Tuesday, August 20, 2013

Google "Photo +"



गुगलचे फोटो 'अधिक'



सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रावर आपल्या ठसा उमटवण्यात ' गुगल+ ' फारसे यशस्वी ठरलेले नसले , तरी सोमवारी जगभरात साजरा करण्यात आलेल्या ' वर्ल्ड फोटोग्राफी डे ' निमित्ताने ' गुगल+ ' ने त्यांच्या ' फोटो ' या सर्व्हिसमध्ये मोठा बदल केला आहे. यामुळे येत्या काळात ' गुगल+ ' हे फोटो शेअरिंगसाठीचे खूप मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मोबइलमध्ये काढलेला फोटो थेट ' गुगल+ ' च्या अकाऊंटमध्ये सेव्ह करता येऊ शकतो. त्यासाठी मोबाइलची मेमरी खर्च करण्याची गरज राहत नाही.

' गुगल+ ' ने मुंबईत फोटोग्राफी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर रघू राय यांच्यासह अनेक फोटोग्राफर्सनी हजेरी लावली होती. इतकेच नव्हे , तर या फोटाग्राफर्सच्या काही फोटोंचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते.

' गुगल+ ' फोटोमध्ये देण्यात आलेले काही फीचर्स अत्यंत उपयुक्त ठरतील.

ऑटो बॅकअप - आपण एकदा आपल्या अँड्रॉइड फोन किंवा आयफोनवरून ' गुगल+ ' चे अकाऊंट सिंक केले की , काढलेला फोटो थेट क्लाऊड टेक्नॉलॉजीद्वारे ' गुगल+ ' वर सेव्ह राहतो. यामुळे काही कारणांमुळे तुमच्या मोबाइलमधला डेटा उडाला तरी त्याचा बॅकअप या अकाऊंटवर मिळू शकतो.

ऑटो एक्स्टेन्शन - ऑटो एक्स्टेन्शनमुळे आपल्या फोटोंमध्ये छोट्या-छोट्या हालचाली दिल्या जातात. त्यामुळे आपल्या फोटोंमधील चेहऱ्यांवर काम होते आणि चेहरा चांगला दिसतो.

ऑटो हायलाइट - नवीन फोटो अपलोड केला , की तुम्हाला तुमच्या कलेक्शनमधील हायलाइट्स दाखवता येऊ शकतात. त्यामुळे तुमचे सर्वोत्तम फोटो शेअर करणे शक्य होते. डुप्लिकेट आणि हललेल्या फोटोंमधून हवा तो फोटो शोधण्यासाठी फार वेळ वाया घालवायची गरज उरणार नाही व आपले आवडते फोटो आवडत्या लोकांसोबत शेअर करणे शक्य होते.

ऑटो ऑसम - फोटोमागची कथा जर तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही ऑटो ऑसममुळे ती शेअर करू शकता. यात फोटोंमध्ये छोटेछोटे अॅनिमेशन वापरून फोटोमागची कथा रंगवून सांगता येऊ शकते.

' गुगल+ ' ने फोटो या सुविधेतून अनेक गोष्टी हौशी फोटोग्राफर्सच्या आवाक्यात आणल्या आहेत. यामुळे छोट्या फोटोग्राफर्सनाही आपले फोटो अधिक आकर्षकपणे मांडता येऊ शकतील , असे गुगल इंडियाचे मार्केटिंग विभागाचे संचालक संदीप मेनन यांनी स्पष्ट केले. फोटोग्राफर्सच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन गुगलने उपयोगी फोटो एडिटिंग साधने देण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्या द्वारे ते महत्त्वाच्या ठरणाऱ्या विशेष घटनांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फोटोग्राफर्सना सहकार्य करू शकणार आहेत , असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive