Wednesday, September 4, 2013

Googles New Kitkat Android


गुगलचे नवे ‘किटकॅट अँड्रॉइड’


मोबाइल जगतात क्रांती घडवणाऱ्या गुगलच्या 'अँड्रॉइड' या ऑपरेटिंग सिस्टिमचे नवे अत्याधुनिक व्हर्जन लवकरच बाजारात येणार आहे. या नव्या व्हर्जनचे नामकरण 'किटकॅट' असे करण्यात आले असून या चॉकलेटच्या बार्सच्या डिझाइनचा अँड्रॉइड मॅसकॉट तयार करण्यात आला आहे.

'अँड्रॉइड'चे प्रमुख सुंदर पिचई यांनी काल रात्री ट्विटरवरुन नव्या व्हर्जनची घोषणा केली.
'किटकॅट' ही अँड्रॉइडची ४.४ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही सिस्टीम बाजारात कधी येणार याबद्दल गुगलने औपचारीक घोषणा केली नसली तरी पुढील महिन्यात लाँच होणारा गुगलचा 'नेक्सस' फोन किटकॅटवर चालणारा असू शकतो, असा अंदाज टेक बाजारात वर्तवला जात आहे.

'एक अब्जाहून अधिक स्मार्टफोन आणि टॅबलेट अँड्राइड सिस्टीमवर काम करतात. या यंत्रणेमुळे जीवन अधिक सुखकर झाल्याने आम्ही सर्व अँड्रॉइड व्हर्जन्सची नावे डेझर्स्टमधील पदार्थांच्या नावावरून ठेवली आहेत. चॉकलेटसारख्या गोड गोष्टीपासून दूर रहाणे आपल्या सर्वांसाठीच अवघड आहे. त्यामुळेच नव्या व्हर्जनचे नामकरण करताना आम्ही 'किटकॅट' या लोकप्रिय चॉकलेटचे नाव घेतले आहे,' अशी माहिती गुगलने दिली आहे.

'किटकॅट'च्या नावासाठी गुगलने 'नेसले' कंपनीशी रीतसर करार केला आहे. या करारानंतर 'नेसले'ने 'अँड्रॉइड किटकॅट'च्या सेलिब्रेशनसाठी खास चॉकलेट बार तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 'नेसले' जगभरातील १९ देशांमध्ये ५ कोटी अँड्रॉइड स्पेशल किटकॅट चॉकलेट बार बाजारात आणणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जर्मनी, जपान, दुबई, रशिया, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये हे चॉकलेट्स विकण्यात येणार आहेत. हे चॉकलेट घेणाऱ्यांना अँड्रॉइड किटकॅट वेबसाइटवर गुगल नेक्सस सेव्हन टॅबलेट जिंकण्याची संधी तसेच गुगल प्लेवर क्रेडिट्सही बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच अँड्रॉइड किटकॅटचा मुखवटाही बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

'अॅपल'वर कुरघोडी

'सध्या एक अब्ज मोबाइलधारक अँड्रॉइड वापरतात. नव्या व्हर्जनमुळे यात आणखी वाढ होईल, अशी आशा पिचई यांनी व्यक्त केली आहे. येत्या आठवड्यात अॅपल नव्या आयफोनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. त्याआधीच गुगलने ही अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनची घोषणा करत अॅपलवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.

अँड्रॉइडच्या नामकरणाचा प्रवास

पहिले व्हर्जन - अँड्रॉइड १.५ - अँड्रॉइड कपकेक
दुसरे व्हर्जन - अँड्रॉइड १.६ - अँड्रॉइड डोनट
तिसरे व्हर्जन - अँड्रॉइड २.० - अँड्रॉइड इक्लेअर
चौथे व्हर्जन - अँड्रॉइड २.२ - अँड्रॉइड फ्लोयो
पाचवे व्हर्जन - अँड्रॉइड २.३ - अँड्रॉइड जिंजरब्रेड
सहावे व्हर्जन - अँड्रॉइड ३.० - अँड्रॉइड हनीकोब्म
सातवे व्हर्जन - अँड्रॉइड ४.० - अँड्रॉइड आइस्क्रीम सॅण्डविच
आठवे व्हर्जन - अँड्रॉइड ४.१ - अँड्रॉइड जेलीबीन ४.१
नववे व्हर्जन - अँड्रॉइड ४.२ - अँड्रॉइड जेलीबीन ४.२
दहावे व्हर्जन - अँड्रॉइड ४.३ - अँड्रॉइड जेलीबीन ४.३
अकरावे व्हर्जन - अँड्रॉइड ४.४ - अँड्रॉइड किटकॅट
No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email