रस्त्याने जाताना पुरुषाला मागे वळून बघायला लावणारी स्त्री हीच सुंदर असते का? -श्रीराम पाध्ये, डोंबिवली परवा तुम्ही रस्त्याने जाताना खड्डय़ात पडलात, त्याचं कारण आता समजलं. सुंदर बायको नेहमी शेजाऱ्याला का? -अमित पाटील तुमच्या शेजाऱ्याचे मत तुम्हाला कळले तर. स्वतच काम सांगून, काय करतोयस रे?असं रोज साहेब विचारतात, काका मला वाचवा.. - मनोहर कदम, सातारा साहेबांची घरची कामं आधी करावीत, हे तुम्हाला अजून कसे कळत नाही. त्यामुळे त्याना घरी किती बोलणी खावी लागतात.. जर तुम्ही इंजिनिअर असता तर काय केले असते? - हृषिकेश साळुंखे मी कशाला काय केले असते? असिस्टंट इंजिनिअरला काम सांगितले असते. नवरा जेव्हा सौंदर्याची स्तुती करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? -मुकेश जाधव, सटाणा सास-याचा प्रॉव्हिडंट फंड आला असणार. सध्याच्या राजकारणातील घोडेबाजाराबद्दल तुमचे मत काय? -मिलिंद म्हापसेकर, बोरिवली माझी भूमिका नेहमी रचनात्मक असते. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात घोडेबाजारामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. झोपेचे मोजमाप कशाने करतात? -जी. एम. वळवी, नवापूर कॅलेंडर त्याचसाठी तर छापतात! राजकारणाविषयी तुमचे मत काय? -जान्हवी भोईर मी सध्या सत्ताधारी पक्षात असल्याने मला राजकारण आवडते. २०२० पर्यंत जर खरंच इंधन संपले तर.. -मुकेश , पालघर आम्ही सर्व गार पाण्याने आंघोळ करतो व कच्च्या भाज्या खातो,तुमचे बघा! आम्हांला वाटेवर काटे मिळतात, तुम्हाला कविता कशा मिळतात? -विजय महाम्बरे, वेंगुर्ले सतत डोक्यात कुणाचा तरी काटा काढायचा विचार सोडून द्या! काका तुमचे वय किती? -भूषण वागड, वासिंद माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्याचे विसरलात वाटतं! |
No comments:
Post a Comment