Privacy Policy

Friday, March 12, 2010

सांग असं अर्ध्यावर कुणी तोडतं का नात

मिठी

सांग असं अर्ध्यावर कुणी तोडतं का नात
पडला ना जो कमी काही, त्यास विश्वास म्हणतात.

तुला एकदाही न वाटले विचारावा खड्सून जाब
मग मी केलेना जे प्रेम ,त्यास माझी व्ययक्तीक बाब म्हणतात.

तुला वाटलेच कधी हसावे तर हास तुझ्यासारखेच गोड
माझ्यासारख्याचे जे होते ना, त्यास घायाळ म्हणतात.

तुला हवा होता देव पूजावया खास
चुकतो ना जो माझ्यासारखा कुणी, त्यास माणूस म्हणतात.

आता तुही बसतेस डोके खुपसून मांडीमध्ये
पाझरतो ना जो कुणी डोळ्यातून ,त्यास पश्चाताप म्हणतात.

मी नसल्यावरही होतो माझा असल्याचा भास तुला
कावरी बावरी होतेस ना सारखी, त्यास विरह म्हणतात.

आता धावत ये घडल्या प्रसंगाची ना मानता भीती
समावशील ना अवघी ज्यात, त्यास मिठी म्हणतात.

No comments:

Post a Comment