Wednesday, July 18, 2012

Bollywood Superstar Rajesh Khanna passes away

'बाबु मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ हैं जहापनाह... जिसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं... हम सब तो रंगमंच की कटपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवालेकी उंगलीयोंमें बंधी हैं... कब कौन कैसे उठेगा कोई नही बता सकता...'

'आनंद' या अजरामर चित्रपटातून जीवन जगायला शिकवणारे आणि क्षणभंगूर जीवनाचं हे वास्तवही सांगणारे बॉलिवूडचे पहिले 'सुपरस्टार', हिंदी सिनेसृष्टीचे 'काका' राजेश खन्ना यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. मृत्यूसमयी पत्नी डिंपल, मुलगी ट्विंकल आणि जावई अक्षय खन्ना त्यांच्यासोबत होते.

गेल्या काही महिन्यांपासून राजेश खन्ना यकृताच्या विकारानं आजारी होते. हे दुखणं इतकं बळावलं की, त्यांनी अन्नपाणीही सोडलं होतं. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात त्यांना चार वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. दोनच दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांची प्रकृती सुधारल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, औषधोपचाराला कुठलाही प्रतिसाद न देणा-या राजेश खन्नांची प्रकृती ढासळत गेली. आज सकाळी तर त्यांची तब्येत अगदीच खालावली होती. तशातही, डॉक्टरांनी दुपारपर्यंत प्रयत्नांची शर्थ केली, पण अखेर दीडच्या सुमारास 'काका'नं अखेरचा श्वास घेतला आणि सिनेसृष्टीचा 'आनंद' हरपला. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केले जाणार आहेत.

राजेश खन्ना यांनी ७०च्या दशकात बॉलिवूडच्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. आपल्या चार दशकांच्या सिनेकारकीर्दीत त्यांनी १६३ चित्रपट केले. सलग १३ सुपरहिट चित्रपट देण्याचा विक्रम या 'सुपरस्टार'नं केला होता. त्याशिवाय, निर्माते म्हणूनही त्यांनी तीन चित्रपट काढले. पण, या प्रांतात त्यांना फारसं यश मिळालं नाही.

१९९२ मध्ये बॉलिवूडच्या पडद्यावरून राजेश खन्ना यांनी राजकारणाच्या, निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती आणि काँग्रेसच्या तिकिटावर थेट लोकसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेसचे 'स्टार प्रचारक' झाले होते.

'स्टार' म्हणूनच आयुष्य जगलेले राजेश खन्ना यांच्या निधनानं बॉलिवूडमधला चमचमणारा तारा निखळल्याची भावना व्यक्त होतेय. 'मेरे फॅन्स मुझसे कोई नही छिन सकता', हा त्यांचा एका नव्या जाहिरातीतला डायलॉग... खरंच, 'काका'चे चाहते त्याला कधीच विसरू शकत नाहीत. आयुष्य आनंदानं जगायला शिकवणारा हा 'आनंद' सिनेरसिकांच्या कायमच स्मरणात राहील.
Rajesh Khanna
Yesteryear Bollywood superstar Rajesh Khanna, who was ailing for sometime, died at his Bandra residence on Wednesday , family sources said.
The 69-year-old actor had been in and out of hospital since April, was discharged from the Lilavati hospital two days back.
He is survived by wife Dimple Kapadia and daughters Twinkle and Rinke.
Scores of worried fans gathered outside his 'Aashirwad' home on Carter Road in Bandra today following the news.
Khanna was hailed as India's first superstar after 15 consecutive solo superhits between 1969 and 1972 including Aradhana, Haathi Mere Saathi, Anand and Amar Prem.
 http://media2.intoday.in/indiatoday/images/stories/rajesh-khanna_350_062112011821.jpg
७०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे, आपल्या कसदार अभिनयानं सिनेरसिकांना भरभरून 'आनंद' देणारे, बॉलिवूडचा पहिले 'सुपरस्टार' राजेश खन्ना यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive