Privacy Policy

Tuesday, March 23, 2010

'मला उद्योजक व्हायचंय'वर परिसंवाद

'मला उद्योजक व्हायचंय'वर परिसंवाद

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला उद्योजक समितीतफेर् 'मला उद्योजक व्हायचंय' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता, फोर्टमधील १२ के. दुभाष मार्ग, ओरिकॉन हाऊस, सहावा मजला, बाबासाहेब डहाणूकर सभागृहात हा परिसंवाद होणार आहे.

शाळा महाविद्यालयांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तरुण वर्ग, स्वेच्छानिवृत्ती घेऊन नवीन व्यवसाय करण्यास इच्छुक असलेले विशेषत: वेळेनुसार व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव उद्योजक महिला यांच्यासाठी या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच उद्योग व्यवसायांना मदत करणाऱ्या संस्थांची ओळखही या परिसंवादात करून दिली जाणार आहे. बाजारपेठ मिळवण्याचे तंत्र, यशस्वी उद्योजकांचे अनुभवकथन, अर्थसाह्यासाठी सरकारी अन्य योजनांची माहिती या कार्यक्रमात करून दिली जाणार आहे. हा परिसंवाद मराठीत होणार आहे.

हा परिसंवाद सशुल्क असून नोंदणी अधिक माहितीसाठी चेंबरचा पत्ता : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ओरिकॉन हाऊस, वा मजला, १२ के दुभाष मार्ग (म्युझियमच्या मागे) लायन गेटजवळ, मुंबई ४००००१. फोन (०२२) २२८५५८५९ किंवा ९८२१३४०८८८


No comments:

Post a Comment