Wednesday, March 7, 2012

Marathi movie winner in National Movie Awards.

 मराठीचा झेंडा पुन्हा दिमाखाने फडकला

'देऊळ', 'शाळा' व 'बालगंधर्व' या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. होळी आणि त्यापाठोपाठ येणारा गुढीपाडवा या दोन सणांच्या सेलिब्रेशनच्या वेळीच हे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाला उधाण आले आहे. पुरस्कार विजेत्यांशी संपर्क साधला असता, आमच्या कलेचे कौतुक झाले...आम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले याचा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 'देऊळ' या चित्रपटासाठी "सकाळ वृत्तपत्र समूह' माध्यम प्रायोजक होते.

अभिजित घोलप (निर्माते, "देऊळ') ः हे बक्षीस मराठी भाषेला आहे. आमच्या चित्रपटाने मराठीचा झेंडा पुन्हा दिमाखाने फडकाविला आहे. "सकाळ' वृत्तपत्रालादेखील मी धन्यवाद देतो.

उमेश कुलकर्णी ("देऊळ'चे दिग्दर्शक) ः ""दीड-दोन वर्षे "देऊळ'वर झपाटल्यासारखा काम करीत होतो. चित्रपटातील कलाकार तसेच अन्य मंडळीही तितकीच मेहनत घेत होती. पैशापेक्षा चित्रपटाच्या विषयावर सगळ्यांनी प्रेम केले आणि त्याचे यश आम्हाला मिळाले आहे. या चित्रपटात स्क्रिप्टचा वाटा मोठा आहे.

गिरीश कुलकर्णी (उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट संवाद लेखक, "देऊळ') ः लेखनापेक्षा मला अभिनयाची अधिक आवड आहे. लेखक मी अगदी योगायोगाने झालो. मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या म्हणून लेखन करायला लागलो. आज दोन्ही गोष्टींचे कौतुक झाले आहे. "देऊळ'करिता कार्यकारी निर्माते नितीन वैद्य यांचे चांगले सहकार्य लाभले आहे, तसेच माझी पत्नी वृषाली हिची सतत साथ लाभली आहे. हे दोन्ही पुरस्कार मी माझे दिवंगत वडील पांडुरंग व्यंकटेश कुलकर्णी यांना समर्पित करतो.

सुजय डहाके (दिग्दर्शक, "शाळा') ः पहिल्याच कलाकृतीचे अशा पद्धतीने कौतुक झाल्यामुळे मी भारावून गेलो आहे. होळी आणि गुढीपाडव्याची मिळालेली ही भेट आहे. आमचे सगळे जण अभ्यास करून आले आणि उत्तीर्ण झाले, असेच मी म्हणेन.

अविनाश देशपांडे ("शाळा'चे पटकथालेखक) ः हे यश आमच्या टीमचे आहे. प्रत्येकाने आपापल्या कामात नावीन्य आणले, त्यामुळेच यश मिळाले.

आनंद भाटे (सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायन, "बालगंधर्व') ः मी हा पुरस्कार माझे आई-बाबा आणि गुरू पंडित भीमसेन जोशी यांना समर्पित करतो. नितीन देसाई, सुबोध भावे, रवींद्र जाधव, महेश लिमये....अशा सर्वांनीच जबरदस्त मेहनत घेतली, याचे हे श्रेय आहे.

विक्रम गायकवाड (रंगभूषाकार, "बालगंधर्व') ः बालगंधर्व ही व्यक्ती मोठी होती. त्यामुळे सुरवातीला टेन्शन प्रचंड आले होते. परंतु, सुबोधने चांगले सहकार्य केले. तीन-साडेतीन तास मेकअपकरिता लागत होते; परंतु त्याने कुरबूर केली नाही.

विवेक वाघ (निर्माते, "शाळा') ः चित्रपट थिएटरमध्ये गर्दी खेचत असताना पुरस्कार मिळणे हा मणिकांचन योग आहे. 

आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटांचा झेंडा 

सर्वात्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट - देऊळ 
सर्वात्कृष्ट राष्ट्रीय अभिनेता - गिरीश कुलकर्णी ( देऊळ )
सर्वात्कृष्ट सवांद - गिरीश कुलकर्णी ( देऊळ )
सर्वोत्कृष्ट गायक - आनंद भाटे(बालगंधर्व )
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले - शाळा 
सर्वोत्कृष मेकअप- विक्रम गायकवाड (बालगंधर्व) 
सर्वात्कृष्ट मराठी चित्रपट- शाळा 

सर्वांचे मनापासून अभिनंदन !!!!!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive