Friday, September 13, 2013

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, नरेंद्र मोदी.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं अखेर आज अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत, संसदीय समितीच्या बैठकीनंतर, नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं आणि मोदीसमर्थकांच्या आनंदाला उधाण आलं. दुसरीकडे, या घोषणेमुळे लालकृष्ण अडवाणींच्या गोटात सुतकी वातावरण पाहायला मिळतंय.

पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये गेले अनेक दिवस अंतर्गत कलह सुरु होता. राष्ट्रीय स्वयसेवक संघ आणि विहिंप यांनी मोदींना हिरवा कंदिल दिल्यानंतर मोदींचे नाव जवळ-जवळ निश्चित झाले होते. मात्र मोदींच्या नावाला अडवाणी यांचा विरोध कायम होता. अडवाणींची नाराजी दूर करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न करण्यात आले मात्र यामध्ये कोणालाच यश आले नाही. अखेर आज अडवाणींना डावलून भाजपच्या संसदीय समितीची बैठक घेण्यात आली. शेवटपर्यंत अडवाणींचा मोदींना विरोध असल्याने त्यांनी संसदीय बैठकीकडे देखील पाठ फिरवली.

बैठकीत झालेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर मोदींच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज दिवसभरापासूनच मोदी सर्मथकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत होतं. भाजपमधील अंतर्गत विरोध, उमेदवारी जाहीर करण्यास होणारा विलंब यामुळे मोदी समर्थक काही काळ चिंतेत पडले होते. मात्र भाजप कार्यकारिणीने अखेर मोदींच्याच बाजूने कौल दिला आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email