कणा ताठ ठेवा
'ताठ उभे राहा, खांदे सरळ ठेवा' विद्याथीर्दशेत ही सूचना आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे. शरीराची ठेवण योग्य ठेवण्यासाठी आईवडिलांपासून शिक्षकापर्यंत सगळेच
सांगत असतात. शरीराची स्थिती फक्त शरीराला योग्य आकार मिळवून देते असं नाही, तर लवकर थकवा न येता तुम्ही अधिक काळ कार्यशील राहू शकता. ......... शरीराची स्थिती/ठेवण योग्य न ठेवल्यास होणारे दुष्परिणाम : पोक येणं कमकुवत पाठ खांदे मागच्या किंवा पुढच्या बाजूला ओढल्यासारखे होणं श्वसनावर परिणाम होणं पोक आल्यामुळे उंची कमी दिसणं योग्य ठेवण म्हणजे काय? मान, खांदे, गुडघे आणि घोटा यांची स्थिती रिलॅक्स आणि एका रेषेत दिसते. शरीराची स्थिती योग्य ठेवल्यामुळे मणकाही सरळ राहतो आणि शरीराचं वजन समप्रमाणात विभागलं जातं. शरीराची स्थिती योग्य राखण्यासाठी काही टिप्स : नियमित व्यायाम : शरीराची हालचाल होत नसल्यास स्नायू कमकुवत होतात, तर नियमित व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात. सांधेदुखी आणि शरीराला ताठरपणा जाणवत असेल तर तुमचं शरीर मजबूत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. वजनावर नियंत्रण : वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास पाठीच्या कण्यावर ताण येऊन शरीराची स्थिती बिघडू शकते. गादी : आपण ज्या गादीवर झोपतो, ती गादी तुमच्या पाठीच्या कण्याला सपोर्ट करणारी असेल याची खातरजमा करून घ्या. योग्य वर्कस्पेस : आपला बराचसा वेळ ऑफिसमध्ये जातो. तिथे पाठीच्या खालच्या बाजूला आधार देणाऱ्या खुचीर्तच बसा. पाय जमिनीवर व्यवस्थित पोहचतील, अशा बेताने खुचीर् जमिनीपासून योग्य अंतरावर ठेवा. तसंच कम्प्युटरची स्क्रीन डोळ्यांच्या सरळ रेषेत असू दे. जेणे करून पाठ आणि मानेवर ताण येणार नाही. स्ट्रेचिंगसाठी ब्रेक : एकाच जागेवर बराच वेळ बसणं किंवा एकाच स्थितीत बराच वेळ उभं राहिल्यामुळे शरीराची ठेवण बिघडू शकते. यासाठी दर एक दोन तासांनी चालण्यासाठी किंवा स्ट्रेचिंगसाठी ब्रेक घ्या. योग्य फूटवेअर : हाय हील्सच्या चपला बराच काळ वापरल्यास शरीराला त्रास होतो. पाय, गुडघे आणि पाठीच्या मणक्याला आधार देणारे योग्य चपलाच वापरा.
No comments:
Post a Comment