Privacy Policy

Thursday, May 20, 2010

खोब्रागडेच्या बदली विरोधात रास्ता रोको

बेस्ट महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांची बदली आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवपदी झाल्याच्या निषेधार्थ एससी असोशिएशनच्या वतीने दादर सर्कल येथे रास्ता रोको करण्यात आले. यामुळे या भागात काहीकाळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
कामगार संघटनांच्या विरोधात दंड थोपटलेले आणि कारकीर्द वादग्रस्त ठरलेले खोब्रागडे यांच्या समर्थनासाठी एससी संघटनेने हे रास्ता रोको केल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांना अटक करून परिस्थितीवर नियंत्रण आणले असून सध्या या भागातील परिस्थिती आटोक्यात आहे.
 

No comments:

Post a Comment