Thursday, September 5, 2013

मैत्रिणींशी बोलताना सावधान!

dasgupta 
मैत्रिणींशी बोलत असाल तर सावध रहा. कारण अमेरिकेने कान टवकारले आहेत, असा सल्ला लोकसभेतील आपल्या सहकाऱ्यांना देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी भारतात टेहळणी करीत असल्याचा आरोप अमेरिकेवर केला आहे.

अमेरिकी प्रशासनाने नासाच्या मदतीने संपूर्ण भारतभर टेहळणी चालविली असून त्यासाठी दिल्लीनजीक एक खांबच रोवला असल्याचा दावा दासगुप्ता यांनी यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला देत लोकसभेत शून्यप्रहरादरम्यान केला. वसाहतवादी अमेरिकेच्या टेहळणीच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक ब्राझीलचा असून त्यानंतर इजिप्त व भारताचा क्रमांक लागतो. दिल्लीनजीक रोवलेल्या खांबाच्या माध्यमातून नासाला अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री चिदंबरम यांच्यात काय गुफ्तगू चालली आहे, याचीही खबर लागते, असा दावा दासगुप्ता यांनी केला तेव्हा चिदंबरम यांना हसू आवरले नाही.

आपल्या मैत्रिणीशी बोलताना सावध रहा, असा सतर्कतेचा इशारा देताना दासगुप्ता म्हणाले की, नासाने फोनवरील संभाषण, इंटरनेट संदेश आणि ई-मेलवरही पाळत ठेवली आहे. आपल्या संरक्षण मंत्र्यांचे लष्करप्रमुखांशी चाललेल्या संवादाचेही ध्वनिमुद्रण होत आहे. सीरियाप्रमाणेच भारताच्या राजकीय सार्वभौमत्वावरील या अतिक्रमणाची आमच्या 'राष्ट्रप्रेमी'सरकारने गंभीर दखल घ्यावी, या सभागृहाने अमेरिकेच्या कृतीचा तीव्र निषेध करावा आणि सरकारने या मुद्द्यावर तात्काळ निवेदन करावे, अशी मागणी दासगुप्ता यांनी केली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive