सायरस जहाँगीर सातारावाला इतरांच्या यशाचा, प्राप्तीचा विचार करू नका. तुमच्या स्वत:च्या इच्छापूतीर्साठी, आकांक्षासिद्धीसाठी वेळ द्या. जे काम तुम्ही आत्ता करताहात, त्यावर लक्ष केंद्रीत करा, अंतिम परिणाम काय होईल याची चिंता करत बसून ऊर्जेचा अपव्यय होऊ देऊ नका. बस्स, फक्त संपूर्णपणे हातातल्या कामामध्ये एकजीव होऊन जा. ............... या जगातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे, हे तुम्हाला माहितेय? कुठल्यातरी साम्राज्याचा सर्वशक्तीमान राजा किंवा सत्तासार्मथ्य, संपत्ती असलेला माणूस ती व्यक्ती नाही. ती महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत: आहात. तुम्ही जेवढा स्वत:चा विचार करता, तेवढा कोणीही तुमचा करत नाही. तेवढा कुणाला रस नसतो, आणि ते काही फारसं योग्यही नाही. प्रत्येकाला स्वत:तल्या गुणांचं कौतुक करण्याची ओढ असते. ज्यावेळी कधी तुम्ही एखाद्या गोष्टीची आस धराल, मनापासून ती गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा बाळगता, त्यावेळी तुमच्या विचारांची श्ाृंखला त्या इच्छा सत्यात उतरवण्याच्या दिशेने काम करू लागते, ती इच्छा मूर्त स्वरुपात कशी येईल हे बघू लागते. तुमच्या इच्छा-आकांक्षांची अचूक जाणीव तुम्ही करून घेतलीत, की स्वत:चं मूल्य कळण्याची सुरूवात होते आणि त्या इच्छा सत्यात उतरवण्यासाठी बळही मिळतं. मानसन्मान, धनदौलत तुम्ही न मागताही मिळू शकते, परंतु त्याचा स्वीकार करण्याची आणि योग्य वापर करण्याची तुमची तयारी नसेल तर मिळालेलं सगळं तुम्ही गमावूही शकता. त्यामुळे तुमचं पहिलं कर्तव्य तुमच्याप्रती आहे, जगासाठी काही करायचं नाहीये तर तुमचा आधी विचार करायचा आहे. एकाच प्रेक्षकाला तुम्हाला रिझवायचं आहे, तो प्रेक्षक तुम्हीच आहात. तुमचं स्वत:शी सख्य होणं, एकतानता साधली जाणं, आणि स्वत:ला स्वत:त सुख मिळणं महत्त्वाचं आहे. असं झालं की, जगात ज्या ज्या गोष्टींशी संबंध येईल त्यावेळी तुम्ही आजुबाजुचं वातावरण भारून टाकाल, त्यामध्ये चैतन्य निर्माण कराल. तुम्ही जी काही गोष्ट कराल, तीत स्वत:ला संपूर्णपणे झोकून द्या. या विश्वात स्वत:ला नगण्य समजणं किंवा किरकोळ समजणं म्हणजे स्वत:ला महत्त्व न देण्यासारखं आहे, दिवस ढकलल्यासारखं जगण्यासारखं आहे. तर चांगलं जगण्यासाठी, उच्च दजेर्दार गोष्टींच्या प्राप्तीसाठी झोकून दिलं, तर त्याची चांगली फळं ही मिळतातच. त्यामुळे तुमचं स्वत:चं महत्त्व आधी ओळखा, स्वत:ला न्यून लेखू नका. तुम्ही जे काही काम करताहात ते असं करा की, तुमच्या वयाच्या वा अनुभवाच्या कुठल्याही व्यक्तीने याआधी ते इतकं सुंदर केलं नसेल. नंतर त्यापेक्षा मोठ्या, आव्हानात्मक गोष्टी समोर येतील, त्यांनाही सकारात्मक, आव्हान स्वेच्छेने स्वीकारण्याच्या वृत्तीने सामोरे जा, मग आणखी प्रगतीचा पुढचा टप्पा...अपरिहार्यच आहे. प्रत्येक गोष्टीत मग ती कितीही लहान का असेना, जी व्यक्ती जीव ओतून रस घेते, अशा व्यक्तीच्या प्रतीक्षेत जग नेहमीच असतं. जे तुम्हाला हवंहवंसं वाटतं, ते कष्ट करण्याच्या योग्यतेचं असणार. इतरांच्या यशाचा, प्राप्तीचा विचार करू नका. तुमच्या स्वत:च्या इच्छापूतीर्साठी, आकांक्षासिद्धीसाठी वेळ द्या. जे काम तुम्ही आत्ता करताहात, त्यावर लक्ष केंदीत करा, अंतिम परिणाम काय होईल याची चिंता करत बसून ऊजेर्चा अपव्यय होऊ देऊ नका. बस्स, फक्त संपूर्णपणे हातातल्या कामामध्ये एकजीव होऊन जा. स्वत:चा साकल्याने विचार करा, संपूर्ण जगाची चिंता वाहण्याआधी, मानवजातीचं कल्याण करायला निघण्याआधी स्वत:साठी कठोर परीश्रम करा, स्वत:वर कष्ट करा. तुम्ही फक्त व्हीआयपी नाहीयात, तर एमआयपीडब्ल्यू, 'दी मोस्ट इंम्पॉर्टन्ट पर्सन इन दी र्वल्ड' आहात. तुम्हाला काय साध्य करायचंय, का साध्य करायचंय याचा मानसिक पातळीवर पूर्ण विचार झाला की, ते साधण्यासाठी काय करावं लागेल, याचा कृती कार्यक्रमच आखा. तुम्ही ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी इच्छाशक्ती, प्रयत्न आणि संपूर्ण ऊर्जा केवळ त्याच्यासाठी पणाला लावा. परिस्थिती बदलायची असेल, तर पहिल्यांदा जरा वेगळ्या पद्धतीने, हटके विचार करायला लागा. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी मानसिक स्तरावर स्वीकारू नका, गरजेपेक्षा एक सेकंददेखील त्यांच्यावर विचार करू नका. यामुळे अक्षरश: आयुष्य बदलणारा वैचारिक ऊजेर्चा स्त्रोतच तुम्ही निर्माण कराल, जो अवास्तव, कल्पनेपलीकडच्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवून दाखवेल. तुमच्या ध्येयाचं चित्र डोळ्यासमोर आणा, वारंवार त्याच्याकडे बघा आणि तिथपर्यंत कसं पोचायचं याचा मार्ग विस्ताराने नीट निरखा. तुम्ही ध्येय साध्य करणार यावर विश्वास ठेवा. त्यानंतर जगामधल्या त्या पवित्र शक्तीची, देवाची, निसर्गाची मदत मागा, त्यापासून स्फूतीर् घ्या; तुमच्या मनातल्या प्रतिमेप्रमाणे तुमच्या इच्छा-आकांक्षा, ध्येयं प्रत्यक्षात उतरताना तुम्ही बघाल. पाणी भांड्याचा, पाइपचा जसा आकार असतो तो आकार धारण करतं. तुमच्या मनामध्ये ज्या विचारांचं अधिष्ठान असेल, थेट त्यांचं रुपांतर तुमच्या आयुष्यात तुमच्या यशामध्ये होतं. ( अनुवाद : योगी) |
No comments:
Post a Comment