Friday, December 14, 2012

अहं ब्राम्हस्मी हा मंत्र नसून तो विचार आहे

"अहं ब्राम्हस्मी हा मंत्र नसून तो विचार आहे , मननात त्रायते इति मंत्र मननात तारतो तो मंत्र " देहोहम " म्हणजे मी देह हा जो भाव आहे तो घालविण्यासाठी मी ब्रह्म हा भाव किंवा विचार घ्यायचा नंतर तो पण टाकून द्यायचा आणि " सोहम तेही अस्तावले " म्हणजे काहीच नाही अहं आणि सोहम दोन्हीही सापेक्ष आहेत पण त्यांचा उपयोग मी देह हा अहंकार घालविण्यासाठी होतो , साधी गोष्ट आहे मी आहे तर तू आहे मीच नाही तर तू कुठून ब्रह्म एक आहे हे म्हणणे सुद्धा सापेक्ष आहे कारण एकाच्या सापेक्ष दोन आहे " एरवी सर्वांच्या हृद्य देशी I मी अमुक आहे ऐशी I जे बुद्धी स्फुरे अहर्निशी I ते वस्तू गा मी II ज्ञानेश्वरी . किंवा जगद्गुरू श्री तुकारम महाराज म्हणतात ,' तुका म्हणे अहं ब्रह्म I आड येऊ नेदी भ्रम II " अहं ब्रह्म म्हणजे सुद्धा भ्रमच आहे . वेदांताचा नियम असा आहे कि " समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो " एक भ्रम घालवण्यासाठी दुसरा भ्रम घ्यावा लागतो नन्तर तोही टाकून द्यावा लागतो .काट्याने काटा काढला कि दुसरा काटा फेकून द्यावा"

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive