Privacy Policy
Wednesday, June 29, 2011
सचिनचे दातृत्व, फ्लॅट नोकरासाठी
सचिनचे दातृत्व, फ्लॅट नोकरासाठी
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
सचिन तेंडुलकरने काहीही केले की त्याची चर्चा अनेक दिवस सुरू राहते. त्याने बँकेचे कर्ज काढून पनवेल येथे घेतलेल्या घराचीही अशीच चर्चा रंगली. हा फ्लॅट सचिनने त्याचा मुलगा अर्जुनसाठी घेतल्याची म्हटले जात होते. परंतु प्रत्यक्षात सचिनने हा फ्लॅट दत्ता आणि तुषार भादे या आपल्या घरी काम करणा-या दोघा तरूणांसाठी घेतल्याची नवी माहिती समोर आली आहे.
सचिनचे दातृत्व जगाला माहितीच आहे. त्यात आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे. सचिनचे सासरे आनंद मेहता यांचे लोणावळा येथे फार्म हाऊस आहे. अशोक भादे नावाचे गृहस्थ अनेक वर्षांपासून तेथे माळीकाम करतात. भादे यांची मुले सचिनकडे कामाला होती. त्यानंतर सचिननेच त्यांना मुंबईत चांगली नोकरी मिळवून दिली. पण लोणावळ्याहून मुंबईला येणे त्रासदायक होते. त्यांना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून सचिनने अंजलीच्या नावे कर्ज काढून पनवेलमधील फ्लॅट त्यांच्यासाठी घेतला, अशी माहिती समोर आली आहे. अशोक भादे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
म्हणजे सचिनच्या नावावर आता आणखी एक पुण्य जमा झाले आहे आणि त्याची चर्चाही सचिनच्या दातृत्वाची पुढली बातमी येईपर्यंत अशीच सुरू राहिल यात शंका नाही.
आजकालच्या पोरांना धंदा आहे तरी काय ?
आजकालच्या पोरांना धंदा आहे तरी काय ?
दिसली पोरगी ओर्कुट वर की
तिला
करतील हाई
मित्र असतो जिवाचा जिवलग पण
त्याला बोलतील बाय
पण
त्याच पोरीला १० वेला विचारतील
सांग तुझ नाव काय ?
असेल तीच नाव
ख़राब तरी म्हणतील
वा खुपच सुन्दर हाय , असल मी कधीच एकल सुद्धा नाय
ती
बोलते थैंक्स ...... आता साइन आउट होते मी करते तुला बाय
हे बोलत थांबा
ना मैडम एवढी कसली आहे घाय
ती म्हणते जायचय मला खुप काम हाय
हे
म्हणत विषय कोणता पण काढा त्यात लाजायचय काय
मग मैत्रीच्या गप्पा , आवडी
निवडी ....खुप विषय होतात
फोटो पाहून याच्या मनात भलतेच
विचार येतात
,
शेवट म्हणत मैडम
तुम्हाला एक विचारायच हाय .....
माझ की नाय
तुमच्यावर खुप प्रेम हाय
ती बोलते,
आता माझी छोटी मुलगी १२ विला हाय
चल
घरचे वाट पहात असतील आता तुला करते बाय
आज कालच्या पोरांना धंदा आहे
तरी काय
दिसली पोरगी ओर्कुट वर की तिला करतात हाई.....
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला …
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला …
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला …
श् वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला …
काळ्या ढगांमधून पळून यायला …
अलगद तुझ्या कुशीत शिरायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..
तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला …
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला …
आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला …
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …
भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला …
तरच आवडेल मला पाऊस व्हायला …
बरं वाटलं तू आलीस ! आज भेटलीस !!
आज भेटलीस !!
रात्री माझ्या बागेत ,
रातराणी फ़ुलली होती
कारण नसताना, उगाचचं
ती बडबड करत बसली होती !
तेव्हाच यायला हवं होतं लक्षात,
आज तू भेटणार ,
इतके दिवस कुठे होतास म्हणून
भांड भांड भांडणार
भांडून भांडून दमल्यावर ,
माझाचं हात हातात धरून,
पुन्हा माझ्याचं खांद्यावर डोकं टेकणार !!!!
पुन्हा मुक्यानेच होइल संभाषण आपलं
पुन्हा पानं फ़ुलं एकतील
आणि मग पुन्हा तुझ्या गालावर
लाजेचे ताटवे फ़ुलतील !!
जाताना मात्र नको विचारूस
पुन्हा कधी भेटायचं
असचं , अवचित , कधीतरी
रातराणी सारखं फ़ुलायचं !!!!!!!
Monday, June 27, 2011
The magician who can walk on water
|
Sunday, June 26, 2011
टी लोबसंग राम्पा यांची सर्व पुस्तके (इंग्रजीतून)
ज्यांना अध्यात्म वा तिबेटी गूढ विद्या यांमध्ये रस आहे त्यांनी ही पुस्तके अवश्य वाचावीत.
ईस्निप्स वर येथून : http://www.esnips.com/web/TLobsangRampaBooks/
आणि
४शेअर्ड वर येथून : http://www.4shared.com/dir/Ar9H7zhE/T_Lobsang_Rampa_Books.html
ही पुस्तके उतरवून घेता येतील
माझ्या वाचनात श्री.लोंब्संग राम्पा यांच्याविषयी लिहीलेले "सिद्धयोगी " हे पुस्तक आले. हे पुस्तक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक अतिशय चांगले आहे. त्यात त्यांची पुर्ण माहिती मिळते.
तृतीय नेत्र हा पहिला
तिबेटी डॉक्टर हा दुसरा
व
राम्पाची कहाणी हा तिसरा भाग आहे.
अध्यात्मसाधनेतील अत्भुत अनुभव राम्पा यांनी त्यांच्या आत्मकथनात लिहिलेले आहेत.