PUPUTUPU

Privacy Policy

▼

Friday, November 19, 2010

हास्यकविता ‘राज’पाट

'राज'पाट हास्यकविता 

'बाबा' म्हणाले 'सोसायटी'पुढे
नवा 'आदर्श' ठेवत आहे
जुन्या 'लाल' दिव्यासंगे
काही नवे दिवे लावत आहे.

'दादा' म्हणाले 'पृथ्वी'वर
आता माझंही आलं 'राज'
त्यांचे 'भुज-बळ' कमी पडले
हे मी सिद्ध केलं आज

'देश-मुख' बघून म्हणाला
'सुशील'पणा कामी आला नाही
'आय'च्या डोईवर 'हात' नव्हता
म्हणून नराचा 'नारायण' झाला नाही.

'सासू'बाईंनी 'फ्लॅट' केलं
हे शल्य मनात घेऊन
एक आत्मा आता भटकत राहील
सदैव 'अशोक' वनात.
अ‍ॅड. अनंत खेळकर
अकोला (विदर्भ)

The Bharatiya at 12:49 PM
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version
Powered by Blogger.