Sunday, October 16, 2011

Vedic Method for Marathi Wedding - Information

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग १ प्रस्तावना व माहिती
हिंदू समाजात पूर्वी एकत्र कुटुंब बद्धती होती त्यामुळे घरात दर ३ - ४ महिन्ण्यानी काहीनाकाहीतरी कार्य घडत असे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्या पिढी कडून पुढच्या पिढी कडे सहज न्यात होत जायच्या. आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात कार्य काढले कि कोणकोणत्या गोष्टी लागतात हे माहित नसते. मला खुद्ध माझ्या मुलीच्या लग्नात हा अनुभव आला आणि तारांबळ झाली. त्यातून हे लिखाण करावे असे सुचले. कि जेणेकरून कार्य करतांना आपल्याला सर्व माहिती असावी. विविध विधींच्या साठी वेगवेगळी माणसे लागतात आणि ती ती माणसे त्या त्या वेळी हजर नसतील तर तारांबळ उडते म्हणून माहिती देतांना विधी - तो कधी करावा - त्या साठी लागणाऱ्या आवश्यक व्यक्ती - आणि काही आवश्यक माहिती.
अशा पद्धतीने हे लिखाण केले आहे. हे लिखाण करतांना आमचे गुरुजी श्री वैशंपायन ह्यांनी धार्मिक बाबतीत काय करावे ह्याबद्दल पूर्ण माहिती देवून हे लिखाण जास्तीतास्त परिपूर्ण करण्यास मदत केली त्या बद्दल त्यांचे इथे मी आभार मानतो आणि माहिती देण्यास सुरुवात करतो

काही सूचना व माहिती
सामाजिक व लौकिक विधींना गुरुजींची जरुरी नसते. मात्र धार्मिक विधींना गुरुजींची आवश्यकता असते. अशा वेळी सामानाची यादी व कार्याचा दिवस वेळ ह्यांची माहिती आपण जे गुरुजी बोलावतो त्यांच्याकडून वेळोवेळी घ्यावी.
शुभ दिवस व अशुभ दिवस अलीकडे कालनिर्णय सारख्या बऱ्याच दिनदर्शिकेमधून दिलेले असतात. सामाजिक व लौकिक कार्यासाठी दिवस ठरवतांना अशा दिनदर्शिकेचा आधार आपण घेऊ शकतो. विवाह संस्कारातील कार्याची माहिती देतांना मुलगा म्हणजे वर आणि मुलगी म्हणजे वधु हे प्रचलित शब्द वापरले आहेत.
वैदिक विवाह पद्धतीत मातृका पूजन, नांदी श्राद्ध, देवक, वांग-निश्चय, झा ल म्हणजे ऐरणी पूजन हे कार्यक्रम ऐच्छिक असतात. मंगलाष्टके शेवटी गाईली जातात.
विशेष सूचना ----- वधु व वर यांचे आई वडील उभयता हयात नसतील तर त्यांचे ऐवजी कार्य करणारी व्यक्तीच वधु वर यांचे आई वडील समजावेत
१)ग्रहमख २)केळवण ३)व्याही भोजन
विधी १ ला --------------ग्रहमख / ग्रहयज्ञ
केव्हा करावा --------विवाह ठरल्यावर वधु व वर दोघांच्या घरी विवाहाच्या ५, ४, किंवा १ दिवस आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. आपल्या कार्याला सर्व ग्रहांची अनुकुलता लाभावी म्हणून हि ग्रहांची शांत असते.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली,
माहिती -------------- ग्रहमख - ह्यात सूर्यादी नवग्रह देवता, प्रत्येक ग्रहाच्या उजव्या बाजूला एक व डाव्या बाजूला एक ह्या प्रमाणे ९ * ३ = २७ देवता, ७ क्रतु साद गुंण्य्कार देवता. आणि अष्ट द्विक्पाल मिळून एकूण ४२ सुपाऱ्या देवता म्हणून पूजतात. सर्व्सामान्ण्यातः देवांची पूजा करतांना त्यांना नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. मूर्ती पूजेत हा नैवेद्द्य म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच प्रकारचा नैवेद्य किंवा देव देव्तान्न्च्या आवडीचा पदार्थ त्याला अर्पण करणे असे त्याचे स्वरूप असते. ग्रह हे अंतराळात आपल्या भोवताली फिरतांना दिसतात त्याच्या साठी जो नैवेद्द्य अर्पण करायचा तो हवन केल्याने त्यांना पोहोचतो अशी आपल्या शास्त्राची श्रद्धा आहे. सर्व देव्तान्न्च्या बाबतीत (अग्निमुखावैदेवाः) अग्नी हे देवांचे मुख आहे अशी कल्पना आहे. म्हणून कोणतेही हवन / यज्ञ हे ग्रह नैवेद्द्य होय
विधी २ रा - केळवण - हा सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज नसते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील इष्ट मित्र व नातेवाईकांसमवेत यथाशक्ती एक अगर पंचा पक्वान्ने करून भोजन करावे.
माहिती -------------- खर तर वधूकडील मंडळींना केळवण भावनिक दृष्ट्या विशेष महत्वाचे वाटते. कारण त्या नंतर त्यांची मुलगी कायमची दुसरीकडे राहायला जाणार असते. वधु- वर लग्नाच्या दिवशी कार्यात एव्हढे व्यस्त असतात कि त्यांना निवांतपणे भोजन करणे कठीण असते. म्हणून निवांतपणे सर्वांसमवेत भोजन कर्वे एव्हढाच लौकिक संकेत केल्वानामागे आहे.
विघी ३ रा - व्याही भोजन - वराच्या आईवडिलांनी वधूच्या आईवडिलांना जेवायला बोलवायचे असते.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी सोयीनुसार कोणत्याही शुभ दिनी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- वधूचे आई/वडील व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- पूर्वी एकदा मुलेचे लग्न झाले कि तिला मुल होईपर्यंत मुलीचे आई/वडील तिच्याकडे अन्न ग्रहण करीत नसत. म्हणून लग्नापूर्वी त्यांना वरच्या आई/वडिलांनी जावायला बोलावण्याची प्रथा आहे ह्या वेळी वधूला मात्र बोलावत नसत हल्ली बोलावतात.
क्रमशः ------------- पुढील भागात वांग- निश्चय, मुहूर्त - पत्रिका पूजन, सीमांत पूजन - सिमान्न्ती

=============
हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ३ ----- वांग निश्चय, मुहूर्त पत्रिका पूजन,
विधी ४ था -------------- वांग निश्चय - आजच्या काळी साखरपुडा - रिंग सेरिमनी ------- हा धार्मिक व सामाजिक दोनही प्रकारचा विधी आहे.
केव्हा करावा -------- वांग निश्चय म्हणजे विवाहाचा निश्चय. आजच्या कळत साखरपुडा. हा विधी विवाह ठरल्यावर विवाहाच्या आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. काही जण हा विधी विवाहाच्या दिवशीच विवाहापूर्वी करतात.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही बाजूंचे काका मामा इत्यादी ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती -------------- गणपती, वरून व शची म्हणजे इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी हिची पूजा करून त्यांच्या साक्षीने वधु वडिलांनी वरच्या वडिलांना सांगायचे कि मी माझी मुलगी तुमच्या मुलाला देत आहे हे परस्परांना मान्य असून दोनही पक्षी आता तुम्ही मुलगी व आम्ही मुलगा पाहण्याची गरज नाही असे सांगायचे. वधु व वराकडील ज्येष्ठ पुरुष व्यक्तींचा व नातेवैकानंचा एकमेकांशी परिचय करणे, ह्यालाच व्याहीभेत असेही म्हणतात. याच वेळी वधूला दागिना देतात, साडी व ब्लाउजपीस, व मुंडावळ्या देतात.
विधी ५ वा - मुहूर्त पत्रिका पूजन - हा धार्मिक / सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज असते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा. आपण ज्या पत्रिका वाटतो त्या वाटणे सुरु करण्या पूर्वी करावा.
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील.
माहिती -------------- मुहूर्ताच्या वेळेची पत्रिका म्हणजे कुंडली मांडून तिचे पूजन करतात तशी केलेली नसल्यास वर व वधूची जन्मपत्रिका एकत्र पूजतात.
विघी ६ वा - सीमांत पूजन - सीमंती- श्रीमंत पूजन - हेच जावी पूजन होय.
केव्हा करावा -------- लग्नाआधी त्याच दिवशी किंवा आदल्या दिवशी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधूच्या आई/वडीलांसामावेत वधु व वरची मोठ्ठी बहिण लग्न झालेली असल्यास आपल्या पती समवेत (ज्येष्टजामातापूजन) व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- गुरुजींच्या साक्षीने वधूच्या आईवडिलांनी जावी ज्येष्ठ जावई वराचे आई वडील भाऊ यांचा मान सन्मान करणे. त्याच वेळी वराचे पूजन करून पाय धुऊन पायावर स्वस्तिक काढून पोशाख, मुंडावळ, हार, वरदक्षिणा, सजवलेला नारळ देतात, अत्तर लाऊन गुलाबपाणी शिम्पाद्ल्यावर प्रथम मुलाच्या आईने व अन्य चार सुवासिंनिनी लामण दिव्याने (निरांजनाने) मुलाला औक्षण करावे. औक्षनानंतर प्रत्येकीने मुलाला पेढा भरवावा(बालविवाहाच्या काळी )/ द्यावा. वरच्या आईची, करवलीची (सुवासिनी असल्यास) ओटी भरावी. आईला गुळाची ढेप द्यावी. चांदीच्या वाटीत हलवा द्यावा. उपस्थितांना अत्तर गुलाबपाणी पेढा द्यावा. तसेच मनाच्या (स्त्री / पुरुष ) सन्मान करावा.
क्रमशः ------------- पुढील भागात - देवक ठेवणे

==========

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ४ ----- देवक ठेवणे
विधी ७ वा -------------- देवक ठेवणे ---- ह्याला देवदेवक ठेवणे असेही म्हणतात. हा धार्मिक विधी आहे. ह्यात गणपती पूजन, पुंण्याहवाचन मातृका पूजन व नांदीश्राद्ध एव्हढे विधी अंतर्भूत आहेत.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी किंवा सोयीनुसार १, ४, ५, दिवस आगोदर ठेवता येते. काही संकट समयी अपरिहार्य कारण असल्यास विवाहाच्या आधी १० दिवस सुद्धा थेत येते. पण ते ठेवल्यावर वधु अथवा वराने घराच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते म्हणून आजकाल ते आदल्या दिवशी किंवा लाग्नाच्याच दिवशी लग्नापूर्वी ठेवतात. सर्व कार्य पुरे झाल्यावर हे उठवतात म्हणजे त्या देवतांच्या साक्षीने सर्व कार्य केले जावे असा संकेत आहे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही पक्षी स्वतंत्र पणे करयचे असते.
माहिती -------------- आज सोयीसाठी हा विधी हॉलवरच केला जातो. खर तर हा विधी वधूवरांच्या आई वडिलांनी आपापल्या घरी करायचा असतो. आणि लग्नाचा सर्व विघी पूर्ण झाल्यावर देवक उठवायचे असते. ह्या विधीच्या वेळी मुलाच्या व मुलीच्या घरी वेगवेगळा संकल्प असतो.
वरपित्याचा संकल्प असा --------- माझा मुलगा ह्याच देव व ऋषी व पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच प्रमाणे धार्मिक संस्काराची बैठक घेऊन प्रजोत्पादन करण्यासाठी श्री पर्मेश्वर्प्रीत्यार्थम मी विवाह संस्कार करतो आहे.
वधु पित्याचा संकल्प असा ------- माझी मुलगी हिने भ्र्त्रासह आपल्या पतीसह कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या तसेच धर्माचरण करण्याकरिता अधिकार मिळण्यासाठी श्री परमेश्वराप्रीत्यार्थम विवाह संस्कार करतो आहे.
१) गणपती पूजन
२) पुंण्याः ह वाचन ----- वरुण पूजा
३) मातृका पूजन ----- या एकूण २७ देवता आहेत गौरी आदी १६ देवता, ब्राम्ही आदी ७ देवता, गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल वस्तू अशा २७ देवता आहेत. ह्या सर्व देवतांची पूजा सुपात सुपारी स्वरुपात मांडून करावयाची असते.
४) नांदी श्राद्ध ----- म्हणजे कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण होय. कर्त्याची आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पणजोबा, व कर्त्याच्या आईचे वडील, आजोबा, पणजोबा, व आईची आई, आजी, पणजी यांचे स्मरण असते. (नामोच्चार नाही) त्याच बरोबर मंडप पूजा करयची असते. त्याच्या ६ देवता आहेत नंदिनी, नलिनी, मैत्र, उमा, पशुवार्धिनी, शास्त्रागार्भा,-भगवती (दर्भ आंब्याच्या पानात गुंडाळून उंबराचे पान व दुर्वा गुंडाळून दोऱ्याने बांधून) त्याची पूजा करायची असते. (हे मांडवाचे खांब कल्पिलेले आहेत) खरा मांडव घातला असेल तर मांडवाच्या आग्नेय कोपऱ्यातील खांबांची- मेथीकादेवीची पूजा करावी. तांदूळ, हळकुंड, सुपारी, रुमालात बांधून त्या खांबाला बांधून ठेवावी. देवक उठवल्यावर त्याचे विसर्जन करावे. अविघ्न कलश म्हणजे गणपतीची पूजा सुगड व त्यावर झाकण त्यात तांदूळ सुपारी खारीक बदाम हळकुंड तिलाच लाडू, कुलदेवतेचा नारळ पुजावा. अश्तागरात म्हणजे अलिबाग तालुक्यात मातृकापुजानात कुलदेवता असतेच म्हणून वेगळ्या नारळाची कुलदेवता म्हणून पूजा करण्याची प्रथा नाही. अन्य ठिकाणी कुलदेवता म्हणून नारळाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी सुग्डला व नारळाला सुत गुंडाळायचे असते.
क्रमशः ------------------------ गौरी हार पूजा
==================

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ५
विधी ८ वा-------------- गौरीहर पूजा ------- हि अन्नपूर्णा देवीची पूजा असते. ती केवळ वधूने करायची असते.
प्रकार १ ----- गौरीहर सजवणे साखरेची किंवा लाकडाची एकावर एक चिकटवलेली ५ बोळकी असतात. हि गौरीहराची बोळकी पाटावर मांडावीत (चार कोपऱ्यात एक एक) मुलीबरोबर देण्यासाठी (चांदीची) अन्नपूर्णेची मूर्ती आणावी. ती पाटावर माद्ध्याभागी ठेवावी. बाजूला वधूच्या आईने लाडू गडू ठेवावे. अशा प्रकारे आपल्या हौशीनुसार गौरीहर सजवावा.
प्रकार २ ----- वर व वधुकडून एकावर एक अशी ४ बोळकी चार कोपर्यावर शेजारी शेजारी ठेवावी. त्यावर मुलाकडून मंडपी (लहान मंडप) ठेवावा.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी - त्याच दिवशी
आवश्यक व्यक्ती ----- वधु व वधूची आई, वरची आई व अन्य ५ सुवासिनी यांनी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, दागिना असोला नारळ या वस्तू वरच्या आईने वधूची ओटी भरावी. या वेळी वधु मामाकडील पिवळी साडी नेसून गौरीच्या पूजेला बसलेली असते. ती साडी नेसूनच लग्न लागायचे असते.
तेल्फालाच्या वेळी गौरीहरा जवळील दिव्यामाद्ध्ये तेल घालण्यासाठी तेल भरून तपेली व डाव (मोठ्ठा चमचा) गौरीहरा जवळ वरमातेने ठेवावा.
मूर्तीची पूजा करतांना "गौरी गौरी सौभाग्य दे, दारी आलेल्या वारला दिर्घुष्य दे." असे म्हणून हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. व एकाग्र चित्ताने कोणाशीही न बोलता वर लिहिलेली प्रार्थना (मंत्र) म्हणत एकत्र केलेले पांढरे तीळ व तांदूळ दोन्ही हातांनी चिमटीने वाहण्यास आरंभ करावा. हे कार्य मामा तेथे येऊन बोहोल्यावर जायला सूचना देईपर्यंत करीत राहावे.
क्रमशः ---------- विधी ९) रुखवत व १०) मधुपर्क
==================
हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ६ वा
विधी ९ वा -------------- रुखवत ----------- हा सामाजिक / लौकिक विधी आहे. विधी १० वा -- मधुपर्क
केव्हा करावा ------- लग्नापूर्वी
आवश्यक व्यक्ती --- करवली वर व वरची भावंडे तसेच मनाच्या अन्य व्यक्ती.
माहिती ------------- करवलीने किंवा अन्य महिलेने वरच्या डोळ्यात काजल घालावे. वरच्या गालाला गालबोट लावावे. नंतर वराची आई, करवली व अन्य व्यक्तींनी रुखवताच्या भोजनास बसावे, वधूच्या आईने वारला तुपाची आपोष्णी (आपोशन) द्यावी. केळे व दुध दये. नंतर वराने भोजनास आरंभ करावा. भोजन होईपर्यंत, वारला देऊन शल्लक राहिलेले दुध व केळे गौरीहर जवळ बसलेल्या वधूला नेऊन द्यावे. वधूने केळे खावे, दुध प्यावे, वराचे भोजन झाल्यावर हस्त मुख प्रक्षालन झाल्यावर वधूच्या आईने चांदीचा रुपया घालून केलेला ५ पानांचा गोविंद विडा वराला द्यावा. वधूच्या वडिलांनी वाराला मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यावे. गड्याकडून दहीभात ओवाळून टाकावा (दृष्ट काढावी) वधूच्या आईने वरच्या पायावर दुध, पाणी घालावे, लामण दिव्याने ओवाळावे, वधूच्या पित्याने आपल्या उजव्या हाताने वरचा उजवा हात धरून वाराला लग्नाच्या बोहोल्यावर न्यावे, व खुर्चीत बसवावे.

विधी १० मधुपर्क ----- लग्न मंडपात आलेल्या वराचे स्वागत (पूजन)
केव्हा करावा ------- बोहोल्यावर
आवश्यक व्यक्ती ---गुरुजी, वधूचे आई वडील
माहिती ------------- वराचे स्वागत करून त्याला वस्त्र (सोवळे) जानवे, हार, दही, मध, तूप, एकत्र देणे. विडा दक्षिणा, फुलांची मुंडावळ, हे देऊन उपस्थितांना मंगलाक्षता देणे.
विघी ११ वा --------- मंगलाष्टके ---------- मुख्य लग्न (वधूच्या मातापित्याने मंगलाष्टके ऐकायची नसतात)
केव्हा करावा ------- ठरवलेल्या मुहूर्ताच्या वेळी
आवश्यक व्यक्ती ---(वधूच्या मातापित्याने मंगलाष्टके ऐकायची नसतात) गुरुजी, वधु/वर त्या दोघांच्या कडे करा व दिवा धरायला एक एक करवली व एक एक सुवासिनी. अन्तः पट धरण्यासाठी वधूचे मामा किंवा अन्य नातेवाईक व इतर सर्व नातेवाईक आप्त मित्र परिवार
माहिती -------------मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर आन्तरपाट दूर करावा. प्रथम वधूने व नंतर वराने आपापल्या हातातील हार एकमेकांना अर्पण करावेत. करवलीने वधु/वरच्या डोळ्यांना कार्यातील पाणी लावावे. सुवासिनीने हातातील लामण दिव्याने दोघांना ओवाळावे. वधूवरांना व गुरुजीनंना पेढा अत्तर गुलाबपाणी फुल वगैरे द्यावे नंतर विवाहास उपस्थित स्त्रीपुरुषांना पेढा पुष्प वगैरे द्यावे. वर्मातेचा मान -- लग्न झाल्यावर लगेच वधूच्या आईने विहिणीची (वरमातेची) साडी व नारळाने व साखरेने ओटी भरावी
क्रमशः ------------- पुढील भागात - कन्यादान, कंकण बंधन, विवाह होम.
=================
हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ८ वा
विधी १५ वा ------- ऐरणी पूजन / झाल ठेवणे, --- म्हणजे वराकडील सर्व ज्येष्ठ व्यक्तींवर जबाबदारी देणे.
केव्हा करावा ------ विवाह होमानंतर.
आवश्यक व्यक्ती -- गुरुजी, वधु-वरचे आईवडील, व दोघांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती ------------ वधूच्या आईवडिलांनी कन्यादानाची सांगता वाराकुलाची वृद्धी व्हावी म्हणून उमम्हेश्वर व १६ दिव्यांची पूजा व ऐरणी दान करयचे असते. प्रार्थना झाल्यावर वधूच्या आईने क्रमाने वरच्या त्याच्या आईवडिलांच्या व वराकडील अन्य ज्येष्ठ व्यक्तींच्या मस्तकावर ब्लाउज पीस धरून त्यावर वडिलांनी दिव्याची परडी धरून झाल्यावर झाल (परडी) खाली ठेवायची वधूच्या आईने वरच्या आईला सौभाग्य वायन द्यावे. (ऐरणी पूजनाचा संकेत - वधूने १६ वर्ष नंतर माहेरी दीपपूजन करायचे असते. त्यालाच माहेर पूजन असे म्हणतात. तेव्हा वधूवरांनी वधूच्या माहेरी हि पूजा करून वधूच्या माहेरच्यांचा सन्मान करायचा) दुपारचे भोजन -- या वेळी वधु पित्याने वराकडील सर्वांना भोजनाचे निमंत्रण द्यावे. ऐरणी पूजनानंतर वराकडील वराचे आई वडील काका मामा मावश्या भाऊ आत्या आदि मानकर्यांचा आजी आजोबा यांचा योग्यतो मान करावा. दुपारचे भोजन करावे. वधु व वर व वराकडील मानाच्या व्यक्तींची खास पंगत, हि पंगत झाल्यावर वरच्या आई व मानाच्या अन्य व्यक्तींना सुपारी साखर व चांदीच्या लवंग देतात. विहिणीला साडी. व्याह्यांना चान्देचे भांडे वरच्या भाऊ, भावजय व अन्य मानाच्या व्यक्तींना योग्यतो मानसन्मान देतात. विशेष सूचना ---- उभय पक्षामध्ये जे ठरले सेल त्या प्रमाणे मानपान ऐरणी पूजनाचे वेळीच किंवा भोजनानंतर देतात.

विधी १६ वा -------- वधूची पाठवणी
केव्हा करावा ------- लग्न मंडपातील हा शेवटचा विधी
आवश्यक व्यक्ती --- वधु / वर, वरची बहिण करवली, वधूचे आई / वडील प्रत्येक वधूच्या आईवडिलांच्या आयुष्यातला गहीवार्णारा क्षण.
माहिती ------------- वधु-वरांना गौरीहाराजाव्ल बसवून वधूच्या आईने वधूची मालत्यांनी ओटी भरावी. दोघांच्या हातावर दही घालून खावयास सांगावे. वराचे उपरणे व वधूचा शेला यांच्या टोकांची वरच्या करवलीने गाठ मारावी व वराकडून वधूकडील ज्येष्ट व्यक्तींचा यथाशक्ती मानपान करावा. वराने गौरीहराच्या मखरात असलेली देवी व लाडूगडू घ्यावा व वधूसह स्वग्रही निघण्यापूर्वी सर्वांना दोघांनी नमस्कार करावा. व सर्वांचा निरोप घ्यावा. गौरीची मूर्ती उचलल्यावर त्या ठिकाणी वरमातेने साडी ठेवावी. देवीजवळ पूर्वी ठेवलेले सौभाग्य वायन व यावेळी ठेवलेली साडी से सर्व वधूच्या मामीला द्यावे.

विघी १७ वा -------- वराचे वधूसह स्वग्रही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मी पूजन नाम क्षमी पूजन, नाव ठेवणे
केव्हा करावा ------- वधूसह वराचा ग्रह प्रवेश
आवश्यक व्यक्ती --- वधु/वर वराकडील घरची नातेवाईक. मुलीची पाठ राखीन/ आईवडील
माहिती ------------- ग्रह प्रवेश करतांना वधूने उंबरठ्यावर तांदळाने भरून ठेवलेले माप सांडवून मग घरात प्रवेश करावा. बरोबर आणलेल्या देवीची तांदूळ पसरून ठेवलेल्या ताटात ठेऊन पूजा करावी त्याचवेळी ताटात नववधूचे सासरचे नाव ताटातील तांदुळावर लिहावे, व देवी व नाम लक्ष्मी या दोघींची पूजा करावी. देवीला नवा दागिना घालावा. पूजा झाल्यावर वधूचे नाव सांगून साखर/पेढा घ्यावा. वधूची सासूने ओटी भरावी. वधूवरांनी देवांना व उपस्थित ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. वराचे आईने सुनेला शालू द्यायचा असतो. तसेच अन्य दागीनही द्यायचा असतो. सुनमुख पाहणे --- या वेळी मुलाच्या आईने मुलगा व सून यांना आपल्या मांडीवर बसवून त्या दोघांचे आरश्यात तोंड पहावयाचे व दोघांना पेढा/ साखर भरवून तोंड गोड करायचे वरच्या आई वडिलांचा व काका मामा मावशी आत्या भाऊ भावजय व अन्य ज्येष्ठ व्यक्तींचा (आजी आजोबा ) योग्यतो मानपान करायचा सातो. या वेळी आईला दिलेल्या साडीला पोट झाकण्याची साडी म्हणतात. हा मानपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर / सुरु असतांना वधूवरांनी घरच्या ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. पेढे वाटावेत सुवासिनींना हळद कुंकू लाऊन वधूचे सासरचे नाव सांगावे.

विघी १८ वा --------- सर्व कार्यक्रम आटोपल्यावर --- देव देवल उठवणे, सूप पाखडणे
केव्हा करावा ------- घरी आल्यावर शेवटी समाप्ती -- पान आजकाल वधूच्या घरी करवयाचे हे सर्व कार्यक्रम हॉल वरच करतात.
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी वधु/वर वराकडील घरची नातेवाइक आपापल्या घरी / अलीकडे एकत्र हॉलवर
माहिती ------------- आता वधु -वरांकडे ठेवलेले देवक उठवणे आईवडिलांनी देवक उठवणे. वराकडे वधूवरांनी त्यांच्या आईवदिलान्सामावेत देवाकाच्या पुजेस बसावे. देवक उठल्या नंतर कार्य समाप्ती निमित्त गुरुजींनी सूप वाजवून कार्य समाप्तीची घोषणा करावी. गुरुजींनी वधु वरांच्या पित्यांना कार्याप्रीत्यार्थ नारळ व आशीर्वादाचे तांदूळ द्यावेत. वधु-वरांच्या पित्यांनी गुरुजींची दक्षिणा देऊन त्यांची पाठवणी करावी. कार्य निमित्त आलेले पाहुणे स्वग्रही जाऊ शकतात. रात्री वधु-वरांची मीठ - मोहोर्या घेऊन द्रिष्ट काढावी

अशा रीतीने हे कार्य समाप्त समाप्त झाले ---- सर्व -----होतकरू---- तरुण तरुणींना हे वर्ष आपापल्या लग्नाच्या कार्याने संपन्न होवो. आपल्या सर्वांचे सहजीवन संसार सुखाचा आनंदाचा आणि समुद्धीचा होवो हिच शुभेच्छा

Vedic Method for Marathi Wedding - Information

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive