Monday, May 28, 2012

मुंबईत मोठ्या कुटुंबांचे संमेलन Get together of Big families of Mumbai

मुंबईत मोठ्या कुटुंबांचे संमेलन

वाढती महागाई , दोन पिढ्यांमध्ये होणारी मत - मतांतरे यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारतीय कुटुंबांनी एकत्र कुटुंबांना फाटा देत ' छोटे कुटुंब सुखी कुटुंब ' चा नारा दिला . त्यामुळे घराघरांत ' हम दो हमारे दो ' दिसू लागले . परंतु , तीव्र स्पर्धा , करिअरचे वाढते वेध असूनही एकत्र कुटुंब पद्धतीला पाठिंबा देणारी अनेक कुटुंबे मुंबईत आहेत . अशा मोठया आणि सुखी कुटुंबांचे संमेलन येत्या काही दिवसांत मुंबईत भरवले जाणार आहे . ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या संमेलनात तब्बल २५ कुटुंबे सामील होत असून तब्बल ४६ जणांच्या कुटुंबाचाही यात सहभाग असणार आहे .
मुळ्ये यांच्या या संकल्पनेला प्रसाद महाडकर आणि विनायक हेटे यांचे सहकार्य लाभले आहे . याबाबत बोलताना मुळ्ये म्हणाले , ' अमेरिकेतील लोक आता परत कसे एकत्र कुटुंबपद्धतीचा विचार करत आहेत , यासंबंधी ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या ' धावते जग ' मध्ये माहिती आली होती . ती वाचून मला या संमेलनाची कल्पना सुचली . त्यानंतर मी अशा ' मोठ्या ' कुटुंबांचा शोध घेऊ लागलो . सध्या मला अशा ३७ कुटुंबांची माहिती मिळाली असून , त्यातून २५ कुटुंबांना संमेलनासाठी निवडले जाईल .'
' या सर्वच लोकांना माझी कल्पना आवडली . त्या सर्वांनीच संमेलनास यायचे कबूल केले आहे . या कार्यक्रमावेळी नातेसंबंधांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम होईल . निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यावेळी प्रमुख पाहुणे असतील . यातून काही समाज प्रबोधन होईल असे अजिबात नाही . परंतु , तीन - चार पिढ्यांचे लोक एकत्र आजही आनंदाने नांदतात हे समाजाला दिसावे , इतकीच आपली अपेक्षा आहे ,' असेही मुळ्ये स्पष्ट करतात . १७ जूनला होणारे हे संमेलन सर्वांना खुले असून , त्याचे ठिकाण निश्चिती लवकरच होणार आहे .
बिग फॅमिली
मुळ्ये यांनी निवडलेल्या या कुटुंब संमेलनात शिवाजी मंदिर ट्रस्टच्या अण्णा सावंत यांच्या ४६ जणांच्या कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे . तर अवघ्या १८० चौ . फुटांच्या घरात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या गिरगाव येथील १० जणांच्या पावस्कर कुटुंबाचा समावेशही या संमेलनात होणार आहे . ही कुटुंबे निवडताना दिवसांतून एक जेवण त्यांनी एकत्र घ्यायला हवे . शिवाय , त्यांचे स्वयंपाकघरही एक हवे , ही अट घालण्यात आली आहे .  


Get together of Big families of Mumbai
Get together of Big families of Mumbai

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive