Wednesday, February 22, 2012

ई-रिटेलिंगला आकाश ठेंगणे!

ई-रिटेलिंगला आकाश ठेंगणे!

भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र दरवर्षी सरासरी ७० टक्क्यांनी वाढत असून गेल्या तीन वर्षांत ते तब्बल ५०० टक्के वाढले असल्याचे 'इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया'च्या अलिकडच्या अहवालात म्हटले आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची अफाट संख्या, मोबाइल फोनचा वाढता वापर आणि वाढती क्रयक्षमता यामुळे लहान शहरांत ई-कॉमर्सची घोडदौड सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत मध्यम व लहान शहरांतील कन्झमशन वाढले आहे. त्याबरोबरच ऑनलाइन खरेदी करण्याचेही प्रमाण झपाट्याने वाढते आहे. 'क्रेझिल'चे नागपूर व औरंगाबाद येथे ग्राहक आहेतच, शिवाय मीरत, सुरत, विशाखापट्टणम, मैसूर येथेही इंटरनेट वापराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ई-रिटेलिंगचे प्रमाण वाढवण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची गुंतवणूक लॉजिस्टिक व साठवणूक यावर अवलंबून आहे.

ई-कॉमर्सबाबत 'ई-बे'ने केलेल्या 'सेन्सस २०११'नुसार १ जुलै २०१० ते ३० जून २०११ या काळात ३३११ भारतीय शहरांनी ऑनलाइन खरेदी केली. त्यापैकी १२६७ लहान शहरे होती. महानगरांचे योगदान ५१ टक्के, टिअर २ व ३ शहरांचे ४० टक्के, तसेच ग्रामीण भागाचे ९ टक्के होते. महानगरांतील ग्राहक सोयीचे असल्याने ऑनलाइन खरेदी करतात, तर सर्वच उत्पादने ग्रामीण व निमशहरी भागात उपलब्ध असतातच असे नाही, म्हणून टिअर २ व ३ शहरे आणि ग्रामीण भागात ई-कॉमर्सचे प्रमाण वाढत असल्याचे या पाहणीत आढळले.

अशी होतेय वाढ

सन २०१५ मध्ये ऑनलाइन खरेदीची उलाढाल ७० अब्ज रुपयांची असेल. भारताने इंटरनेट वापराच्या बाबतीत १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठलेला असेल. नोव्हेंबरमध्ये रिटेल विभागात २.७२ लाख व्हिजिट दिसल्या आणि ऑनलाइन डीलमध्ये ६२९ टक्के वाढ झाली. ब्रॉडबँड कनेक्टिविटीमुळे, तसेच, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइलवरून ऑनलाइन व्यवहार करताना दिली जाणारी सुरक्षा वाढत असल्याने अधिकाधिक जणांचे लक्ष ई-कॉमर्सकडे वेधले जात आहे, अशी माहिती 'क्रेझिल'चे सीईओ अंकुर वारिकू यांनी दिली.

महानगरांतील ग्राहक ई-कॉमर्समार्फत सिनेमाची वा प्रवासाची तिकिटे, आथिर्क सेवा खरेदी करतात, तर मध्यम शहरांतील ग्राहक इलेक्ट्रॉनिक वस्तू, ब्रँडेड कपडे अशा त्यांच्या शहरात सहज उपलब्ध न होणारी उत्पादने खरेदी करत असल्याची माहिती 'क्रेझिल'ने दिली.

' ई-बे'च्या पाहणीत १२६७ ग्रामीण भागांत अशी ऑनलाइन खरेदी झाली
> टॉप खरेदीटॉप विक्री
> ड्युएल सिम मोबाइल फोनसेलिब्रिटी स्टॅम्प
> टूलकिट
> ईमर्जन्सी लाइट्स
> डिझायनर पेन
> मोती
> बॉडीसोप
> आरसे

रिटेल क्षेत्राची पावले मध्यम शहरांकडे

रिटेल क्षेत्रासाठी मोठी बाजारपेठ आघाडीच्या २३ शहरांमध्ये असून त्यापैकी केवळ ७ ते ८ महानगरे (दिल्ली, मंुबई, कोलकाता, चेन्नई, इ.) आहेत, तर बाकी सर्व मध्यम शहरे आहेत. सध्या रिटेल क्षेत्राचा विस्तार केवळ १० टक्के झाला असल्याने या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रचंड वाव आहे. भारतातील रिटेल क्षेत्र जगात पाचव्या क्रमांकावर असून गुंतवणुकीच्या दृष्टीने उदयोन्मुख आहे. भारतातील मॉलची संख्या प्रचंड वाढणार आहे आणि रिटेलर मोठ्या प्रमाणात टिअर टू शहरांत जाण्याचे नियोजन करत आहेत, असे 'अर्न्स्ट अँड यंग' यांच्या 'द ग्रेट इंडिया रिटेल स्टोरी'मध्ये म्हटले आहे.

' हायपरसिटी पुणे, अहमदाबाद, कोईम्बतूर येथे आऊटलेट सुरू करणार आहे. नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद ही शहरेही विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. दरवषीर् चार ते पाच स्टोअर सुरू करणार आहोत. ३-४ स्टोअर सुरू होण्यासाठी ७-१० कोटींची गुंतवणूक करावी लागते. ती वसूल होईल, इतकी क्षमता या शहरांमध्ये आहे. टिअर वन सिटीमध्ये स्टोअरचे क्षेत्र ७५ हजार चौफूट आहे, तर टिअर टूमध्ये ५० हजार चौफूट', अशी माहिती हायपरसिटीचे बाइंग, मर्चंडायजिंग अँड सप्लाय चेन प्रमुख आशुतोष चक्रदेव यांनी दिली. मध्यमवर्ग आणि त्यापुढील ग्राहक हे या क्षेत्राचे लक्ष्य आहे. प्रचंड प्रतिसाद नाहीये, पण 'ब्रेक इव्हन सेल्स' नक्की आहेत. प्रतिसाद वाढण्यासाठी वेळ लागेल, पण ही प्रक्रिया सकारात्मक आहे. मध्यम शहरांमध्ये हायपरसिटीसारख्या गोष्टींचे नाविन्य आहे. मोठ्या शहरातील ग्राहक एका वेळी अंदाजे १२०० रु. खर्च करतो, तर मध्यम शहरातील ८०० ते हजार रु., असे चक्रदेव यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive