यशस्वी जीवनाची सुत्रे ...
१) नेहमी सुर्योदयापूर्वी दीड ते दोन तास उठा।
२) उठल्यानंतर परमेश्वराचे स्मरण करुन, आपल्या तळाहाताचे दर्शन घेत
कराग्रे वसते ॥ हा श्लोक म्हणा।
३) रोज सकाळी किमान अर्धा ते एक तास व्यायाम करा। (सूर्यनमस्कार व बैठका/
दोरीउड्या)
४) नियमितपणे योग्य आहारच घ्या।
५) आपले रोजचे काम, कर्तव्य नियमितपणे पूर्ण करा। आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नका.
६) आपले शरीर, आपला पोशाख, आपल्या वस्तू नीटनेटक्या व स्वच्छ ठेवा।
७) एकावेळी एकच काम एकाग्रतेने व नीटनेटके करा।
८) चांगले ऎका, चांगले बघा, चांगले बोला व चांगलेच करा। यशस्वी जीवनाची
ही चतु:सूत्री आहे.
९) धर्म, जात, गरीब -श्रीमंत असे कुठल्याही प्रकारचे भेद मानू नका।
प्रत्येकाशी प्रेमाने नातं जोडा.
१०) दिलेली वेळ नेहमी पाळायला शिका तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील।
११) अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाला शक्य ती मदत करा।
१२) रोज किमान कोणतेही एक वृत्तपत्र संपूर्ण वाचा।
१३) अतिथी वा कोणीही आल्यास त्याच्याशी प्रेमाने संवाद साधा, त्यांना
पाणी वगैरे द्या, त्यांची विचारपूस करा।
१४) थोर महापुरुषांची चरित्रे वाचा। ती तुम्हाला प्रेरणा देतील.
१५) अंगणात, कुंडीत एखादे झाड लावा व त्याला नियमितपणे पाणी घालून त्याची
काळजी घ्या।
१६) वर्षातून एकदा तरी सहलीला अवश्य जा।
१७) आपल्या मित्रांचे वाढदिवस एखाद्या अहीत अथवा डायरीत लिहून ठेवा व
त्यांच्या वाढदिवशी त्यांना गुलाबाचे फ़ूल भेट द्या।
१८) चांगल्या सुविचारांचा, गाण्यांचा, चित्रांचा, फ़ोटोंचा, कवितांचा,
कथांचा पुस्तकांचा संग्रह करा।
१९) शाळेतल्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्या व यशासाठी प्रयत्न करा।
२०) आपल्या आवडत्या लेखकांचे, गायकांचे, माणसांचे पत्ते मिळवा व
त्यांच्याशी पत्रमैत्री करा।
२१) एखाद्या कवितांचा, गाण्यांचा, नाटकाचा असा कोणताही कार्यक्रम
पाहण्याची संधी लाभली तर ती दवडू नका।
२२) आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा।
२३) दररोज किमान दोन पाने अवांतर लेखन करा। उद. रोजनिशी लिहिणे, निबंध लिहिणे इ.
२४) आपला एखादा मित्र, मैत्रीण, नातेवाईक आजारी असल्यास त्याला अवश्य
भेटायला जा। तुमच्या भेटीने तो सुखावेल.
२५) कोणतीही कला तिच्या सर्व रंगसगांसहीत शिकण्याचा प्रयत्न करा। उदा.
वादन, गायन, नृत्य, अभिनय, लेखन, वक्तृत्व इ.
२६) महिन्यातून किमान एकदा तरी आपल्या नजीकच्या पुस्तक प्रदर्शनाला आवश्य
भेट द्या आणि शक्य आसल्यास आवडती पुस्तकं विकत घ्या।
२७) एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा।
२८) नियमितपणे प्रात:प्रार्थना, भोजनश्लोक आणि सायंप्रार्थना म्हणण्यास चुकू नका।
२९) दिनचर्या आचरणात आणण्यास दिरंगाई करु नका।
३०) तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा काय आहे याचा विचार करा।
३१) आयुष्यात कधीही निराश होऊ नका; परमेश्वरावर विश्वास ठेवा.यशस्वी जीवनाची सुत्रे ...

३१) आयुष्यात कधीही निराश होऊ नका; परमेश्वरावर विश्वास ठेवा.
No comments:
Post a Comment