सचिनचं नाव प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. - सचिन जेव्हा पाकिस्तानच्या दौऱ्यावर पहिल्यांदा गेला होता (१९८९) तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर त्याच्यासोबत गेले होते. या टूरवर असताना सचिनने स्वतच्या हाताने ऑम्लेट बनवलं होतं. - सचिनचं पहिल्यांदा फास्ट बॉलर बनायचं स्वप्न होतं यासाठी त्याने एमआरएफ पेस अॅकडमी, चेन्नई येथे जाऊन डेनिस लिली यांच्याकडून ट्रेनिंगही घेतलं होतं. - १९९० यशस्वी दौऱ्यानंतर त्याने तो राहात असलेल्या साहित्य सहवास सोसायटीमधील लोकांना बांद्रा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी दिली होती. - पहिली इंग्रजी विलोची बॅट दिलीप वेंगसरकर यांनी त्याला दिली होती.
- सचिनने रणजी, इराणी आणि दिलीप ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. - थर्ड अंपायर आऊट दिला गेलेला सचिन पहिला बॅट्समन आहे. - सचिन अंजलीला १९९० मध्ये भेटला. एका मुलाखतीत त्यांने सांगितलं होतं की, मला ती आवडली कारण तिला लाजता येत होतं. - १७ व्या वर्षी सचिनने पहिल्यांदा कार खरेदी केली. निळ्या रंगाची मारूती ८०० घेऊन आपल्या मित्रांना बांद्रा स्टेशनला सोडायला तो गेला होता तेव्हा आपल्याकडून दंड आकारला जाणार अशी भीती त्याच्या मनात होती. - भारत आणि न्यूझीलंडमध्ये १९८९-९० मध्ये झालेल्या नेपियर टेस्टमध्ये तो ८८ रन्सवर असताना जॉन राईट यांनी त्याचा झेल पकडला आणि सर्वात कमी वयात कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम चुकला. - १९९० च्या इंग्लंड दौऱ्यात त्याला मनोज प्रभारकने पोहायला शिकवलं होतं तेही अवघ्या अध्र्या तासात - घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सचिन कधी कधी स्वत: चहा बनवितो. - सचिनला वांग्याचे भरीत बनविता येते. - त्याला आईच्या हातचं जेवण खूप आवडतं त्यातल्या त्यात मच्छी म्हणजे काही विचारायलाच नको. - त्याला घडय़ाळं प्रचंड आवडतात, त्याच्याकडे अनेक देशी विदेशी कंपन्यांची घडय़ाळं आहेत. - मुंबईसाठी खेळायला सुरूवात केल्यानंतर त्याचा लोकल ट्रेनचा प्रवास थांबला. - वरळीच्या सत्यम सिनेमागृहात लागलेला 'रोजा' हा सिनेमा पहाण्यासाठी त्याने वेशांतर केले होते. - टेस्ट मॅचच्या पहिल्या अवघड अनुभवानंतर टेस्ट क्रिकेट आपण खेळू शकणार नाही असं वाटलं होतं - मार्शल, रॉबर्ट्स, होल्डिंग आणि गार्नर या वेस्ट इंडिजच्या महान बॉलर्सचा सामना करण्याची संधी न मिळाल्याची खंत त्याला नेहमीच जाणवते. - सचिनने त्याच्या आयुष्यातली पहिली एका वर्तमानपत्राला दिलेली मुलाखत एका इराण्याच्या हॉटेलात दिली होती. - एकदा पत्रकारांच्या फोन कॉल्सला कंटाळून तो सोसायटीतील आपल्या एका मित्राकडे गेला आणि तिथे त्याने चित्रपट पाहत अनेक दिवस एकांतात घालवले होते. - जाने भी दो यारो हा त्याचा सर्वात आवडता चित्रपट आहे. - अमिताभने सचिनला 'देश की धडकन' म्हटलं होतं - फैसलाबाद टेस्ट इम्रान खानच्या एका इनस्विंगरवर तो आऊट झाला होता. तेव्हा त्याने 'फुटभर आत आला' असे उद्गार काढले होते. - सचिन हा एक खवैय्या आहे. सलील अंकोलासोबत तो नेहमी खाण्याची शर्यत लावायचा आणि जिंकायचाही. - सचिनला टेबल टेनिस चांगलं खेळता येतं. तो दोन्ही हातांनी खेळू शकतो. टूरवर जाताना त्याच्या बॅगमध्ये रॅकेट असतेच. - त्याच्या किटबॅगमध्ये त्याची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनी बनविलेलं एक कार्ड असतं ज्यावर ऑल द बेस्ट पापा' असं लिहिलेलं आहे. -सचिन आजही आई रजनी तेंडुलकर यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. - सचिन मुंबईत असताना त्याला वडापाव खायला आवडतं.
No comments:
Post a Comment