Tuesday, August 20, 2013

King khan Shahrukh followed his words

srk

काही वेळा भावनेच्या भरात अनेक बॉलिवूड स्टार्स काहीबाही बोलून जातात. भव‌िष्यात मी अमुक करेन, तमुक करेन अशी आश्वासनंही देतात. बऱ्याचदा पब्लिसिटी स्टंट म्हणून ते हे सगळं बोलून जातात. पण आपणच केलेली ही वक्तव्यं पुढे त्यांच्या लक्षातही राहत नाहीत. पण, या सगळ्याला अपवाद ठरलाय तो क‌िंग खान. शाहरुखने मध्यंतरी एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत महिला दिनानिमित्त एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायला येते असा प्रसंग दाखवण्यात आला होता. त्यात शाहरुख म्हणतो, ' स्त्रीको पुरुष के बराबर नहीं होना चाहिए... आगे होना चाहिए ' त्यावर ती पत्रकार त्याला विचारते की, ' मग सिनेमांच्या नावांमध्ये हिरोचं नावं हिरोइनच्या नावाच्या आधी का असतं? ' तेव्हा काही सेकंद थांबून शाहरुख म्हणतो, ' यापुढे माझ्या प्रत्येक सिनेमात माझ्या नावाआधी माझ्या हिरोइनचं नाव असेल. ' ही जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांसमोर आली होती. या जाहिरातीनंतर शाहरुखचा पहिला सिनेमा आला तो म्हणजे ' चेन्नई एक्सप्रेस '. शाहरुख जाहिरातीत जे बोललाय तसं खरंच वागतो का हे याच सिनेमावरुन कळणार होतं. आणि हो... तो त्याच्या शब्दाला जागला. त्याचं बोलणं नुसतं जाहिरातीपुरतं मर्यादित राहिलं नाही. ' चेन्नई एक्सप्रेस ' या सिनेमाच्या टायटलमध्ये आधी दीपिका पदुकोणचं नाव येत मग शाहरुखचं. मान गये बॉस... फक्त जाहिरातीसाठी तेवढं बोलण्यासाठी खरंतर त्याने कोट्यवधी रुपये घेतले असतील. पण, नुसता पैशांचा विचार न करता त्याने दिलेला शब्दही पाळला. याला म्हणतात राजाने दिलेला शब्द पाळला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive