्या 38 लाख इतकी आहे. अनेकांचे उखळ रिलायन्सच्या शेअरवर पांढरे झाल्याचे, अनेकांची घरे, मुलिंची लग्ने या शेअरच्या जिवावर झाल्याचे मी बघीतले आहे. रिलायन्सने अनेक विक्रम प्रस्थापीत केले आहेत. खाजगी क्षेत्रातील ही भारतातील सगळ्यात मेठी कंपनी असुन फॉर्च्युन 500 कंपन्यांमधे सर्वात प्राथम येणारी भारतीय कंपनी म्हणुन रिलायन्सने मान मीळवला आहे. 1970 साली वर्षाला काही लाख रुपये टर्न ओव्हर असणार्यान रिलायन्सचा वार्षीक टर्न ओव्हर 2 लख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. मुकेश व अनील या त्यांच्या सुपुत्रांनी रिलायन्सला नवीन उंचीवर नेऊन ठेवले असुन अनेक नवीन क्षेत्रात रिलायन्सने प्रवेश केला आहे.
पण हे सगळे करीत असताना धिरुभाईंनी काही तत्वे पाळली. त्यांनी दुसर्या् कोणत्याही कंपनिची डायरेक्टरशीप स्विकारली नाही. त्यांनी आपली सगळी एनर्जी रिलायन्ससाठीच वापरली. आपल्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी ते कोणालाही, अगदी ऑफीसमधल्या प्युनलाही, केव्हाही आणि कोठेही भेटायला तयार असत. पांढरा सफारी हा त्यांचा युनिफॉर्म बनला होता व शेवटपर्यंत त्यांनी त्यात बदल केला नाही. ते कधी पत्र लिहिण्याच्या भानगडीत पडत नसत. त्यांचे म्हणणे होते की पत्र लिहिल्यावर त्या पत्रलिहिणार्या् व्यक्तिला काय म्हणायचे आहे या वर लक्ष न देता वचणारे त्या पत्रातील चुका काढत बसतात. त्यांचा सगळा व्यवहार हा फोनवर किंवा ऑफीसमधे बसविलेल्या टेलेक्स मशीनवर चाले.
एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे. थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे.
फक्त एकाच गोष्टिची खंत वाटते की धिरुभाईंनी हे सगळे यश माहाराष्ट्राच्या राजधानीत, म्हणजे मुंबईत मीळविले. ते एखाद्या मराठी माणसाला का जमले नाही? आशा करुया की मराठी समाजात पण असाच एखादा धिरुभाई अंबानी नजीकच्या भविष्यकाळात पैदा होईल.



उल्हास हरी जोशी

8 comments:

  1. To marathi manus me mhanaje 'Tejas Bhusare'bananar ahe. Reliance savadh raha Tejas yet ahe.

    ReplyDelete
  2. Reliance Group PLz Be Alert i am comeing jay maharashtra
    FROM - Sudhakarraje Miraje Business man Owner - (old)Hiclass mart businee

    ReplyDelete
  3. Tejas and sudhakar .... keep it up. My blessing are always with you.

    ReplyDelete
  4. I CHALLENGE YOU SAMADHAN DHENGALE IS RICH 6th POSSITION AND YOU 7th

    ReplyDelete
  5. mi siddhesh sawant, mi nakich ya maharashtrachya matiwar aplla nav kornar ahye, ani maharashtrach nahi tar purna jagawar majja nav kornar ahye.... sarwani sawadh raha sawantancha sawant yet ahye

    ReplyDelete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive