Thursday, March 8, 2012

Black circles around eye, how to cure?

माझे वय 29 वर्षे आहे. माझ्या डोळ्यांखाली 10 वर्षांपासून काळी वर्तुळे आहेत. बटाटा लावला, गुलाबपाणी लावले तरी फरक पडत नाही, कृपया यावर उपाय सांगावा. चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यासाठी काय करावे?...श्रीमती वृषाली

उत्तर - डोळ्यांखाली काळी वर्तुळे ही बहुधा हिमोग्लोबिन, लोह कमी असणे, संपूर्ण शरीराला, विशेषतः त्वचेला तजेला देण्याचे काम करणारा रसधातू कमी असणे याच्याशी संबंधित असतात. म्हणूनच यावर बाह्य उपचारांच्या बरोबरीने औषधे घेणे, आहारात बदल करणेही आवश्‍यक असते. या दृष्टीने धात्री रसायन, सॅनरोझ, शतावरी कल्प यांसारख्या रसायनांचा रोजच्या आहारात समावेश करणे चांगले. रक्‍तशुद्धी होण्यासाठी काही दिवस महामंजिष्ठादी काढा घेणेही चांगले. आहारात अंजीर, काळ्या मनुका, केशर, चांगले सकस दूध, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब वगैरे फळे वगैरेंचा समावेश असणे चांगले. त्वचेला पोषक द्रव्यांपासून बनविलेले "संतुलन रोझ ब्यूटी तेला'सारखे औषधी तेल लावण्याने काळी वर्तुळे कमी होण्यास, तसेच चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यासही मदत मिळेल. आठवड्यातून दोन - तीन वेळा चेहऱ्याला दुधावरची साय 10-15 मिनिटांसाठी लावून ठेवण्याचाही उपयोग होईल.

मला रक्‍ती मूळव्याधीचा त्रास आहे. बऱ्याच वर्षांपासून आतमध्ये व बाहेर कोंब आहेत. काही दिवसांपासून दुखणे, खाजणे, रक्‍त येणे असे त्रास होत आहेत. यावर शस्त्रकर्म करावेच लागेल का? काय उपाय करावा?....श्रीमती अर्चना
उत्तर - मूळव्याधीवर शस्त्रकर्म हा एकमेव उपचार नाही, किंबहुना बऱ्याचदा असा अनुभव येतो की मूळव्याधीचा त्रास होण्यामागचे मूळ असंतुलन बरे न करता नुसतेच शस्त्रकर्म केले तर पुन्हा मूळव्याध होऊ शकते. त्यापेक्षा नेमकी औषधे घेतली, खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळले तर मूळव्याधीचा त्रास होत नाही. पचन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, पोट व्यवस्थित साफ होण्याकडे लक्ष ठेवणे सर्वांत महत्त्वाचे होय. त्या दृष्टीने जेवणानंतर अविपत्तिकर किंवा "सॅनकूल'सारखे चूर्ण घेणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे तूप टाकून घेणेही उत्तम. 15 दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन पोट साफ होऊ देणेही श्रेयस्कर. मूळव्याधीमुळे वेदना, कंड वगैरे त्रास होतात त्यावर कोरफडीचा ताजा गर किंवा घरचे साजूक तूप लावल्याने बरे वाटते. आहारात घरी बनविलेल्या ताज्या लोण्याचा समावेश करण्याचा आणि दुपारच्या जेवणानंतर ताजे ताक पिण्याचाही उपयोग होईल. आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने क्षारसूत्राचाही उपयोग करता येईल.

माझे दोन्ही गुडघे खूप दुखतात, आखडतात. पाय जवळ घेता येत नाहीत. जवळ घेतले तर परत लांब करताना खूप दुखते. कृपया उपाय सुचवावा....श्री विश्‍वास शेंडे
उत्तर - गुडघे दुखणे, आखडणे, पायांची हालचाल करताना वेदना होणे ही सर्व वात-असंतुलनाची लक्षणे आहेत. वातदोषाला संतुलित करण्यासाठी स्नेहन हा उपाय उत्तम असल्याने गुडघ्यांवर दिवसातून 2-3 वेळा "संतुलन शांती तेल' लावल्यावर शेक घेण्याचाही फायदा होईल. निर्गुडी, एरंड, शेवग्याची पाने यातील मिळतील ती पाने घेऊन वाफवून त्याची पुरचुंडी बांधून शेक करण्याचा उपयोग होईल किंवा तयार "संतुलन अस्थिसंधी पॅक' तेलावर गरम करून त्याच्या पुरचुंडीने शेकण्यानेही बरे वाटेल. बरोबरीने योगराज गुग्गुळ, "संतुलन वातबल गोळ्या', "संतुलन प्रशांत चूर्ण', दशमूलारिष्ट घेण्याचाही उपयोग होईल.

माझी मुलगी 22 वर्षांची आहे. हल्ली तिच्या हनुवटीवर लव येऊ लागली आहे. आम्ही तिच्या लग्नाचा विचार करतो आहोत. तरी लव दिसू नये म्हणून काही उपाय सुचवल्यास मी तो अवश्‍य करेन....श्री. काळे
उत्तर - याप्रमाणे लव वाढू लागणे हे स्त्री-असंतुलनाचे, हॉर्मोन्सच्या असंतुलनाचे मुख्य लक्षण आहे. त्यामुळे लव न दिसण्यासाठी उपाययोजना करणे पुरेसे ठरणार नाही, तर मुळातील स्त्री-असंतुलन दूर करणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी मुलीला तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार सुरू करणे सर्वांत चांगले. बरोबरीने "फेमिसॅन तेला'चा पिचू, "संतुलन शक्‍ती धुपा'ची धुरी, "स्त्री-संतुलन संगीता'चे श्रवण वगैरे उपाय योजण्याचाही चांगला फायदा होईल.

जेवणानंतर लगेच कोणताही गोड पदार्थ किंवा फळे खाऊ नयेत असे म्हणतात. कारण हे पदार्थ पचण्यास जड असतात आणि जेवणानंतर सर्व पचनशक्‍ती जेवणातील पदार्थ पचवण्यासाठी खर्च होत असते, त्यामुळे गोड पदार्थ, फळे नीट पचत नाहीत. हे खरे आहे का?....श्री. चंद्रशेखर खेडकर
उत्तर - जेवताना कोणत्या चवीचे पदार्थ काय क्रमाने घ्यावेत याचे मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले आहे. जेवणाच्या आधी भूक लागलेली असते. म्हणजे शरीरात वात-पित्त वाढलेले असतात. त्यामुळे जेवणाची सुरवात खीर, भात वगैरे गोड चवीच्या पदार्थांनी करणे चांगले असते. यामुळे आतड्यातील वायू सरायलाही मदत होते. यानंतर जेवणाला रुची यावी म्हणून आंबट, खारट, तिखट पदार्थ खाण्यास सुचवले आहे आणि सरतेशेवटी कडू, तुरट चवीचे पदार्थ खायचे असतात, जेणेकरून लाळ सुटण्याची क्रिया कमी होऊन इतर पाचक स्राव स्रवण्यास संधी मिळू शकते. याचाच भाग म्हणून जेवणाच्या शेवटी ताक (तुरट रसाचे असते म्हणून), सुपारीसारख्या गोष्टी खाल्ल्या जातात. तेव्हा आपण उल्लेख केल्याप्रमाणे गोड पदार्थ जेवणानंतर खाण्यापेक्षा जेवणाच्या सुरवातीला आणि बहुतेक सर्व फळे आंबट-गोड चवीची असल्याने जेवणाच्या मध्ये (रायता, कोशिंबीर म्हणून) खाणे श्रेयस्कर होय.

माझी मुलगी 17 वर्षांची असून, तिला पित्ताचा खूप त्रास होतो. आठवड्यातून एकदा तिचे डावे डोके दुखते, कधी कधी उलट्याही होतात. यामुळे तिचे अभ्यासात लक्ष लागत नाही. कृपया यावर योग्य सल्ला द्यावा....सौ. हरियार
उत्तर - पित्त कमी होण्यासाठी रोज सकाळी गुलकंद, मोरावळा खाण्याचा, तसेच पंचामृत घेण्याचा उपयोग होईल. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान पाच-सहा चमचे इतका समावेश असू द्यावा. खाण्यामध्ये काय बदल झाल्यामुळे त्रास होतो किंवा पित्त वाढते याकडे लक्ष ठेवावे. जेवणाच्या वेळा नियमित असणे, भूक लागली असता दुर्लक्ष न करता मुगाचा लाडू किंवा साळीच्या लाह्या खाणे, हेही पित्त वाढू नये यासाठी उपयोगी असते. बरोबरीने काही दिवस "संतुलन पित्तशांती गोळ्या', "सॅनकूल चूर्ण' घेण्याचाही चांगला उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी संस्कारित केलेल्या "नस्यसॅन घृता'चे दोन - तीन थेंब टाकणे व आठवड्यातून दोन - तीन वेळा पादाभ्यंग करणे चांगले.

माझे वय 24 वर्षे आहे. मला डॉक्‍टरांनी सांगितले आहे, की माझ्या हृदयाचा आकार वाढलेला आहे. मला श्‍वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते. ह्यावर काही उपाय आहे का?....श्री. निरंजन घाटपांडे
उत्तर - एवढ्या कमी वयात हृदयाचा आकार वाढण्याचे नेमके कारण माहिती होणे महत्त्वाचे होय. तज्ज्ञ वैद्यांकडून योग्य निदान करून प्रकृतीनुरूप औषधे सुरू करणे श्रेयस्कर होय. हृदयाचा आकार वाढणे, त्यामुळे धाप लागणे, रक्‍ताभिसरण व्यवस्थित न होणे वगैरे त्रासांवर आयुर्वेदात उत्तम उपचार आहेत. त्यामुळे प्रकृतीचा विचार करून योग्य उपचार सुरू करण्याचा नक्की उपयोग होईल. अंगाला नियमितपणे "संतुलन अभ्यंग तेल' हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने "कार्डिसॅन प्लस', "संतुलन अर्जुनारिष्ट', "संतुलन सुहृदप्राश'सारखे रसायन घेण्यानेही बरे वाटू लागेल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive