Thursday, September 26, 2013

मुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२


मुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२

mumbai


न्यूयॉर्क, मॉस्को, लंडन, बर्लिन आदी प्रख्यात शहरांतील नागरिकांपेक्षा मुंबईकर अधिक प्रामाणिक आहेत. परंतु, मुंबईकरांपेक्षाही अधिक प्रामाणिकपणा फिनलंडमधील हेलसिंकी शहरातील नागरिकांमध्ये आहे. प्रामाणिक शहरांच्या यादीत त्यांनी अव्वल नंबर पटकावलाय.

न्यूयॉर्कमधील 'रिडर्स डायजेस्ट'या मासिकातर्फे जगभरातील १६ शहरांमध्ये प्रामाणिकपणाविषयी एक अभ्यास करण्यात आला. फिनलंडमधील हेलसिंकी जगात सर्वाधिक प्रामाणिक असून, मुंबई दुसऱ्या स्थानावर असल्याचे या अभ्यासाने जाहीर केले आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्टने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

या पाहणीदरम्यान १६ शहरांतील मोक्याच्या ठिकाणी स्थानिक चलनांच्या नोटांनी भरलेली १२ पाकिटे रस्त्यात टाकण्यात आली. या पाकिटांमध्ये चलनाव्यतिरिक्त, छायाचित्रे, संपर्क क्रमांक आदींचाही समावेश करण्यात आला होता. या एकूण १९२ पाकिटांपैकी ५० टक्केच पाकिटे परत मिळाल्याची नोंद 'रिडर्स डायजेस्ट'तर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात करण्यात आली आहे.
हेलसिंकीमध्ये १२पैकी ११ पाकिटे संबंधितांच्या पत्त्यावर पोहोचवून शहरवासीयांनी
प्रामाणिकतेच्या कसोटीत अव्वल स्थान मिळवले आहे. बारापैकी नऊ पाकिटे संबंधितांच्या हवाली सुपूर्द करून मुंबईने प्रामाणिक शहरांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर एकच पाकीट परत करण्याचे 'सौजन्य' दाखवून पोर्तुगालची राजधानी लिस्बन तळाच्या क्रमांकावर विसावली आहे. हा आगळावेगळा अहवाल 'रिडर्स डायजेस्ट'च्या ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जगातील 'टॉप टेन' प्रामाणिक शहरे

क्र. - शहर - परत आलेली पाकिटे (१२ पैकी)
१. हेलसिंकी (फिनलंड) - ११
२. मुंबई - ९
३. बुडापेस्ट (हंगेरी) - ८
३. न्यूयॉर्क - ८
४. मॉस्को (रशिया) - ७
४. अॅमस्टरडॅम (नेदरलँड) - ७
५. बर्लिन (जर्मनी) - ६
५. ज्युब्जन (स्लोव्हेनिया) - ६
६. लंडन (ब्रिटन) - ५
६. वॉर्सा (पोलंड) - ५
७. बुखारेस्ट (रुमानिया) - ४
७. रिओ डी जानेरो (ब्राझील) - ४
७. झ्युरिच (स्वित्झर्लंड) - ४
८. प्राग (चेक प्रजासत्ताक) - ३
९. माद्रिद (स्पेन) - २
१०. लिस्बन (पोर्तुगाल) - १

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive