Friday, December 9, 2011

Article: धनुष - Rajanikant's Son-in-law Dhanush


तो कस्तुरी राजांचा मुलगा.रजनीकांतचा जावई.स्वत अभिनेता. आणि चक्क त्यानं बायकोच्या सिनेमासाठी एक गाणं लिहिलं. आणि गायलंही.आज त्याच्याबरोबरीनं सारं जग गातंय. आणि विचारतंय त्याला, 'व्हाय धीस कोलावरी.?'
'कोलावरी'ला ग्लॅमर देणारा नशिला गायक

वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा. हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. अर्थात, या नावाने त्याला कोणी ओळखत नाही. धनुष हे त्याचं नावं. कस्तुरी राजा हे साउथचे प्रसिद्ध दिग्दर्शक. त्यांचा हा मुलगा. 'कोलावरी' या भन्नाट गाण्याचे फाडू लिरीक्स यानेच लिहिलेत. साउथचा पॉप्युलर अँक्टर आणि दिग्दर्शक म्हणून तो ओळखला जातो. ही सगळी फॉर्मल ओळख परेड झाली. पण धनुष खर्‍या अर्थाने रजनीकांतचा जावई आहे. हे त्यानं सिद्ध केलंय.
गेल्या सातेक वर्षांपासून तो इंडस्ट्रीत काम करतोय. त्यानं पहिलं गाणं 'मय्याक्कम एन्ना' या तमिळ सिनेमासाठी याच वर्षी लिहिलं. धनुष फक्त २८ वर्षांचा आहे. गेल्या काही वर्षांत धनुषने अँक्टर म्हणून साउथच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्याचा भाऊ सेल्वाघरन याने दिग्दर्शक म्हणून काथेल कोण्डेन नावाचा पहिला सिनेमा केला, त्यात धनुषने काम केलं. त्यात त्याने एका मानसिक रुग्णाचं काम खूपच अप्रतिम केलं होतं. त्या सिनेमानंतरच धनुषनं ठरवलं आता हेच आपलं काम. त्यानंतर आलेला 'थिरीडा थिरूडजी' हा त्याचा सिनेमा ब्लॉकब्लास्टर हिट झाला. त्यानंतर धनुषचा 'पुधूपेथ्थाई' हा सिनेमा सुपर डूपर हिट झाला. त्यानं साउथमध्ये अनेक सिनेमे केले; पण तो त्याचा माईलस्टोन सिनेमा ठरला. ५८ व्या नॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये याच सिनेमासाठी धनुषला बेस्ट अँक्टरचं अँवॉर्ड मिळालं. आता रजनीकांतची मुलगी आणि धनुषची बायको ऐश्‍वर्या हिचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा येतोय. थ्री नावाच्या या सिनेमात धनुषने कामही केलंय आणि त्यात तो गायलाही. लिरीसिस्ट म्हणून त्याने आपलं दुसरं गाणं लिहिलं ते याच सिनेमासाठी. पण हे जे काय गाणं तो गायलाय, लोक फिदा झालेत त्याच्यावर.!

कोलावरी. आलं कुठून.?
कोलावरीचे शब्द समजायला फार अवघड नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. खरंतर टँग्लिश फॉर्म एवढय़ासाठीच वापरला गेला. सोपे सोपे इंग्रजी शब्द वापरून यूथच्या मनातलं, त्यांच्या शब्दातलं ब्रेक अप त्याला लिहायचं होतं. आजचं तारुण्य प्रेमभंगाचं दु:ख ज्या भाषेत मांडेल ती भाषा, त्यांच्याच शब्दात धनुषला मांडायची होती. 'कोलावरी कोलावरी' म्हणत त्यानं तो सॉलिड रिदम पब्लिकच्या डोक्यात घुसवला. आणि आपल्या काळजातलं दु:ख मांडावं या ताकदीनं तो ते गायलाही.
त्याला अनेकांनी या गाण्याचा अर्थ विचारला. त्यावर त्याने हे सॅड साँग आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
पण धनुष म्हणतो, ''सॅड साँगपेक्षाही हे गाणं म्हणजे 'आफ्टर ब्रेक अप इफेक्टस' आहेत . प्रेमभंग झालेल्या एका मुलाने त्याच्या प्रेयसीला या गाण्यात प्रश्न विचारलेत. राग, अपमान, आणि त्याचं आभाळाएवढं दु:ख त्यानं कोलावरीमधून व्यक्त केलंय. त्याचं दु:ख पचवण्यासाठी तो दारू प्यायलाय आणि त्याच नशेत तो हे गाणं गातोय. मुळात हे गाणं फार समजून, उमजून, विचार करून लिहिलेलं गाणं नाहीये. गाणं रेकॉर्ड करेकरेपर्यंत मला असलं भलतं सुचलंही नव्हतं. पण बोलता बोलता डोक्यात 'कोलावरी' हा शब्द आला. आमच्या तमिळ भाषेत रोजच्या व्यवहारात वापरला जाणारा हा शब्द आहे. डोक्यात तो शब्द घोळला आणि मी तो गाण्यात वापरू, असं ठरवून टाकलं. संगीतकार अनिरुद्धने गाण्याची चाल आधीच बांधलेली होती. ती डोक्यात पक्की बसलेली होती. त्यामुळे त्या चालीवर योग्य रीतीने बसतील असे शब्द सुचले. ते कसे सुचले यावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण त्याला विचारपूर्वक केलेली प्रोसेसच नाहीये.' 'प्रेमभंग हा जागतिक प्रश्न आहे. तो प्रश्न सगळ्यांशी जोडला जाऊ शकतो. त्यात माझ्या तमिळ अँक्सेंटमुळे गाण्यात गंमत आलीये. गाण्याला कोणत्याही व्याकरणाचं बंधन नाही. कुणीही गाऊ शकेल असं साधं सोपं गाणं आहे' असंही धनुष सांगतो.

बडे खानदानका फायदा.? धनुषच्या आणि अनिरुद्धच्या या प्रयत्नावर धनुषची बायको आणि सिनेमाची दिग्दर्शक एश्‍वर्याही जाम खूश आहे. रजनीकांतचा जावई आणि दिगदर्शक कस्तुरी राजा यांचा मुलगा असल्याचे धनुषला फायदे झाले हे तो मान्य करतो. पण यामुळे त्याचे काही तोटेही होतात, हेही त्याला जाणवतं. तसं तो सांगतोही. म्हणून काम करताना तो हे दोन्ही टॅग काढून टाकतो. त्याला फिल्म इंडस्ट्रीत खूप काम करायचंय हे त्याला माहितीये त्यामुळे तो भविष्याचा विचार करतो. त्याला बॉलिवूडमध्येही काम करायचंय. दिग्दर्शनात रस आहेच. पण दिग्दर्शनात पाऊल टाकण्यासाठी त्याला हिंदीचीच निवड करायचीये. त्यासाठी तो सध्या दिग्दर्शनाचा अभ्यास करतोय. धनुषचं कोलावरी गाजलं. पहिली इनिंग तर जाम सक्सेसफुल झाली. आता तो पुढं काय करतो. बघायचं. पण तोपर्यंत 'कोलावरी' काही आपला ताबा सोडणार नाही असं वाटतंय.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive