परीक्षा जवळ आल्याने मुलांची धडधड वाढली आहे. कितीही मेहनत केली असेल तरी शेवटी नर्व्हसनेस येणे साहजिकच आहे. काही मुले तर परीक्षा हॉलमध्ये गेल्याबरोबरच सर्व काही विसरून जातात. यासंदर्भात ज्योतिषींनी दिलेले सल्लेही काम येऊ शकतात. खाली दिलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा.... * परिक्षेचा संबंध बुध ग्रहाशी असून त्याचा संबंध स्मरणशक्तीशी आहे. बुध ग्रहला प्रबळ करण्यासाठी सलाड व हिरव्या भाज्या खायला हव्या. गणपतीचे दर्शन करायला हवे. गाईला हिरवे गवत चारले पाहिजे. जन्मपत्रिकेप्रमाणे पाचू धारण केला तर त्याची फळे उत्तम मिळतात. शंखपुष्पीचे सेवन केल्यानेसुद्धा लाभ होतो. * चंद्र ग्रह हा मानसिक संतुलनाचा कारक आहे. हा ग्रह प्रबळ असेल तर आत्मविश्वासात भर पडते. पांढर्या वस्तुंचे सेवन, दान, महादेवाचे दर्शन व शिव चालिसा वाचल्याने, करंगळीत चांदीच्या धातुची अंगठी घातल्याने किंवा चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने चंद्र प्रबळ होतो. पत्रिकेत चंद्राच्या स्थितिनुसार मोती घातल्याने लाभ अवश्य होतो. काही अन्य उपाय... * तुळशीचे पान व खडीसाखर सोबत वाटून त्याच्या रस प्यायल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. * चिंचेची पाने पुष्य नक्षत्रात आपल्या पुस्तकात ठेवायला हवी. * पुष्य नक्षत्रात 'योगेश्वर श्रीकृष्ण प्रसन्नो भव:' या मंत्राला सोनेरी झाकण असणार्या लाल रंगाच्या व लाल शाईच्या पेनने 31 वेळा लिहून 108 वेळा त्याचा जप करायला पाहिजे. * अभ्यासात लक्ष लागत नसेल तर मंगळवारी मसुराची डाळ लाल कपड्यांत बांधून मुलांच्या अभ्यासाच्या बॅगमध्ये ठेवल्याने अभ्यासाची गोडी वाढते. * 'ऊँ ह्रीं अर्हंणमो क्रुद्ध बुद्धिणं' किंवा 'वद् वद् वागवादिनी नम:' मंत्राचा जप लागोपाठ 14 दिवस 108 वेळा करायला पाहिजे व सरस्वतीचे ध्यान करून लाल फुल, लाल वस्त्र वाहिले तर यश निश्चितच मिळेल. हे कार्य वसंत पंचमीपासून सुरू करायला हवे किंवा कुठल्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारपासून सुरू केले पाहिजे. विशेष सूचना : वर दिलेल्या उपायांसोबत विद्यार्थ्यांनी तेवढाच अभ्यासही करायला हवा. तरच यश तुमच्या पदरी पडेल.
No comments:
Post a Comment