Thursday, September 5, 2013

चायनीज अॅप्स धोकादायक!

we.jpg

भारतातील स्मार्टफोन युजर्सकडून गेल्या काही काळात चायनीज अॅप्सला भरपूर पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे . परंतु , ही अॅप्स देशाची सुरक्षा , तसेच विकासासाठी धोकादायक ठरू शकतात , अशी सरकारला भीती आहे . ' वी चॅट ' सारखे इन्स्टंट मेसेजिंग अॅप , तसेच ' युसी ' हा ब्राउजर यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे केंद्रीय गृहमंत्रालय , दूरसंचार मंत्रालय आणि सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यांची चिंता वाढली आहे .

गुगल प्ले स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड केल्या जाणाऱ्या फ्री - अॅप्सच्या यादीमध्ये वी चॅट आणि यूसी ब्राउजर यांनी सातत्याने पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान पटकावले आहे . चायनीज अॅपमधून संभवणाऱ्या सुरक्षाविषयक धोक्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाची विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे . अजून या कंपन्यांशी सरकारतर्फे कोणताही अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला नसला , तरी सरकारच्या विविध संस्था याविषयी काम करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे .

मागील महिन्यामध्ये यूसी ब्राउझरने मोबाइल ब्राउजिंगच्या क्षेत्रात ऑपेराला मागे टाकल्याची माहिती मोबाइल बाजारपेठेची पाहणी करणाऱ्या ' स्टॅट काउंटर ' या कंपनीने दिली आहे . वी चॅट या अॅपची मालकी ' टेन्सेंट होल्डिंग ' या कंपनीकडे आहे . या अॅपचे चीनबाहेर कोटी युजर्स असून यापैकी बहुतांश युजर्स भारत , इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये आहेत . गृह मंत्रालयाची चर्चा ही केवळ वी चॅट आणि यूसी ब्राउजर यांच्यापुरतीच मर्यादित नसून भविष्यातही अशाप्रकारचे धोके कसे हाताळता येतील , याविषयी निश्चित धोरण आखण्यासंबंधी विचारविनिमय सुरू असल्याचे सिंग म्हणाले .

चीनच्या अॅपवर संशय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही . यापूर्वीही ह्युवेई , झेडटीई यांसारख्या चिनी कंपन्यांची सॉफ्टवेअर्स धोकादायक वाटल्यामुळे भारताने या कंपन्यांच्या मालकीसंबंधी सविस्तर माहिती मागवली होती .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive