Thursday, September 5, 2013

समर्थाची टाकळी, Samarth Ramadas Swami's Takli

टाकळी नावाच्या गावात ते इ. स. १६२१ ते १६३३ असे १२ वष्रे राहिले. येथेच त्यांनी साधना केली. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप, दररोज १२०० सूर्यनमस्कार करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास केला.
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
ही गणपतीची आरती लिहून जगभरातील गणेशभक्तांच्या मनात स्थानापन्न झालेल्या समर्थ रामदास स्वामी यांची ४०६ वी जयंती येत्या रामदास नवमीला दि. १६ फेब्रुवारी रोजी देशभर संपन्न होत आहे. त्यासाठी नाशिक येथील टाकळी येथील समर्थानी स्थापन केलेला पहिला मठ सज्ज झाला आहे. कसा आहे समर्थानी स्थापन केलेला पहिला मठ . त्याचा हा आँखों देखा वृतान्त
‘सावधान’ हा शब्द ऐकताच लग्नाच्या बोहल्यावरून पळालेले रामदास स्वामी सर्वाना ठाऊक आहेत. १६ फेब्रुवारी २०१२ रोजी दास नवमी म्हणजे रामदास स्वामींचा ४०६ वा जन्मदिन.
१६०६ साली रामनवमीच्या दिवशी जालना जिल्हातील जांब या गावी त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर. आईचे नाव राणूबाई. त्यांना एक मोठा भाऊ होता- गंगाधर. यांचं मूळ नाव नारायण. लहानपणापासून नारायणचे लक्ष अध्यात्माकडे होते. आईला वाटायचे याचे लग्न करून दिले तर हा संसारात रमेल. त्यामुळे नारायणाचा नकार असतानाही त्याच्या लग्नाचा घाट घालण्यात आला. लग्नासाठी बोहल्यावर उभं राहिल्यावर लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाच्या तोंडून ‘सावधान’ हा शब्द ऐकताच बोहल्यावरून पळून गेले.. ते थेट नाशिक जवळच्या पंचवटीत आले.
रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव याच्यासाठी बनविलेली गोमय मारुतीची मूर्ती हे इथलं वैशिष्टय़. १६३३ च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतच्या हातांनी ही गोमयी मिश्रणाची श्रीमारुतीरायाची मूर्ती स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती.
येथे टाकळी नावाच्या गावात ते इ. स. १६२१ ते १६३३ असे १२ वष्रे राहिले. येथेच त्यांनी साधना केली. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप, दररोज १२०० सूर्यनमस्कार करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास केला.
आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा. आज टाकळी येथील रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या स्थानाचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. समर्थाची ध्यानासाठी बसण्याची व विश्रांतीची जागा फरशा व टाइल्स बसवून सुशोभित करण्यात आली आहे. वीज आली आहे. नंतरच्या काळातही समर्थाचे वास्तव्य बऱ्याच वेळा घळींमध्येच असायचं. त्यांच्या वास्तव्यामुळे सज्जनगडावरील रामघळ, मोरघळ, तोंडोशीघळ, त्याच प्रमाणे महाड जवळची शिवथरघळ प्रसिद्ध झाल्या आहेत.
टाकळी येथील रामदास स्वामींच्या मठातील गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आिदच्या मूर्ती आहेत. परंतु स्वत: रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव याच्यासाठी बनविलेली गोमय मारुतीची मूर्ती हे इथलं वैशिष्टय़. १६३३ च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतच्या हातांनी ही गोमयी मिश्रणाची श्रीमारुतीरायाची मूर्ती स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती. त्यामुळे या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येथे येतात.
नंतर भारत भ्रमण करून आल्यानंतर त्यांनी समाजात शक्तीच्या साधनेचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मारूतीची स्थापना केली. यातील अकरा मारुती विशेष प्रसिद्ध आहेत.
टाकळी येथील साधना काळातच रामदासांनी कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला पूनप्र्राण अ्र्पण केले असे सांगतात. या कुलकर्णीनी आपला पहिला पुत्र रामदास स्वामींना अर्पण केला. तोच त्यांचा पहिला शिष्य उद्धव.
१६३० साली शहाजीराजे भोसले यांनी टाकळी येथे येऊन रामदास स्वामींची भेट घेतल्याचा उल्लेख येथील माहिती फलकावर करण्यात आलेला आहे. टाकळी येथील मठातही एका कोनाडय़ात रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत.
टाकळी येथील गाभाऱ्याबाहेर एक मोठा सभामंडप आहे. येथे काचेच्या मोठय़ा पेटीत रामदास स्वामींची मोठी सुबक मूर्ती आहे.
रामदास स्वामींनी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ प्रसिद्ध आहेत. मोरगाव येथील गणपतीला पाहूनच रामदास स्वामींना ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही सुप्रसिद्ध आरती स्फुरली. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेले ‘भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारुती’ हे मारुतीचे स्तोत्र सर्व हनुमान भक्त भक्तीभावाने म्हणतात.
समर्थाचा शिष्य संप्रदाय पुढे महाराष्ट्रात सर्वत्र पसरला. त्यांच्या प्रमुख शिष्यांत कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणास्वामी, अक्काबाई, भीमस्वामी, दयानंदप्रभू, दिवाकर स्वामी यांचा समावेश होतो.
समर्थानी येथे बारा वष्रे राहून साधना केली. पहिला मठ व पहिला मारूती त्यांनी येथे स्थापन केला तसेच त्यांचा पहिला शिष्य उद्धवस्वामी त्यांना याच ठिकाणी मिळाला. त्यामुळे समर्थाच्या टाकळी येथील मठाला रामदासी संप्रदायात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive