अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी शिकायला जाणा-या विद्यार्थ्यांच्याबाबतीत संख्येच्या आघाडीवर चीन भारतावर मात करणार असे दिसते आहे.
दीर्घ काळ, भारतीय विद्यर्थी इंजिनियरींगच्या सातव्या सेमिस्टरमध्येच अमेरिकेतील विद्यपीठात प्रवेश घेत असत. इंजिनियरिंगचा निकाल लागण्याआधीच ते अमेरिकेत रवानाही होतात असे काहीसे गमतीने म्हटले जायचे. परंतु आता चीनी विद्यार्थी मोठ्या संख्येने अमेरिकेकडे उच्च शिक्षणासाठी वळत आहेत अशी आकडेवारी अमेरिकेतील कौन्सील ऑफ ग्रॅज्युएशन स्कूलने प्रसिद्ध केली आहे.
चालू वर्षांत अमेरिकेत जाणारे भारतीय विद्यार्थी एक लाख नऊ हजार इतके आहेत तर अमेरिकेत गेलेल्या चीनी विद्यार्थ्यांची संख्या ९८ हजार इतकी आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत हा फरक वीस हजाराहून दहा हजारावर आला आहे. दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंग्लंडमधील शिक्षणसंस्थंनी दरवाज अधिक उघडले आहे.
यंदा ५७ हजार भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. गेल्या दोन वर्षांत ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आता सिंगापूरनेही प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ पर्यटकांना भुरळ घालणारा देश अशी आपली ओळख न ठेवता उच्च शिक्षणासाठी आग्नेयेकडील एक उत्तम केंद असा लौकिक मिळवण्यासाठी जगभरातल्या अनेक नामवंत विद्यापीठांना सिंगापूरने आमंत्रित केले आहे.
एकीकडे हे चित्र असताना भारतीय विद्यापीठांचा दर्जा मात्र ढासळत चालला आहे अशी तक्रार शिक्षणतज्ज्ञ करत आहेत.
No comments:
Post a Comment