भारतात कर चुकवून आणि गैरव्यवहार करून कमावलेला काळा पैसा परदेशी बँकांमध्ये साठवणाऱ्यांना जर्मन सरकारने मोठा झटका दिला आहे. जर्मन बँकांमध्ये काळा पैसा साठवणाऱ्या पन्नास भारतीयांची यादी जर्मन सरकारने भारताच्या हाती सुपूर्द केली आहे. या ५० जणांना सरकारने कर चुकवल्याबद्दल नोटिस पाठवली आहे.
जर्मन सरकारने ही नावे दोन महिन्यांपूवीर् पाठवली होती. मात्र त्यांची खातरजमा केल्यानंतरच त्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे, असे केंदीय प्रत्यक्ष कर मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र नोटिस पाठवलेल्या लोकांची नेमकी संख्या आणि जर्मन बँकेत असलेल्या काळ्या पैशाची नेमकी रक्कम लगेच कळणार नाही, असेही ते म्हणाले.
याबाबत स्विस सरकारशीही बोलणी सुरू असून स्विस बँकेत जमा असलेल्या भारतीय काळ्या पैशाबाबत माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपण स्विस सरकारशी सुरू असलेल्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण करू, असा विश्वास अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांनी संसदेत व्यक्त केला होता.
गेल्या वषीर् झालेल्या लोकसभा निवडणुकीत काळा पैसा हा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. संधी दिल्यास परदेशी बँकांमध्ये गुंतलेला काळा पैसा भारतात आणून देशाच्या विकासासठी त्याचा वापर करू, अशी भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी घेतली होती.
No comments:
Post a Comment