Sunday, January 20, 2013

रिक्षाचालक, फेरीवाल्यांचा १९ फेब्रुवारीला संप

फेरीवाल्यांवरील कारवाईचा निषेध ,

रिक्षाचालकांना हवी सामाजिक सुरक्षा

hawk.jpg
भाडेवाढीसाठी सामान्य जनतेला वारंवार वेठीस धरल्यानंतर एक लाख रिक्षाचालक सामाजिक सुरक्षेच्या मागणीसाठी तर मुंबईतील फेरीवाले कारवाईच्या निषेधार्थ १९ फेब्रुवारी रोजी एकत्रित संपावर जाणार आहेत , असे शरद रावप्रणित ' मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन ' आणि ' मुंबई हॉकर्स युनियन ' ने संयुक्तपणे शनिवारी जाहीर केले.

पालिका , पोलिसांनी फेरीवाल्यांवर कारवाईचा सपाटा लावल्याने शरद राव यांनी संपाची घोषणा केली आहे. त्यासाठी फेरीवाले आणि रिक्षाचालकांना एकत्र घेऊन संपाची तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवजयंतीच्या दिवशीच मुंबईतील एक लाख रिक्षाचालक आणि त्याहून जास्त फेरीवाले संपावर जाणार असून या दिवशी संयुक्त निदर्शने करणार असल्याचे युनियनचे पदाधिकारी शशांक राव यांनी स्पष्ट केले.

मार्च आणि एप्रिलमध्येही संप

एकदिवसीय संपाचा परिणाम न झाल्यास ५ ते ७ मार्च रोजी पुन्हा संप पुकारला जाईल. त्यातूनही मार्ग न निघाल्यास २३ एप्रिल ते १ मेमध्ये आठवडाभर संप केला जाणार आहे. यावेळी नेहमीची जागा न सोडता दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी जाहीर केलेल्या धोरणाची सरकारने अमलबजावणी करावी , अशी मागणी संघटनेने केली आहे. तर रिक्षाचालकांना अधिक सुविधा पुरवण्याची मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. १९९३ मध्ये सरकारने नेमलेल्या पाटणकर समितीने रिक्षाचालकांना वैद्यकीय सुविधा , पेन्शनसारख्या सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याची शिफारस केली होती. गतवर्षी नेमलेल्या हकीम समितीनेही या शिफारशी सुचवल्या असून त्यांची अमलबजावणी सरकारने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive