Thursday, August 23, 2012

सुवर्णप्राशन संस्कार - suvarnaprashan sanskar

सुवर्णप्राशन संस्कार 
 

सध्याच्या धकाधकीच्या जगांत सुवर्णप्राशन हा शब्दच मुळी लक्ष्यवेधक आहे नां ? 
बहूचर्चित आणि वैविध्यपूर्ण अशा गुणांनी युक्त सुवर्णाचे प्राशन 
( खायचे ) म्हणजे नक्की काय ? ह्याचा उपयोग कितपत आहे किंवा ह्याचा उपद्रव काय ?हे प्रश्नच ?? 

प्रत्यक्षतः कामाच्या धावपळीत माणसाला उसंतच मुळी मिळत नाही 
. कामाचे व्याप , पैशा मागची धडपड किंवा यश , अर्थ , किर्ती , प्राप्ती इत्यादी मध्ये आरोग्य प्राप्ती किंवा आरोग्य रक्षण होऊन दीर्घायुष्य हा भागच चिंतनीय आहे . कारण व्यवहारात सुद्धा माणसकडे पैसा , सत्ता , मान असुनही आरोग्य किंवा सुखायु प्राप्तीही दुरापास्त वाटणारीच गोष्ट झालेली आहे ! 

प्रचलित आरोग्य टिकवणारी प्रणालीतही विविधांगी विचार करूनही माणूस मात्र दीर्घायु मिळवु शकला नाही 
, हे सत्य आहे . आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथांचा विचार केला तर मात्र अनेक ठिकाणी वारंवार काही औषधी , काही प्रयोग हे इच्छित सिद्धर्थ्य आहेत. 

ह्यामधील एक भाग म्हणजे धातुंमध्ये श्रेष्ठ 
( दिसायला , आर्थिकदृष्ट्या महाग आणि औषधीदृष्ट्या गुणकारी ) असलेला सुवर्णाचा प्रयोग जर औषधात झाला किंवा औषध म्हणून झाला तर स्वास्थ्यरक्षणात मात्र उपयोग करून घेता येतो . 

सुवर्णप्रयोग अगदी झालेल्या 
( एक दिवसाच्या ) मुलापासुन कोणत्याही वयात आजाराच्या प्रदीर्घ / जीर्णावस्थेत / आत्यायिक अवस्थेत इतकेच नाही तर सगर्भावस्थेसारख्या नाजुक परिस्थितीतही केला जातो . अर्थात निष्णात वैद्यांमार्फत हे सुवर्ण शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करून त्याच्यावरती विविध प्रक्रिया करून नंतरच वापरणे हे श्रेयस्कर आहे . 

अशाच अनुषंगाने केलेला प्रयोग म्हणजेच सुवर्णप्राशन ह्यामध्ये लहान मुलांमध्ये हे औषध 
/ इतर औषधांसह वापरले जाते , किंवा औषधात उगाळुन चाटण तयार करून दिले जाते . 
मुख्य म्हणजे ह्या औषधी सुवर्णाचे प्राशन एका ठराविक मात्रेत 
( मापात ) आणि ठराविक काळच दिले पाहिजे . 

ह्या सेवनाने मेधा 
( म्हणजे बुद्धिचा एक भाग ), अग्नि ( पाचनशक्ती ) बल ( ताकत )वाढली जाऊन आयुष्यमान वाढवले जाते असा उल्लेख आहे . एका महिन्याच्या प्रयोगाने बुद्धित तर सहा महिन्याच्या प्रयोगाने इतर इंद्रियांची कामे उत्कृष्ट होतात .ह्यामध्येही नुसतेच आयुष्यमान वाढत नसुन व्याधिक्षमता ( शरिराच्या रोगाविरुद्ध लढायची प्रतिकार शक्ती ) आणि पौरुषत्व वाढवले जाते . 

आधुनिक शास्त्रांचा विचार करता केला तर सुवर्ण हे 
Antioxidant म्हणजे शरिरधातुची झीज कमी करून तारुण्य / बल / शक्ती / उत्साह / प्रतिकारशक्ती आणि वीर्य वाढवणारे आहे हे सिद्ध झालेली गोष्ट आहे . 
ह्याचा अनुषंगाने शरिराच्या अतिशय प्राथमिक अवस्थेत म्हणजेच जन्मापासूनच्या वाढिच्या वयात ज्या वयात शारिरीक 
, मानसिक , बौद्धिक , ावनिक वाढ होते असते त्या अवस्थेत तर सुवर्णाच्या शक्तीने इतर हितकर औषधासह वापर करून चाटण तयार करून जर प्राशन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते . 

ह्याच विचारप्रणालीने गोव्यातील गोमांतक आयुर्वेद महाविद्यालया तर्फे पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी महिन्यातून एकवेळा असे फक्त १२ वेळा अत्यल्प प्रमाणात आणि मोफत सुवर्णप्राशन करण्याचा प्रयोग सुरू आहे 
. दिवसेंदिवस ह्याचा प्रसार ,प्रचार लोकोत्तर होतो असून हजारो बालकांना ह्यांचा फायदा होत आहे . 

परंतु एकंदर चिकित्सा 
- शास्त्र - व्यवहार आणि तर्कसंगतीचा विचार केला तर खरोखरच सगर्भमातेलाच सुवर्णप्राशन सुरू करायची प्रणाली प्रचलीत होईल ह्यात शंका नाही . 
 
सुवर्णप्राशन संस्कार कार्ण्याधीच्या सर्वसाधारण सूचना
१ सुवर्णप्राशनचा पहिला डोस डॉक्टरांच्या देखरेखीखाली झाल्यानंतरच नंतरचे डोस घरच्या घरी देणे.
२ ज्या दिवशी पुष्यनक्षत्र असेल त्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सुवर्णप्राशन करता येते
३ आपल्या बालकास सुवर्णप्राशन डोस देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर किमान अर्धा तास काही खाण्यास देवू नये
४ जर बालकास सर्दी खोकला ताप असेल तर त्या दिवशी डोस देवू नये 
५ सुवर्णप्राशन औषादाची बाटली फ्रीझरमध्ये ठेवावी. वापरण्याआधी अर्धा तास ती बाटली बाहेर काढावी व डोस देण्यापूर्वी गरम पाण्याच्या पातल्यात थोडा वेळ धरून पातळ झाल्यावर काही वेळ हलवणे व एकजीव मिश्रण झाल्यावर मगच द्रोप देणे.
६ औषादाचा डोसे खालीलप्रमाणे आहे
       
० ते २ वर्ष २ थेंब

       
२ ते ४ वर्ष ३ थेंब

       
४ ते ६ वर्ष ४ थेंब

७ डोस दिल्यानंतर बालकाने उलटी केली तर २० मिनिटे थांबून परत डोस देता येईल

८ औषधे वापरून झाल्यावर परत फ्रीझरमध्ये ठेवावे

९ औषधाचा रंग वास चव बदलल्यास औषद वापरू नये.

१० सुवर्णप्राशन  ०- ६ वर्ष पर्यंतच्या बालकांना करणे उपयुक्त ठरते.
 
भारत हा एक अध्यात्मिक देश आहे. मनुष्य जन्मापासुन ते मृत्यु पर्यंत अनेक संस्कार सांगितले आहेत. बालकाचा जन्म झाल्यावर सुवर्णप्राशन हा एक संस्कार सांगितला आहे.
या मध्ये ०-६ वर्ष वयोगटातील बालकांना पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णयुक्त घृताचे प्राशन केले जात आहे. याची उद्दीष्टे -
बालकाच्या बौद्धिक वाढीला चालना देणे
बालकाचा शारिरीक विकासास मदत करणे
बालकाची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे 
या सर्वांची नोंद घेउन त्याचे शास्त्रियत्व सिद्ध करणे
यातील प्रमुख औषधे -
वचादि घृत - वचा बुद्धीवर्धक, स्मरणशक्ती वाढवणारी आहे. तुप बालकांच्या सर्वांगिण वाढिकरिता उपयुक्त आहे.
सुवर्ण - सोने उत्तम विषघ्न, मेध्य, बल्य आहे.
मध - कफघ्न आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive