आरोग्यदायी पावसाळ्यासाठी...
आरोग्यदायी पावसाळ्यासाठी...
पावसाळा म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप अशा विषाणूजन्य आजारांचा काळ. सांधेदुखी, दमा व त्वचाविकार यांच्यासारखे त्रासही याच काळात सतावतात. या मोसमात फिट
राहण्यासाठी टीप्स देत आहेत डॉ. राहुल सावंत.
.............
टीम नाशिक
कशी घ्याल काळजी...
द्य या काळात पचनशक्ती क्षीण होत असल्याने, दोन घास कमीच खावेत. अन्न ताजे, हलके व गरम असावे. (चातुर्मासातील उपवास अर्थात लंघन हा या काळातीच एकप्रकारचा उपचारच)
द्य सुंठ टाकून उकळविलेले पाणी किंवा किमान २० मिनिटे उकळविलेले पाणी गाळून प्यावे. आजारी व्यक्ती, बालक अथवा वृद्धांनी सुवर्णसिद्ध जल घेणे उत्तम.
द्य दुपारच्या जेवणात आले ठेचून त्यासोबत काळेमीठ चावून खावे. जेवणानंतर काळेमीठ+आले+पुदीना+जीरे व साजुकतुपाची फोडणी दिलेले ताक किंवा मनुक्याचे सूप घ्यावे.
द्य धान्य शक्यतो भाजून वापरावे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू वापरावा. मूग, कुळीथ, तूर प्रमाणात खावे. पालेभाज्या कृमीकर असल्याने खावू नये अथवा वापरण्यापूवीर् स्वच्छ धुवून घ्याव्यात. गिलके, दोडके, दुधीभोपळा या फळभाज्या, तसेच गाजर, काकडी, सुरण, बटाटा इ. कंद आहारात घ्यावे.
द्य हिंग, दालचिनी, धने, जिरे, हळद या मसाल्याच्या पदार्थांसोबत दूध, तूप, मध यांचे प्रमाण वाढवावे.
द्य तुळशीचे पान, गवती चहा, आलं टाकून चहा अथवा गरमागरम सूप प्यावे.
द्य कोमट तिळतेलाने सर्वांगाला विशेषत: तळपायाला मालिश करुन सुगंधी उटणे लावून गरम पाण्याने स्नान करणे.
द्य अंग कोरडे ठेवावे. सुती, स्वच्छ, वाळलेले कपडे घालावेत. घरात धूपन (गुग्गुळ+कडुलिंबाचा पाला+उद) केल्यास वातावरण शुद्ध होण्यास मदत होते व प्रसन्न वाटते.
हे टाळाच...
द्य पावसात फिरणे, ओल्या अंगाने राहणे अथवा केस ओले ठेवणे.
द्य रात्री जागरण किंवा दिवसा झोपणे
द्य व्यायाम
द्य व्यसन टाळणे उत्तम
द्य पचायला जड (मिठाई, चीज, ब्रेड, दही, राजमा, हरबरा, चवळी, शिळे अन्न, मैद्याचे पदार्थ, उघड्यावरील अन्न) पूर्णपणे टाळावे.
आजार व उपचार
उलटी, मळमळल्यासारखे वाटल्यास लंघन करावे. साळीच्या लाह्या, लिंबू सरबत घेऊन खडीसाखर चघळावी. डाळिंबाचा रस असा क्रम ठेवणे.
द्य तापलेल्या तव्यावर वेलचीच्या टरफलांची राख करुन त्याच्या वस्त्रगाळ चुर्णाचे मधासोबत चाटण केल्यास उलटी थांबते.
द्य जुलाब होणे, आव पडत असल्यास पचायला हलका पातळ आहार, गरम पाणी घ्यावे. मसूरडाळीच्या सूपाने लाभ होतो.
द्य सदीर् खोकला असल्यास सितोपलादी चूर्ण मधासह चाटण, तसेच ताप असताना त्रिभुवणकितीर् रस घेणे हितकर.
द्य दमा असलेल्यांनी कोमट तेलाने छातीला मालिश करुन, तसेच गरम पाण्याने किंवा गरम कापडाने छाती शेकणे. नस्य व दीर्घश्वसनाने आराम पडतो. संधीवात, आमवात असणाऱ्यांनी निर्गुडीतेलाने दुखऱ्या भागावर मालिश करुन वाफेचा शेक घ्यावा.
पंचकर्म
शरीरातील दोषांना गती देणारा वात नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येकाने बस्ती (मेडिकेटेड ऑईल एनिमा) घेतल्यास इतर ऋतुंप्रमाणेच पावसाळादेखील निश्चितच आरोग्यदायी व आनंददायी जाईल.
No comments:
Post a Comment