Tuesday, March 27, 2012

फॅट्सना करा बाय - Say bye to fats

फॅटसमुळे(fats) बेढब होणारं शरीर कोणालाच आवडत नाही. त्यामुळे आपण वयापेक्षा मोठे दिसतो हेही अनेकांना खुपत असतं. पण याची कारणं आपल्या बेसिक(basic habits) सवयींमध्येच दडलेली असतात.

' काय गं बाई कंबर आहे की कमरा, काहीतरी कर गं', 'अरे पोट केवढं वाढलंय तुझं, व्यायाम वगैरे करत जा' असे टोमणे अनेकांना मिळत असतात. अनेक उपाय करुनही कंट्रोलमध्ये न येणाऱ्या बेढबपणाची किंवा वजनवाढीची कारणं तुमच्या छोट्या छोट्या सवयींमध्येच दडलेली असतात. त्यामुळे त्या समजून घेतल्यास वजन आटोक्यात यायला खूप मदत होईल.

मानवी शरीरात जास्तीच्या साठलेल्या कॅलरीजचं रुपांतर चरबीत होतं. ही चरबी साठवण्याची प्रवृत्ती तीन गोष्टींवर अवलंबून असते त्या म्हणजे वय, लिंग आणि जीन्स ! पुरुषांमध्ये शक्यतो पोटाजवळच्या भागात जास्त चरबी साठते ज्याने त्यांच्या शरीराला अॅपल(apple) सारखा आकार येतो तर महिलांमध्ये हिप्स आणि मांड्यांजवळ चरबी साठल्याने त्यांच्या शरीराला पेअरचा(pear) आकार येतो.

तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे जेवढ्या कॅलरीजची तुम्हाला गरज आहे तेवढाच आहार घ्या. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. संतुलित पोषक आहाराची(balanced diet) तुम्हाला आवश्यकता आहे. दिवसातून दोन वेळा पोट भरून जेवण्यापेक्षा ४-५ वेळा हलके पदार्थ खाणं चांगलं. फॅटयुक्त पदार्थांऐवजी लो फॅट पदार्थ, अंड्याचा पांढरा भाग आणि प्रथिनयुक्त पदार्थ खायला हवेत.

पोट वाढण्याची समस्या अनेकांना सतावत असते यावर उत्तम उपाय म्हणजे तुमच्या जिम इन्स्ट्रक्टरकडून पोटाच्या स्नायूंसाठी योग्य व्यायामप्रकार कोणता हे समजून घ्या. यामुळे तुमचं शरीरही फिट राहील. जोपर्यंत तुम्ही खाल्लेल्या कॅलरीज बर्न करत नाहीत तोपर्यंत पोटावर साठलेली चरबी हटणार नाही. व्यायामाची योग्य आणि बिनचूक पद्धत अवलंबली तर अपेक्षित फायदा होऊ शकतो.

चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे अशा व्यायाम प्रकारांचा आधार घ्या. यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न (calorie burn) होतील आणि चयापचय क्रियाही सुधारेल.

एक दिवसाआड अॅब्जचे व्यायाम(excercise) करायला हवेत. शरीरातील बाकीच्या स्नायूंप्रमाणेच इतर स्नायूंनासुद्धा व्यायामानंतर ४८ तास विश्रांतीची गरज असते.

पाठीवर उताणे झोपून तुमचे गुडघे वाकवा आणि दोन्ही हात डोक्याखाली ठेवा. हळूहळू खांदे वर उचला आणि त्याचवेळी पाय छातीजवळ आणा. पुन्हा पूर्वस्थितीत जा.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive