Thursday, September 26, 2013

चेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना!

चेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना!
सगळ्यांनाच त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडतं... प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावरून आणि विचारांवरून त्या व्यक्तीचं जीवन कसं असू शकतं, याचा अंदाजाही लावता येतो. जीवनाची, भविष्याची अजिबातच फिकर नसणाऱ्या लोकांचं जीवन वरवरून खूप आनंदी दिसत असलं तरी त्यांच्या आळसाचे परिणाम त्यांना कधीतरी भोगावेच लागणार, हेही पटकन समजतं. आळस हा माणसाचा शत्रू आहे, या वाक्याची आपण शाळेत असल्यापासून घोकमपट्टी करत असलो तरी काही गोष्टींची सवय आणि चटक आपल्याला पटकन लागून जाते. आपण आळशी कधी होतो, हेही आपल्या लवकर लक्षात येत नाही. चला पाहुयात अशाच काही गोष्टी ज्यामुळे आपणही आळशी बनत जातो... तपासून बघा ही लक्षणं आपल्यात तर दिसत नाहीएत ना!

- आजची कामं उद्यावर ढकलणं व मी हे काम करेन असं म्हणणं

- काम पाहताच ते अशक्य असल्याची तक्रार करणं

- आव्हानांचा सामना करण्याची भीती वाटणं आणि धाडस नसल्याचा बहाणा करणं

- आयुष्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याविषयी काहीच माहिती नसणं

- नवी नाती निर्माण करून त्रास कमी करण्याविषयी विचार करणं

- प्रत्येक छोट्या-मोठय़ा गोष्टींवर वाद घालणं

- पुढे जाण्यासाठी चुकीच्या लोकांनाही माफ करावे लागतं, पण अशा लोकांना कधी माफ करणार नाही, असा विचार करणं.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive